‘समाधान’ शिबिरात अनेकांचे झाले ‘असमाधान’, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीच लाभली उपस्थिती साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महाराष्ट्र शासन महसूल, वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव १०० दिवसांचा कृती आराखड्याअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबिर दोन दिवसापूर्वी आयोजित केले होते. शिबिरात विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांसह नागरिक, ग्रामस्थांना देण्यात येणार होती. तसेच जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार होते. परंतु शिबिरात नाट्यगृहात टाकलेल्या खुर्च्यांवर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आल्याने शेतकरी शिबिरापासून वंचित राहिल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नेमके शिबिर कोणासाठी आयोजित केले होते. जनतेच्या किती समस्यांचे निराकरण केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणारे शिबिरे, कार्यक्रमासाठी…
Author: Sharad Bhalerao
दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंतीनिमित्त मिरवणूक पध्दत, वायफळ खर्च न करता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी वर्डीतील अभ्यासिका केंद्राला पुस्तके भेट देऊन अनोखा उपक्रम राबविण्यात आला. तसेच सर्व जाती-धर्माच्या समाजबांधवांना समाविष्ट करुन राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील पद्माकर नाथ होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती विनायक चव्हाण, माजी सभापती कांतीलाल पाटील, चोसाकाचे संचालक दिलीप नायदे, प्रभाकर नायदे, रायभान धनगर, सरपंच महेंद्र पाटील, प्रकाश धनगर, रवींद्र धनगर, सतिष शिरोळे, योगराज नायदे, रमेश धनगर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन छत्रपती शिवाजी…
कारखाना विक्री करणे हा शेवटचा पर्याय, कारखान्याबाबत दुसऱ्यांदा बोलावली बैठक साईमत/जामनेर/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील गोंडखेल साखर कारखान्याबाबत तालुक्यात चर्चा सुरु आहेत. गोंडखेल साखर कारखान्याबाबत दोन पर्याय आपल्यासमोर आहेत. त्यातील पहिला पर्याय साखर कारखाना किंवा इतर उद्योग त्या जागेवर सुरू करणे किंवा शेवटचा पर्याय म्हणजे कारखाना विक्रीस काढणे, असे हे पर्याय आहेत. कारखान्याच्या उभारणीसाठी कारखान्यावर जवळपास १२ कोटी रुपयांचे कर्ज लोकांसह बँकेचे आहे. जिल्हाभरातून ११ हजार लोकांचे शेअर्स कारखान्याकडे जमा आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून लोकांचे व बँकेचे पैसे कारखान्यावर आहेत. त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. जर या जागेवर इलेक्ट्रीसिटी प्रोजेक्ट सुरू केला तर त्यामाध्यमातून संस्थेला जवळपास ८५ हजार…
कृषी अधिकारी सुभाष अहिरे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे होतेय कौतुक साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी तथा कृषी अधिकारी सुभाष ओंकार अहिरे (पाटील) आणि सविता सुभाष पाटील यांच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून शेंदुर्णीत संगीतमय रामायण कथा, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त त्यांनी संतांसह देवदूत, उद्योजक, समाजसेवक, सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या अशा सर्वांचा नुकताच मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या स्तुत्य अशा उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ते ओंकार नामदेव अहिरे यांचे चिरंजीव आहेत. अध्यक्षस्थानी कृषीभूषण विश्वासराव पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव थोरात, दिलीप खोडपे, आबासाहेब पाटील, डी.के.पाटील, पी.के.पाटील…
मृतात धरणगाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याचा समावेश : नागरिकांचा संताप साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील शिवकॉलनी चौकात रविवारी, १ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका भरधाव चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातात धरणगाव येथील तहसील कार्यालयात कार्यरत शिपायाचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, मयत विशाल रमेश सोनार (वय ४४) हे रविवारी दुपारी शिवकॉलनी चौकात रस्ता ओलांडत असताना खोटेनगरकडून येणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, त्यात त्यांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे…
मनसेने मुख्याधिकाऱ्यांना दिले प्रमुख मागण्यांचे निवेदन साईमत/यावल/प्रतिनिधी : शहरात सुरळीत, मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी तसेच आठवडे बाजारालगत असणारे अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मनसेचे तालुका पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतांना शहरातील नागरिकांसह शहराध्यक्ष गौरव कोळी, तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, उपतालुकाध्यक्ष शाम पवार, जनहित विधी विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन दिलीप अढळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात नमूद केले आहे की, यावल शहरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. यावल शहरात पाणीपुरवठा सुरळीत करावा.पाणी पुरवठा संदर्भात ज्या काही समस्या असतील त्या तात्काळ आपल्या स्तरावर मार्गी लावाव्या, पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे लागलेले कामगारांचा पगार वेळेवर होत नसल्यामुळे त्यांनी…
साईमत/यावल/प्रतिनिधी : गेल्या दोन-तीन वर्षाच्या यावल नगरपरिषदेच्या प्रशासकीय कालावधीत विविध कामांचे नियोजन आणि शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या बौद्धिक क्षमतेच्या बळावर सर्वांना विश्वासात घेऊन कामे करणाऱ्या यावल नगरपालिका पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता व प्रभारी बांधकाम अभियंता सत्यम जयवंतराव पाटील यांची जिल्ह्यात भडगाव येथे बदली झाल्याने यावल नगरपालिका दुष्काळात ‘तेरावा महिना’ याप्रमाणे अडचणीत येणार असल्याचे शासकीय चित्र निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता सत्यम जयवंतराव पाटील यांनी गेल्या तीन चार वर्षाच्या कालावधीत आपल्या बौद्धिक क्षमतेच्या आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर विविध योजनांचे काम यशस्वीरित्या पार पाडले. संबंधित शासकीय यंत्रणेसह कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार, मजूर वर्ग, लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांना विश्वासात घेऊन कामे केली…
दाताळातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात प्रहार जनशक्तीचे संस्थापक-अध्यक्ष बच्चू कडू यांचा इशारा साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कोणताही जात-धर्म नसतो. तो जगाचा पोशिंदा आहे. अशा शेतकऱ्यांवरच विश्वासघाती महायुती सरकार वेळोवेळी अन्याय करण्याचेच काम करीत आहे. तेव्हा शेतकरी राजाला जोपर्यंत त्यांच्या हक्काचा न्याय मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही आणि सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. तालुक्यातील दाताळा येथे २८ मे रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांची जाहीर सभा व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख गजानन लोखंडकार, जिल्हा उपप्रमुख अजय टप,…
चोरट्यांचा दीड लाखांच्या ऐवजावर डल्ला साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शहरातील घाट रस्त्यावरील गोकुळधामच्या पाठीमागील शुभश्री पार्क कॉलनीत एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यात सुमारे १ लाख ५० हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज लांबविण्यात आला आहे. ही चोरीची घटना सोमवारी, २६ रोजी रात्री ११ ते मंगळवारी, २७ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील शुभश्री पार्क येथील रहिवाशी दीपक राजेंद्र साळकर याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दीपक हा त्याची आई आणि बहीण असे तिघे सोमवारी, २६…
पाचोऱ्यात पत्रकारांनी बँक व्यवस्थापकांना धरले धारेवर साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून शहरातील राष्ट्रीयकृत बँकाचे एटीएम कोणत्या ना कोणत्या कारणांनी बंदावस्थेत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनतेसह ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना शेती आणि अन्य कामांसाठी रोख स्वरूपात पैश्यांची गरज तसेच विविध अनुदानाच्या रकमा त्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्या असताना केवळ एटीएम बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा प्रश्न उपस्थित झाला होता. शेतकरी आणि जनतेने जागरूक पत्रकारांकडे बँकांच्या मनमानी कामकाजांबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. पत्रकारांनी हा विषय गांभीर्याने घेत राष्ट्रीयकृत बँका, आणि अन्य संस्थांनी सुरू केलेल्या एटीएम बंदबाबत आवाज उठवत २९ मे रोजी आ. किशोर पाटील यांचे प्रतिनिधी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील आणि…