राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याची खुर्ची, कपाट जप्त जळगाव (प्रतिनिधी) – पारोळा येथील शेतकऱ्याची शेती महामार्गात गेल्यामुळे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतीचे दर कमी दिल्याने शेतकऱ्याचा १२ वर्षांपासून वाढीव मोबदला मिळावा म्हणून लढा सुरू होता. जळगाव दिवाणी न्यायाधीश यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या विरुद्ध निकाल दिल्यानंतर खुर्ची जप्तीचे आदेश केले होते. त्यानुसार ५ मे रोजी दुपारी अधिकाऱ्यांची खुर्ची व कपाट कार्यालयात जाऊन जप्त करण्यात आले. नवाब खाटीक (रा. मोंढाळे ता. पारोळा) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरुद्ध दावा दाखल केला होता. २०११ साली अधिसुचना प्रसिद्ध झाली होती. २०१३ साली अमळनेर प्रांत कार्यालयात निवाडा मंजूर झाला होता. मात्र त्यात रस्त्यात शेतीचे दर कमी दिल्यामुळे नवाब खाटीक…
Author: Vikas Patil
सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश नवी दिल्ली (न्युज नेटवर्क)- भारतातील सर्व राज्यांना नागरी संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ७ मे रोजी ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दिवशी सर्व राज्यांत सायरन वाजले जातील. हल्ला होतो, तेव्हा सूचना देण्यासाठी सायरन वाजवले जातात. मात्र, सर्व राज्यातील सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे की नाही? किंवा सुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सांगितली जात आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याची परिस्थिती आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या दोन्ही देशात तणावाची…
गुलाबराव देवकरांच्या शिक्षण संस्थेने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची चौकशी जळगाव (प्रतिनिधी)- ३ मे रोजी मुंबई येथे जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. या प्रवेशानंतरच्या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासांतच गुलाबराव देवकर यांच्या शिक्षण संस्थेने घेतलेल्या कर्जाची चौकशी सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. श्रीकृष्ण शिक्षण संस्थेने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या १० कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ही चौकशी आहे. या संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर आहेत. हे कर्ज बेकायदेशीर घेतल्याचा आरोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यांनी देवकर यांच्यावर अनेक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत,घोटाळे झाकण्यासाठीच त्यांनी…
राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा प्रयागराजः (न्युज नेटवर्क)- काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल यांचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली. तसेच राहुल यांच्या नागरिकत्वाला आव्हान देण्यासाठी इतर कायदेशीर पर्याय शोधा, असेही न्यायालयाने म्हटले. न्यायाधीश ए.आर. मसूदी आणि न्यायमूर्ती राजीव सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे, की केंद्र सरकार याचिकाकर्त्याच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी विशिष्ट वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत याचिका प्रलंबित ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही. न्यायालयाने याचिकाकर्त्याला राहुल गाधींच्या नागरिकत्वाला आव्हान देण्यासाठी इतर कायदेशीर पर्याय शोधण्यास सांगितले. त्यानंतर आता हा खटला रद्द करण्यात…
शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार जळगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी जळगावमध्ये २५० कोटी रुपये खर्चाचे विभागीय क्रीडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळावे यासाठी १४ लाख रुपये निधीतून क्रीडांगणांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संघटन महासंघ आणि शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात ४ मेरोजी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला. पालकमंत्री गुलाबराव…
४९ टक्क्यांनी ऋषिकेशचा घात केला ! जळगाव (प्रतिनिधी)- बारावी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या तीव्र नैराश्यातून ममुराबाद गावात १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. जळगाव जिल्ह्यातील ही १२ वी निकालामुळे घडलेली दुसरी आत्महत्या असून या घटनेने पालक आणि शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. आजच एरंडोल तालुक्यातील विद्यार्थ्याने पाचोरा येथे बहिणीच्या घरी कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केली होती. ऋषिकेश दिनेश पाटील (वय १७ वर्ष, रा. ममुराबाद, ता. जळगाव) हा तरुण आई-वडील, आजी आणि मोठ्या भावासोबत ममुराबाद येथे वास्तव्याला होता. त्याने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. आज दुपारी बारावीचा ऑनलाईन…
कमी गुण मिळाल्याने पाचोऱ्यात तरुणाची आत्महत्या पाचोरा (प्रतिनिधी)- आज बारावीच्या निकालात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून १९ वर्षीय तरुणाने पाचोऱ्यातील बहिणीच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भावेश प्रकाश महाजन (वय – १९ वर्ष, रा. एरंडोल) हा विद्यार्थी एरंडोल येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. १२ वीची भावेश याने एरंडोल येथे परीक्षा दिली होती. परीक्षा दिल्यानंतर भावेश १५ दिवसांपासून पाचोरा येथील भडगाव रोडवरील राजीव गांधी कॉलनीत (शक्तीधाम जवळ) राहत असलेल्या बहिणीकडे आला होता. ४ मेरोजी सायंकाळी भावेशची बहिण व पाहुणे पुणे येथे लग्न समारंभासाठी गेले होते. भावेश ५ मेरोजी सकाळी १० वाजता पाचोरा शहरातील…
वेताळवाडी, धिंगापूर,घोसला शिवारातील पाणवठे कोरडेठाक; वन्यप्राणी मृत्यूच्या दाढेत सोयगाव ( प्तारतिनिधी )- लुक्यातील अजिंठ्याच्या डोंगरातील वेताळवाडी, धिंगापूर आणि घोसला हे तीन प्रमुख पाणवठे कोरडेठाक झाले आहे जंगलात पाण्याचे सर्वदूर दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यामुळे वन्यप्राण्याची घशाची कोरड वाढली आहे त्यामुळे वन्यप्राणी मृत्यूच्या दाढेत अडकले आहे. वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले असून अद्यापही या प्रमुख तिन्ही पाणवठ्यात वनविभागाने पाणी उपलब्ध केलेले नाही त्यामुळे वन्यप्राण्यांची तारांबळ उडाली असून गाव परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे सोयगाव तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वेताळवाडी, धिंगापूर ही दोन्ही वनक्षेत्र वन्यप्राण्याचे अस्तित्व असलेली ठिकाणे म्हणून वनविभागाच्या दप्तरी नोंदी आहेत. या शिवारात बिबट्याचे अस्तित्व आहे परंतु पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने या भागातील…
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक, अधिकारी म्हणतात, ‘तो मी नव्हेच’, बँक खाती गोठवली नाशिक ( प्रतिनिधी ) – शिक्षक भरतीत बोगस शालार्थ आयडी काढून शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. गोपनीय पद्धतीने होत असलेल्या चौकशीत एका माजी शिक्षण अधिकाऱ्याने ‘त्या’ स्वाक्षऱ्या केल्याच नाहीत, असा दावा केल्याने चौकशीची व्याप्ती वाढली आहे. काही शिक्षक, कर्मचाऱ्यांचे बँक खातेही गोठविण्यात आले असून, सोमवारी जुन्या संचमान्यता शिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बोगस शालार्थ आयडी काढून फसवणूक केल्याने शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी ७९ शिक्षक, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. असाच प्रकार नागपूरला उघड झाल्यानंतर…
अंजनेरीत साडेबारा एकरमध्ये ३ वर्षांत साकारणार पासग विहार ध्यान केंद्र नाशिक ( प्रतिनिधी ) – आत्मा ते परमात्मा या अंतर्मुखतेच्या प्रवासात ‘ध्यान’, ‘मौन’ आणि ‘आत्मचिंतना’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या आत्मिक साधनेचा अनुभव सखोल व प्रभावी व्हावा यासाठी नाशिक जवळील अंजनेरी येथे पासग विहार फाउंडेशनतर्फे ध्यान केंद्र उभारले जात आहे. पौराणिक काळापासून अंजनेरीला ध्यानासाठी महत्त्व प्राप्त झाले आहे. हनुमानांच्या जन्मापूर्वी त्यांच्या माता अंजनी यांनी याच स्थळी तपश्चर्या केली होती. अंजनेरीच्या डोंगररांगांमध्ये प्राचीन गुहा असून, त्या ध्यानधारणेची साक्ष देतात. येथील एका गुहेमध्ये अडीच लाख वर्षे जुनी भगवान शांतिनाथांची मूर्ती आजही अस्तित्वात आहे. या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारशामुळे अंजनेरीची निवड ध्यान केंद्रासाठी…