आमोद्यातील किराणा दुकानदाराच्या मुलाचा ‘युपीएससी’ परीक्षेत झेंडा जळगाव (प्रतिनिधी) – केंद्रीय लोकसेवा आयोगाने अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. त्यात जिल्ह्यातील आमोदे (ता.यावल) येथील योगेश पाटील या तरूणाने ८११ क्रमांकाने यश संपादित केले आहे. त्यांचे वडील गावी किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे अनेकांचे स्वप्न असते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तरुण रात्रंदिवस अभ्यास करतात. मनोरंजनाच्या सर्व इच्छा बाजूला ठेवत केवळ अभ्यास एके अभ्यास यावर लक्ष केंद्रिंत करतात. तरीही अनेकांच्या पदरी अपयश येते. काही जण तर केवळ एक किंवा दोन टक्क्यांनी मागे राहतात. काही जण परीक्षेत एकदा अपयश आल्यावर पुन्हा जोमाने पुढील परीक्षेसाठी तयारी करतात.…
Author: Vikas Patil
मंत्री गिरीश महाजन श्रीनगरकडे रवाना जळगाव (प्रतिनिधी)- जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांना समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि जम्मू-काश्मिरात अडकलेल्या इतर पर्यटकांच्या सुटकेसाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगरहून मुंबईला एअर इंडियाच्या विमानाने आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी १२.१५ वाजता निघाले आहे. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान सायंकाळी ६ वाजता निघेल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे…
अतिरिक्त सुरक्षा ठेव भरा ; महावितरणचे आवाहन, वेबसाईटसह मोबाईल ॲपवर सुविधा जळगाव (प्रतिनिधी)- महावितरणच्या वीजग्राहकांना एप्रिल किंवा मे महिन्याच्या वीज बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल पाठवण्यात येत आहे. ही अतिरिक्त सुरक्षा ठेव विद्युत नियामक आयोगाच्या नियमांनुसार असून वीजग्राहकांनी या रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता-२०२१ च्या विनियम १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. या सुरक्षा ठेवीची दरवर्षी पुनर्गणना केली जाते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर, मागील वर्षातील ग्राहकांच्या वीज वापराच्या सरासरीनुसार आणि विनियम १३. ११ नुसार ग्राहकांनी भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित दरानुसार व्याज (सद्यासाठीचा व्याज दर ६…
१८ लाखांचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभागाने प्रतिबंधित असलेले १८ लाख रुपये किमतीचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त केले आहे. एका संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, विद्या इंगळे, प्रकाश मथुरे, समा तडवी यांच्या पथकाने…
रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष; साडेनऊ लाखांत फसवणूक भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून निवृत्त पोलिसाची ९ लाख ६४ हजार ६० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. भुसावळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वसंत जानबाजी ढोणे (वय ६६,रा. फेकरी) हे २०१७ मध्ये जी. आर. पी. रेल्वे पोलिस दलातून निवृत्त झाले आहे. त्यांचा मुलगा वैभव सध्या पुण्यात काम करतो. त्यांची ओळखीची महिला रेखाबाई सोनवणे हिने प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (रा. गडकरी नगर, खडका रोड, भुसावळ) नावाच्या व्यक्तीमार्फत रेल्वेत नोकरी लावता येईल, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी अग्रवाल यांची भेट घेतली असता त्याने मुलाला रेल्वेमध्ये हेड क्लार्क पदावर नोकरी लावून देतो,…
डोक्यात गोळ्या झाडून वडीलांच्या हत्येचा सूड ! जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथे २२ एप्रिल रोजी रात्री तरुणावर बेछूट गोळीबार करीत त्याची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना १५ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला म्हणून घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोपाळ सोमा मालचे (वय ४०, रा. वाकटुकी ता.धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो वाकटुकी गावात परिवारासह राहत होता. सन २०१० साली खूनाचा गुन्हा गोपाळ मालचे याच्यावर दाखल झाला होता.हा खटला न्यायप्रविष्ठ आहे. २२ एप्रिलरोजी संशयित आरोपी राहुल सावंत (कोळी) हा गोपाळ मालचे याच्यावर दबा धरून बसला होता. त्याचे वडील ज्ञानेश्वर कोळी यांचा २०१० साली खून झाला…
पुढचे १५ दिवस भयंकर उष्णतेचे, काळजी घ्या ! जळगाव (प्रतिनिधी )- सध्या कडक उन पडत असून येत्या पंधरा दिवसात तापमानाचा पारा चढतच जाणार असल्याचा अंदाज असून यामुळे नागरिकांनी बाहेर पडतांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमान सातत्याने वाढत असून आता शेवटचा आठवडा येत असतांना भर पडली आहे. काल जळगाव शहरासह बहुतांश तालुक्यांमध्ये तापमान 42 अंश सेल्सीयसपेक्षा जास्त होते. आज आणि पुढील दोन आठवड्यांमध्ये पारा मोठ्या प्रमाणात चढणार असल्याचे भाकित हवामानविषयक संकेतस्थळांनी वर्तविले आहे. 23 एप्रिल रोजी तापमान 42 ते 43 अंश सेल्सीयसदरम्यान राहणार आहे. आगामी पाच दिवसांमध्ये पारा 42 अंशाच्या आसपास…
पहलगाममध्ये देवयानी ठाकरेंसह चाळीसगावमधील पर्यटक अडकले जळगाव (प्रतिनिधी)- जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपरांधाचा बळी गेला. चाळीसगाव येथील भाजपच्या देवयानी ठाकरे 14 जणांसह व जळगावातील शिव कॉलनीतील नेहा वाघुळदे मैत्रिणींच्या ग्रुपसोबत पहलगाममध्ये अडकल्या आहेत. चाळीसगाव येथील भाजपच्या देवयानी ठाकरे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष असून त्या त्यांचे पती व सहकाऱ्यांसोबत काश्मीरला गेल्या होत्या. सध्या त्या श्रीनगरमध्ये सुरक्षित ठिकाणी असल्याचं परिवाराकडून सांगण्यात आलं संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्टजारी करण्यात आला आहे. देवयानी ठाकरे सहकाऱ्यांसोबत महाराष्ट्रात परतणार आहेत. जळगावच्या खासदार स्मिता वाघ तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे त्यांच्या संपर्कात आहेत. 25 तारखेचे त्यांचे विमानाचे तिकीट बुक झालेले आहे.…
जिल्ह्यातील २३ वाळू घाटांना मंजुरी साईमत जळगाव प्रतिनिधी शासनाने नवीन वाळू धोरण जारी केले असून जिल्ह्यातील २३ वाळू घाटांना राज्यस्तरीय पर्यावरण समितीची मान्यता मिळाली आहे लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी १७ एप्रिलरोजी दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, वाळू धोरणातील निकषांनुसार जिल्ह्यातील २३ वाळू घाटांसाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पुढील २० दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, यासाठी आवश्यक टेंडर डॉक्युमेंट तयार करून फ्लॅश करण्यात आले आहेत. याची माहिती सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. हे सर्व काम नवीन धोरणानुसार पूर्णपणे कायदेशीर केले जाईल. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की,…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील हवेतील धुळीने नागरिकांचे दिवस राहून गेले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने ‘फॉग कॅनन’ मशीनचा वापर सुरू केला आहे. ही मशीन पाण्याच्या दहीभर थेंबांचा वापर करून हवेतील धूळ कमी करण्यास मदत करते. या उपायामुळे नागरिकांना श्वसन समस्यांपासून संरक्षण मिळेल असे अपेक्षित आहे. जळगावातील धूळीची समस्या मुख्यतः बांधकाम कार्यांमुळे निर्माण होते. बांधकामाच्या ठिकाणी नियमितपणे धूळ उडत असते, ज्यामुळे नागरिकांची श्वसन प्रणाली जडणघडण संवेदनशील होते. त्यामुळे लक्ष देण्याची गरज आहे. फॉग कॅनन मशीनने हवेतील कणी पाण्याच्या थेंबांचा वापर करून ते जमिनीवर आणते, ज्यामुळे धूळीची समस्या काही प्रमाणात कमी होते. “वातावरणाच्या आरोग्यासाठी ही सुविधा खूप महत्त्वाची आहे.…