शिवसेना शिंदे गटाने मनपाच्या आयुक्तांवर केला हल्लाबोल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील नागेश्वर कॉलनीत पिसाळलेल्या कुत्र्याने एका ४ वर्षीय बालकाचा बळी घेतला. त्यामुळे शहरात सध्या संतापाची लाट पसरली आहे. मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा चिमुकला बळी ठरल्याचे म्हणत शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी, ३ जून रोजी तीव्र निषेध नोंदविला. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनाद्वारे मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासह विविध मागण्या केल्या आहेत. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी संतोष पाटील यांनी आयुक्तांसह प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरत ‘मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा’, असा टोला लगावला. चार वर्षीय चिमुकल्याचा मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला…
Author: Sharad Bhalerao
एलसीबी संदीप पाटील, शनिपेठला कावेरी कमलाकर तर बबन आव्हाडांना मिळाले एमआयडीसी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ‘खांदेपालट’ अर्थात बदल्या केल्या आहेत. त्यात एमआयडीसीचे संदीप पाटील यांची एलसीबीला, एलसीबीचे बबन आव्हाड यांची एमआयडीसी पोलीस स्टेशनला तर चोपडा ग्रामीणच्या कावेरी कमलाकर यांची जळगावातील शनीपेठला बदली झाली आहे. दरम्यान, पोलीस खात्यातील पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. खांदेपालट झालेल्यांमध्ये प्रामुख्याने शनीपेठचे रंगनाथ धारबळे यावल, यावलचे प्रदीप ठाकूर जिल्हापेठ, पहुरचे पोलीस निरीक्षक सचिन सानप पारोळा तर पारोळ्याचे सुनील पवार यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना अमळनेरलाच कायम…
सुरु असलेल्या कामांना गती देण्याचे संबंधितांना दिले निर्देश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या पुनर्रचना वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी फीडर विभक्तीकरण प्रकल्प प्रगतीचा आढावा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, ३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महावितरणचे मुख्य अभियंता विनोद पाटील, पायाभूत आराखडा विभागाचे मुख्य अभियंता मनोज विश्वासे, सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश महाजन तसेच विविध जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा, कामांची टक्केवारी, अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांबाबत तसेच तालुकानिहाय कामांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. प्रगतीस गती द्या, अडथळ्यांवर तात्काळ उपाय करा राज्यमंत्री खडसे यांनी निर्देश…
अजिंठा विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, अनेकांनी केले मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील अजिंठा विश्रामगृहात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ तसेच सर्व संलग्नित शाखांची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे होते. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने दहावी, बारावीमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या कास्ट्राईब परिवारातील गुणवंत पाल्यांचा सत्कार, गुणगौरव सोहळा आयोजित करणे, संघटनेच्या विस्तारासाठी जास्तीत जास्त सभासद करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अशा व इतर विषयांचा समावेश होता. बैठकीला नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, पुलकेशी केदार (जिल्हाध्यक्ष), ज्येष्ठ सल्लागार राजेंद्र राणे, डी.एच.भास्कर, किशोर साळुंखे, राजीव वानखेडे, श्री.भालेराव (जिल्हाध्यक्ष, मनपा), नंदू गायकवाड, विकास सोनवणे, नितीन सोनवणे (जळगाव तालुकाध्यक्ष), जिभाऊ हटकर, विनोद…
‘स्मृतिशेष चमेली भाऊराव कादंबरी’ पुरस्काराने प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे सन्मानित साईमत/पुणे-जळगाव/प्रतिनिधी : आधुनिक साहित्याचा ‘विश्व करुणा’ हा गाभा आहे. तो भाव ‘चिंबोरे युद्ध’ कादंबरीत प्रतीत होत असल्याचे प्रतिपादन ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे लिखित यांना जळगाव येथील अथर्व पब्लिकेशने प्रकाशित केलेल्या ‘चिंबोरे युद्ध’ कादंबरीला जळगाव येथील स्मृतिशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठानच्यावतीने ‘स्मृतिशेष चमेली भाऊराव कादंबरी’ पुरस्काराने सन्मानित करताना ते बोलत होते. ‘पुरस्कार आपले दारी’ अशा अभिनव उपक्रमाने प्रतिष्ठानतर्फे कादंबरीकार प्रा.डॉ.लबडे यांच्या पुणे येथील पिंपळे सौदागर येथे घरी जाऊन पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे यंदा राज्य पुरस्काराचे दुसरे…
जैन इरिगेशनमध्ये ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त व्यसनमुक्तीवर केले मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात. त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते. खरं तर व्यसनमुक्तीसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अवलंबण्याची गरज असल्याचे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांनी केले. व्यसनमुक्तीनेच जीवन समृद्धीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते, असेही ते म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त बांभोरीतील जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड प्लास्टिक पार्क आणि जैन फूड पार्क येथे सहकाऱ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. सकाळी जैन प्लास्टिक पार्कला आयोजित कार्यक्रमात त्यांनी कंपनीच्या सहकाऱ्यांशीही सुसंवाद साधला. ते म्हणाले की, देवाने…
खूप मोठे व्हा अन् समाजाची सेवा करा : कवी आर. डी. कोळी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती तसेच समाज चिंतामणी प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे संस्थापक तथा कवी आर. डी. कोळी यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त जळगावातील बाल निरीक्षण गृहात अभिनव अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बाल निरीक्षण गृहातील ६० अनाथ मुला-मुलींना अल्पोपहार, केक, पेढे वाटप करण्यात आले. समाजाने माझ्यासाठी काय केले, त्यापेक्षा मला समाजासाठी काय करता येईल, असा विचार प्रत्येक भारतीय नागरिकाने केला पाहिजे. खूप मोठे व्हा आणि समाजाची सेवा करा. ‘समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा कवी आर. डी. कोळी यांनी केले. गरजुंनाही…
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात अमृत महोत्सवानिमित्त मान्यवरांकडून गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भिडस्तपणे कवितेसाठी जगणारा माणूस म्हणून गोविंद देवरे यांनी जीवनपणाला लावले. कवितेचे वेड लावणारा माणूस म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाईल. आता त्यांनी उर्वरित आयुष्य जगताना कवितेसाठी जगावे, असे प्रभावी प्रतिपादन साहित्यिक तथा कवी डॉ. मिलिंद बागुल यांनी केले. जळगाव शहरातील जि.प.जवळील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात साहित्य विकास मंडळाच्यावतीने रविवारी, १ जून रोजी साहित्यिक, कवी गोविंद देवरे यांच्या आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षीयस्थानावरून बोलत होते. सुरुवातीला दै.‘साईमत’चे उपसंपादक शरद भालेराव, ज्येष्ठ कवी डी.बी. महाजन, पितांबर भारुडे, भास्करराव चव्हाण, कवयित्री शितल पाटील, पुष्पा साळवे, मंदा मोरे तसेच आदींच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक…
वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिका चालक, कक्षसेवक झाले सेवानिवृत्त साईमत/वरणगाव/प्रतिनिधी वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिका चालक व कक्ष सेवक अशा दोघांचाही शनिवारी सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ पार पडला. त्यानंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन अहिरे यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत सेवानिवृत्त रुग्णवाहिका चालक, कक्षसेवक यांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप दिला. यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिका चालक व कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मिलींद मुरलीधर मेढे तसेच कक्ष सेवक संजय भास्कर पाटील हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर शनिवारी, ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त रुग्णालयात त्यांचा वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे,…
शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या शेतात विहिरीत पाणी उपलब्ध असतांना डीपी अर्थात रोहित्रावरील ट्रान्सफॉर्मर ६३ केव्हीचा असल्याने दाब म्हणजेच लोड कमी-जास्त होऊन वारंवार वीज पुरवठा झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील करणवाडीतील तायडे डीपी परिसरातील शेतातील उभी पिके डोळ्यासमोर सुकून जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी यासंदर्भात शिवसेना उबाठाचे शहरप्रमुख गजानन ठोसर यांना माहिती दिली होती. शिवसेना उबाठाने दिलेल्या आंदोलन इशाऱ्याच्या धास्तीने शेतकऱ्यांना डीपी बदलवून मिळाली आहे. याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. तायडे डीपीवरील सर्व शेतकऱ्यांना घेवून शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, किसान सेना शहरप्रमुख सै.वसीम, वाहतूक सेना शहरप्रमुख…