गालापुरला ग्रा.पं.,शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाची पाहणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यात वाढते तापमान, काँक्रिटीकरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. ही चिंताजनक घट भरून काढण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून “मिशन संजीवनी” हे अभियान राबविण्यात येत आहे. अशा अभियानांतर्गत एरंडोल तालुक्यातील गालापूर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण केले आहे. जि.प.च्या सीईओ मीनल करनवाल यांनी स्वतः मंगळवारी, २७ मे रोजी कामाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा…
Author: Sharad Bhalerao
अधिकाऱ्यांकडून गतिरोधकाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन घेतले मागे साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील क्रांती चौकात एका मोटरसायकल अपघातात एक मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी, २७ मे रोजी दुपारी २ वाजता घडली. अपघातानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय बांदल यांच्यासह परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतुकीचा रस्ता मोकळा केला. आंदोलनकर्ते यांना रस्त्याच्या बाजूला करून समज देण्यात आली. मात्र, जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. दरम्यान, आंदोलनामुळे क्रांती चौकातील अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आंदोलनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सूर्यवंशी यांनी भेट देत याठिकाणी…
रामानंद नगर पोलिसात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील रामानंद नगरातील चर्च समोर अज्ञात कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील प्रौढ गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी, २५ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी २६ मे रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. राजपूत कॉलनीतील रहिवासी दिवानसिंग पाटील हे २५ मे रोजी दुपारी ४ वाजता रामानंद नगर येथील चर्च परिसरात दुचाकीने (क्र.एमएच १९ इएर्फ १५७३) जात होते. तेव्हा मागून येणारी कारने (क्र.एमएच १९, ९०७९) जोरदार धडक दिली. धडकेत दिवानसिंह गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा…
जळगाव तालुका पोलिसात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील कानळदा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ करत महिलेसह तिच्या पतीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी, २६ मे रोजी सकाळी ८ वाजता घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. जळगाव तालुक्यातील कानळदा येथे वैशाली ईश्वर सपकाळे (वय ४०) ह्या आपले पती ईश्वर सपकाळे यांच्यासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी, २६ मे रोजी सकाळी ८ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून शेजारी राहणारा संदीप एकनाथ कोळी, छाया संदीप कोळी, गोकुळ एकनाथ कोळी आणि सुषमा भैय्या कोळी (सर्व रा. कानळदा) यांनी वैशाली सपकाळे यांना…
विहिरीवरील पंपाची चोरी ; शेतकरी हतबल साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील तळेगाव येथील शेतकऱ्यांसमोर एक मोठी समस्या उभी टाकली आहे. आता शेती तयार करून लागवडीचा काळ असताना विहिरीतील पंप चोरीला जात आहे. त्यामुळे आता लागवड करावी तर कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. दरम्यान, जामनेर तालुक्यातील तळेगावसह परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. विहिरीवरील पंप चोरीला जाऊ लागल्याने शेतकरी हैराण झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. जामनेर तालुक्यातील तळेगाव परिसरातील शेतकरी दिलीप बाबुराव घ्यार, जिजाबाई बुधा सुरवाडे यांच्या शेतातील एक सौर पंप व एक इलेक्ट्रिक पंप चोरांनी लांबवल्याने शेतकऱ्यांना आता नवीन पंप घेऊन कपाशी लागवड करावी लागेल. अडचणीत चोरांनी इलेक्ट्रिक पंप आणि सौर…
शहरातील खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचा मनपाला दिला इशारा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी, २७ मे रोजी ‘खड्डे भरो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड.जमिल देशपांडे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहितचे संदीप मांडोळे, प्रकाश जोशी, साजन पाटील, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, विकास पाथरे, उमेश आठरे, विशाल जाधव, विनोद पाटील यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. महानगरपालिका जिथे काम करू शकत नाही तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जनतेला सोबत घेऊन श्रमदान करून स्वखर्चाने मुरूम आणून खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे महानगरपालिका, माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांचे कोणतेही जनतेकडे लक्ष…
शिवसेनेतर्फे भुसावळला प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन साईमत/भुसावळ/प्रतिनिधी: शासनाने इयत्ता अकरावी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ ते २८ मे दिली आहे. परंतु अर्ज भरण्याची साईट संकेतस्थळ हे वारंवार बंद पडत आहे. एकच दिवस बाकी असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे. संबंधित संकेतस्थळ हे सुरळीत सुरू करावे आणि प्रवेश अर्ज प्रकियाची मुदत ही वाढवून द्यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना मंगळवारी, २७ रोजी देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, शासनाने अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्जाची तारीख २६ ते २८ मे दिली होती. परंतु सोमवारी सकाळपासून अर्ज भरण्याची संबंधित साईट संकेतस्थळ हे वारंवार बंद पडत आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज…
स्नेहमेळाव्यात शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातील २००५-०६ मध्ये दहावीतील माजी विद्यार्थ्यांची १९ वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली. स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्नेहमेळाव्यात शाळेच्या शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्हासह पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. मंगरुळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात रविवारी, २५ मे रोजी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था चालक श्रीकांत पाटील होते. यावेळी शिक्षक संजय पाटील, प्रभुदास पाटील, अशोक सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शितल पाटील, सीमा मोरे, पी.आर.पाटील, मनोज…
एमआयडीसी पोलिसात एकावर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील तांबापुरा भागातील हनुमान मंदिर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर धारदार वस्तूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी, २५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. रवींद्र विक्रम हटकर (वय ३५, रा. गवळीवाडा, तांबापुरा, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २५ मे रोजी दुपारी १ वाजता रवींद्र हटकर हा त्याच्या घरी असताना संशयित आरोपी आकाश चव्हाण याने जुन्या भांडणाच्या कारणावरून रवींद्रला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने धारदार वस्तूने रवींद्रच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर जखमी रवींद्रला जिल्हा…
एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील अजिंठा चौफुलीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी, २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रेम धीरज ठाकूर (वय २०, रा. शिंदे नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराने गर्दी केली होती. प्रेम ठाकूर हा कुटुंबियांसह वास्तव्याला होता. तो टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास प्रेम हा शिंदे नगरातून अजिंठा चौफुलीतील चौकाकडे जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. त्या धडकेत प्रेम ठाकूर हा जागीच…