जिल्हापेठ पोलिसात दोन जणांविरुधद गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना रविवारी, २५ मे रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, लक्ष्मी प्रमोद चौधरी (वय ३५, रा. जानकी नगर, जळगाव) ही महिला २५ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चाळीसगाव जाण्यासाठी जळगाव बसस्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढतांना धुरपता अक्षय भोसले (वय-३०) आणि तिच्यासोबत असलेली तिची अल्पवयीन मुलगी (दोन्ही रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजी नगर) यांनी महिल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून लांबविले. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर लक्ष्मी चौधरी यांनी जिल्हापेठ…
Author: Sharad Bhalerao
रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील साई संस्कार कॉलनी परिसरातून भरदिवसा एका तरुणीच्या घरातून १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप लांबविल्याची घटना २२ मे रोजी घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भरदिवसा झालेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील वाघ नगर परिसरातील साई संस्कार कॉलनीत वास्तव्यास असणाऱ्या निकीता विनोद पाटील (वय २५) ह्या एका खासगी इन्शुरन्सच्या कंपनीत नोकरीला आहेत. कंपनीकडून त्यांना घरुन काम करण्यासाठी लॅपटॉप दिला होता. २२ मे रोजी सकाळी निकीता पाटील नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. मॉर्निंग वॉकवरून घरी परतल्यानंतर आणि ऑफिसला जाण्याची…
एमआयडीसी पोलिसात परप्रांतीय चार महिलांविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये माजी नगरसेवकाचा महिला चोरट्यांनी ८० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परप्रांतीय चार महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, जळगाव शहरातील माजी नगरसेवक राजेंद्र झिपरू पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते २४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये आले होते. त्यावेळी मार्केटमध्ये आलेल्या संशयित महिला लल्ली रमजान जोगी (वय २७), पूजा रज्जू जोगी (दोन्ही राहणार अमठी, उत्तर प्रदेश, ह.मु.ममता बेकरी, जळगाव) आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी महिला…
शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथे जुना वाद उफाळल्यावरुन एका तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करत चाकूने वार करून दुखापत केली. तसेच इतरांनी मोठा दगड पायावर टाकल्याने पाय फ्रॅक्चर केल्याची घटना २३ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी २४ मे रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, गजानन विकास बाविस्कर (वय ३०, रा. छत्रपती शिवाजी नगर, हुडको, जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तो खासगी कंपनीत नोकरीला आहे. २३ मे रोजी रात्री ९.३० वाजता जुन्या वादातून मनिष रामू बिऱ्हाडे, संगम देवा भोई आणि क्रिष्णा पांडूरंग…
जळगाव तालुका पोलिसात चार महिलांविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरापासून जवळील आव्हाणे शिवारातील रोहनवाडी येथे नातीला शिकवणाऱ्या शिक्षिकेचा पत्ता न दिल्याच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या नातीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून नुकसान केल्याचा प्रकार २४ मे रोजी सकाळी ११ वाजता घडला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार महिलांविरुध्द गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, रोहनवाडी येथे राहणाऱ्या सुनंदा आनंद निकम (वय ५७) यांच्याकडे मंगल मुरलीधर सुरवाडे, अश्विनी शालिक सुरवाडे, गीता धनराज वाघ आणि सरिता संजय दांडगे (सर्व रा. महादेव नगर, जळगाव) अशा चार महिला आल्या होत्या. त्यांना सुनंदा निकम…
साहित्य, शैक्षणिक क्षेत्रासह सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथील साहित्यिक राजेंद्र पारे यांना साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शिरपूर येथील समता उत्कर्ष समितीतर्फे आयोजित ‘काकासाहेब बैसाणे जीवन गौरव’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. शिरपूर येथील सिटी प्राईड उत्सवाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. तुषार बैसाणे लिखित ‘बाप माय’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. तुषार रंधे, आशा रंधे, पिंटू शिरसाठ, भदंत आनंद, डॉ. दीपाली सोसे, डॉ. माधवराव कदम, युवराज माळी, डॉ. फुला बागूल, डॉ. सतीश मस्के, प्राचार्य सारीका रंधे, आशा बैसाणे मान्यवर उपस्थित होते. गणपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राजेंद्र पारे…
रामेश्वर कॉलनीतून निघाली होती पालखी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : प.पू. झिपरु अण्णा महाराजांच्या ७६व्या पुण्यतिथीनिमित्त जिव्हेश्वर युवक मंडळातर्फे रामेश्वर काॅलनी येथुन निघालेल्या ‘श्रींच्या’ पालखीचे नशिराबाद येथील झिपरु अण्णा नगर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रामेश्वर कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात सकाळी युवक मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार देविदास डहाके त्यांच्या पत्नी विजया डहाके यांच्या हस्ते गणपती, गजानन महाराज, हनुमंत, भगवान जिव्हेश्वर, प.पू. झिपरु अण्णा महाराज यांच्या आरतीने सुरुवात करुन अण्णांच्या पालखीचे पूजन करुन पालखी रवाना झाली होती. सुरत येथील केंद्र समितीचे सहखजिनदार भजन सम्राट आनंद सातपुते, केंद्र समितीचे माजी अध्यक्ष विलास गरुड, दीपाली खंडारे यांनी प.पू.अण्णांच्या भजनाने सर्व वातावरण भक्तीमय केले. त्यामुळे उपस्थितीतांचे लक्ष वेधून…
जळगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील रेल्वेस्थानक येथील १८ वर्षीय तरूणी ही घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी गुरूवारी, २२ मे रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली असल्याचे सांगण्यात आले. रजनी पुरूषोत्तम आदिवासी (वय १८, रा. बळेगाव, ता.रायपुरा, मध्यप्रदेश) असे बेपत्ता झालेल्या तरूणीचे नाव आहे. आदिवासी तरूणी रजनी ही आपल्या कुटुंबियांसह २१ मे रोजी सकाळी १०.३० आपल्या नातेवाईकांसह जळगाव येथील रेल्वेस्टेशन येथे आली होती. त्यानंतर तरूणीने कुणाला काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू कोणतीही माहिती मिळू शकली नाही. अखेर तिच्या पालकांनी…
जळगाव तालुका पोलिसात एकावर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील एका गावात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी, २१ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २२ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. २१ मे रोजी सकाळी १० वाजता जळगाव तालुक्यातील कठोरा आणि किनोद गावाच्या दरम्यान असलेल्या पेट्रोलपंपाचा जवळून संशयित आरोपी विनोद प्रकाश बाविस्कर (रा.सावखेडा) याने काहीतरी आमिष दाखवत पीडित मुलीला फूस लावून पळवून नेले. दरम्यान,…
एमआयडीसी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरूण परिसरात पेट्रोल टाकण्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मालक समजून चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्याला दमदाटी केली. हा प्रकार गुरूवारी, २२ मे रोजी दुपारी २ वाजता घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांवरून गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील विशाल हॉटेल पेट्रोल पंपावर संजय नामदेव ढेकणे (वय ५४) हे कामाला आहे. २२ मे रोजी पहाटेच्या सुमारास दोन दुचाकींवर शिवम सुनील शिंदे, शरद अशोक पाटील, कुणाल पाटील आणि शेखर (पूर्ण नाव माहित नाही) हे चार जण आले होते. त्यावेळी संजय ढेकणे हे पेट्रोलपंपाजवळ कामावर होते. त्यावेळी…