८०० पेक्षा अधिक विवाहेच्छुकांची उपस्थिती : देश-विदेशातून समाजबांधवांचा सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील लेवा नवयुवक संघाने रविवारी, ३० नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या विश्वस्तरीय लेवा पाटीदार विवाहेच्छुक वधू-वर महामेळाव्यामुळे जळगावातील एकलव्य क्रीडा मैदान लेवा समाजाच्या बांधवांनी गजबजून गेले होते. अशा अभूतपूर्व मेळाव्यात विवाहेच्छुक वधू-वरांची व त्यांच्या पालकांची अलोट गर्दी पहायला मिळाली. सुमारे आठशेहून अधिक विवाहेच्छुक वधू-वरांनी महामेळाव्यात परिचयासाठी आपली नावे नोंदवली होती. विशेष म्हणजे, देश-विदेशातूनही विवाहेच्छुक वधू-वर तसेच त्यांचे पालक याठिकाणी उपस्थित झाले होते. समाजातील सर्व स्तरातील विवाहेच्छुक वधू-वरांना एकाच व्यासपीठावर आणून परिचय करून देण्याचा हा एक अभिनव उपक्रम लेवा नवयुवक संघाने दरवर्षीप्रमाणे यशस्वीरित्या पार पाडला. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत, कार्यक्रमात विदेशातून…
Author: Sharad Bhalerao
चोरीसाठी गुगल मॅपचा वापर करीत असल्याचे उघड साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील आर. सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या सुवर्ण पेढ्यांमधून ४ लाख ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या लांबविणाऱ्या लकी शिवशक्ती शर्मा (वय ३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) या लेडी नॅचरला बरेलीतून ताब्यात घेतले. चोरी करण्याची आयडीया तिला युट्युब, क्राईम पेट्रोल, सावधान इंडियावरील व्हिडीओ बघून मिळाली तर चोरीसाठी ती गुगल मॅपचा वापर करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जावून तेथे अंगठी बघतांना हातचलाखी करीत आर. सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या सुवर्ण पेढ्यांमधून ४ लाख ७० हजार रुपयांच्या अंगठ्या चोरुन…
संविधान सन्मान संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारत देश स्वतंत्र आहे. पण देशातील वंचित, गोरगरिबांचे स्वातंत्र्य व्यवस्थेने हिरावून घेतले आहे. त्यामुळे देशाचे संविधान सुरक्षित ठेवणे आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक ख्यातीचे चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी केले. ते संविधान सन्मान संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे होते. स्वागताध्यक्ष करीम सालार यांनी दोन दिवसीय संमेलनामुळे संविधानाविषयी अनेक नवे पैलू शिकता आले असल्याचे सांगत ‘विचारांची हृदय ते हृदय देवाणघेवाण झाली’ असे नमूद केले. संविधान तज्ज्ञ जयसिंग वाघ यांनी २००८ पासून संविधान दिवस साजरा करण्याची सुरूवात कशी झाली, त्याचा उल्लेख करत ‘संविधानाच्या पुनर्विलोकनाची गरज नाही’ असे स्पष्ट मत व्यक्त…
विविध वयोगटात वर्चस्व राखत खेळाडूंची पदकांची कमाई साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ३५ व्या ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा निकाल रविवारी, ३० नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्यात ठाणे, मुंबई शहर व पुण्याचे संघ अव्वल ठरले आहेत. महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना व जळगाव हौशी जिम्नॅस्टिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ३५ व्या ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. स्पर्धेत ठाणे, मुंबई शहर व पुण्याच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत विविध वयोगटात पदकांची कमाई केली. तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते अक्षता शेटे, मानसी सुर्वे यांनी तांत्रिक समिती प्रमुख काम पाहिले. स्पर्धा राज्य संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या वर्षा…
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गुंतवणूकीचे आमिष दाखवून ‘अठ्ठावीस महिन्यात दाम दुप्पट करून देतो’, असे सांगून नागपूर येथील एका वकीलासह त्यांच्या नातेवाईकांची तब्बल १ कोटी २२ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २८ नोव्हेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जुगलकिशोर टिकमचंद गिल्डा (वय ६५, रा. धमपेठ, नागपूर) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वकील व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, १ जानेवारी २००६ पासून ओळखीच्या संबंधातून त्यांची व त्यांच्या नातेवाईकांना रामदेवबाबा बिल्डर ॲण्ड डेव्हलपर्स प्रा.लि. आर्वी, जि.वर्धा या संस्थेत पैसे गुंतवल्यास २८ महिन्यात रक्कम दुप्पट करून मिळेल, असे आमिष…
उपक्रमात विविध शाळेतील विजेत्या गटांना प्रमाणपत्रासह बक्षीस साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी ज्ञान वाढवून तसेच युवक, शालेय विद्यार्थी यांच्या गटांनी चांगले कार्य करण्याची सवय लागणे, यासाठी पवन चॅरिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्टतर्फे संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकतेतून शिकण्याची वृत्ती निर्माण झाली, असे सचिव रघुनाथ राणे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेला वाव मिळून पोस्टर स्पर्धेतून संविधानाबाबत ज्ञान वाढून संदेश पोहोचविण्यात आला. संविधान प्रश्नमंजुषा उपक्रमात विविध शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विजेत्या गटांना प्रमाणपत्रासह बक्षीस देण्यात आले. लहान गटात प्रथम रेहान तडवी, भावना जाधव, भैरवी निवतकर, भावेश भालेराव, मोठ्या गटात खुशी सोनवणे, दिसू सपकाळे, जीवन कोळी, निलेश पावरा, उत्तेजनार्थात श्रद्धा वडनेरे, कामरान तडवी,…
राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनात उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : समाज बदलण्यासाठी फक्त शब्द किंवा बाईट पुरेशी नाही. त्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता असल्याचे यावर्षी राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनात अधोरेखित केले. ज्या क्रांतिकारी योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केल्या. त्यांचा वापर आळशीपणे बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी संविधानाची पूजा करून भक्त तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आज धोक्यात आहे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे जनतेला सामूहिक उठाव करुन रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले. राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पूजन व संविधान…
शिबिरात तपासणीचा सहभागी ७७ जणांनी घेतला लाभ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : एम. जे. कॉलेज सोहम योग विभार, धात्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निःशुल्क शुगर, बी.पी. व कराडा स्कॅन तपासणी शिबिर २८ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडले. दुपारी ३ ते ६ या वेळेत शिबिराला शहरातील विविध वयोगटातील नागरिकांनी, केसीई सोसायटी येथील सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिसाद दिला. शिबिरासाठी ७७ सहभागी तपासणीसाठी उपस्थित होते. प्रत्येक नागरिकाची नोंदणी करून त्यांचे बीपी, मधुमेह चाचणी, कराडा स्कॅनमधून शरीरातील फॅटचे प्रमाण, वजन, जलांश, बीएमआर आदी तपासून वैयक्तिक अहवाल दिला गेला. तपासणीनंतर प्रत्येक सहभागीला वैयक्तिक आरोग्यस्थितीनुसार मार्गदर्शन करण्यात आले. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. गणेश पाटील…
स्पर्धेत २१ जिल्ह्यातील ३४३ खेळाडूंचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ३५ वी ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ जिल्हा क्रीडा संकुलात होत आहे. यासाठी राज्यातून मुलींच्या सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनियर गटाच्या २१ जिल्ह्यातील ३४३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. जळगावात ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून २९ नोव्हेंबरला स्पर्धेचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने जळगाव हौशी जिम्नॅस्टिक्स असोसिएशनतर्फे स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाण्याच्या खेळाडूंनी वरिष्ठ व कनिष्ठ गटातून वर्चस्व राखले. ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रोप, सुप, बाॅल, क्लब, रिबन या प्रकारात मुंबई शहर, ठाणे व पुण्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या गटात…
कार्यक्रमाचे ५० प्रयोग राज्यभर, राज्याच्या बाहेरही साईमत/जळगाव/प्रतिनिधी : नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट अर्थात एनसीपीए ही देशातील अत्यंत विख्यात संस्था आहे. नरिमन पॉईंट येथे संस्थेचे सुंदर नाट्यगृह आहेत. संस्थेने जळगावमधील परिवर्तन संस्थेच्या ‘अरे संसार संसार’ बहिणाबाईंच्या कवितांचा व गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम मुंबईकर रसिकांसाठी आयोजित केला आहे. एनसीपीए सारख्या संस्थेने जळगावमधील कलावंतांना राष्ट्रीय व्यासपीठावर आमंत्रित करून जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव केला आहे. कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची आहे. दिग्दर्शक नारायण बाविस्कर आहेत. गोविंद मोकाशी, श्रद्धा पुराणीक, मंजुषा भिडे, सोनाली पाटील, सुदीप्ता सरकार, भूषण गुरव, हर्षल पाटील, विशाल कुलकर्णी, यश महाजन, रोहित बोरसे, सुनीला भोलाणे, प्रतीक्षा कल्पराज, अक्षय नेहे आदी कलावंत कार्यक्रमात…