जि.प.च्या २० टक्के सेस फंडातून उभारली अभ्यासिका, विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सुविधा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरात अभ्यासासाठी शांत वातावरण मिळावे, म्हणून अभ्यासिकांमध्ये प्रवेशाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातील काही अभ्यासिकांमध्ये शुल्क आकारुन सुविधा पुरविण्यात येतात. या अभ्यासिकांचा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेतर्फे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत व वातानुकुलीत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातून विद्यानिकेतन शाळा, जी.एस. ग्राउंड येथे ही वातानुकुलीत अभ्यासिका उभारली आहे. ही सुविधा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित व प्रेरणादायी वातावरणात अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. येथे…
Author: Sharad Bhalerao
अपघातात ११ जखमी, जळगाव जिल्ह्यात पसरली शोककळा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पुणे येथे क्रिकेटचा सामना पाहून घरी परतणाऱ्या खेळाडूंच्या वाहनाच्या झालेल्या अपघातात १३ पैकी दोन जणांचा मृत्यू तर ११ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी, ९ जून रोजी अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर घडली. अपघातातील मयत बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट ॲकॅडमीचे खेळाडू होते. अपघातामुळे जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुण्यातील गहुंजे येथे एमपीएल क्रिकेट सामना सुरु आहे. हा सामना पाहण्यासाठी बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीचे १३ खेळाडू गेले होते. सामना आटोपल्यानंतर हे खेळाडू क्रुझरने (क्र.एमएच २० डीजे ४८३४) घराकडे परतत होते. सोमवारी पहाटे ५…
धुळे समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त संजय सैदाणे यांचे आवाहन साईमत/धुळे/प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटूंबातील जोडप्यांसाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी प्रस्ताव ३१ ऑगस्ट, २०२५ पर्यत सादर करावे, असे आवाहन धुळे समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त संजय सैदाणे यांनी केले आहे. मागासवर्गीय कुटूंबातील सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या एका जोडप्यांसाठी रूपये २० हजार (वीस हजार मात्र) इतके अर्थसहाय्य वधूचे आई-वडील किंवा पालकांच्या नावे तर स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे रक्कम ४ हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान धनादेशाद्वारे विवाहाच्या दिवशी वितरीत करण्यात येते. अशा आहेत अटी अन् शर्ती वधु-वर…
नंदुरबार उपनगर पोलिसात महिलेसह आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी : आधीच्या लग्नाचा घटस्फोट झालेला नव्हता. असे असतानाही तो झाल्याचे खोटे सांगून नागपूर येथील एका महिलेने नंदुरबारातील एका घटस्फोटित व्यक्तीशी विवाह केला. त्यानंतर नांदण्यास नकार देत ही महिला सोन्याचे दागिने घेऊन माहेरी निघून गेली. दरम्यान, याप्रकरणी महिलेसह तिच्या आई-वडिलांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मूळचे रांझणी येथील रहिवासी तथा सध्या नंदुरबारातील श्रीरामनगर भागात राहणारे पुष्पेंद्र चिंधा भारती (वय ३९) यांचा पहिला विवाह झाला होता. काही कारणाने त्यांचा घटस्फोट झाला होता. दुसऱ्या विवाहासाठी ते समाजमाध्यमावर स्थळ शोधत असताना त्यांना नागपूर येथील एका महिलेविषयी स्थळाची माहिती मिळाली. नंदुरबारात पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर…
हवामान विभागाने वर्तविला अंदाज साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कमी असला तरी आर्द्रतायुक्त आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाची दाहकता जास्तच जाणवत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरीमुळे बहुतांश ठिकाणी शेतमशागतीच्या कामांना वेग आला आल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुरुवारी, १२ जून रोजीनंतर मान्सून काही प्रमाणात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात तुरळक स्वरूपात पाऊस झाला आहे. सरासरी १.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच आगामी दोन ते तीन दिवसात ढगाळ तसेच आभ्राच्छादित वातावरणासह तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान असले तरी हवेतील ३६ टक्के आर्द्रतेनुसार प्रत्यक्षात ४२ अंश तापमान असल्याचे जाणवत आहे. दुपारनंतर ढगाळ…
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुण तलाव परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी एका तांबापुरा येथील २३ वर्षीय तरूणाला पाण्याचा अंदाज न आल्याने शनिवारी, ७ जून रोजी दुपारी २ वाजता बुडाला होता. त्याचा रात्रीपर्यंत राबविलेल्या शोध मोहिमेनंतरही थांगपत्ता लागला नव्हता. अखेर रविवारी, ८ जून रोजी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर असे की, बकरी ईद असल्याने सुट्टी असल्याने शनिवारी, ७ जून रोजी दुपारी २ वाजता नदीम शेख त्याचे मेहुणे अझहर खान, मामेभाऊ इरफान शेख, तोहीत खान आणि मित्र मोहसीन खान यांच्यासह मेहरुण तलाव…
निमखेडीतील महानुभाव वैकुंठधामात रविवारी होणार अंत्यविधी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळ्यातील बाजार रस्ता, लिमडी शाळेसमोरील रहिवासी तथा सुवर्णकार (सोनार) समाजातील ज्येष्ठ समाजसेवक, समाजाच्या हितासाठी सदैव झटणारे वासुदेव नारायण पोतदार (रा.तळईकर) यांचे वयाच्या ९९व्यावर्षी शनिवारी, ७ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी, ८ जून सकाळी १० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ते महानुभाव अनुयायी असल्यामुळे त्यांचा अंत्यविधी निमखेडी येथील महानुभाव स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दिनकर, सुरेश आणि रमेश वासुदेव पोतदार अशी तीन मुले तर सुशीला सोमनाथ विसपुते, मंगल अनिल सोनवणे अशा दोन मुली तसेच नातवंडे, पणतु असा परिवार आहे. वासुदेव पोतदार यांनी चाळीसगाव तालुक्यात सर्कल ऑफिसर म्हणून…
बैठकीला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची लाभली उपस्थिती साईमत/मालेगाव/प्रतिनिधी : येथील शासकीय विश्रामगृहात महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मनपाची आढावा बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे होते.बैठकीत मालेगाव शहरासह तालुक्यातील नागरी सुविधांसह विविध प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत मनपा क्षेत्रात कॅन्सर हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करणे, आयुष (आयुर्वेद) १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी जागेची उपलब्धता, गट क्र. ८१/अ/२ क्रीडांगण आरक्षण प्रस्ताव अंतिम मंजुरीबाबत, मजिप्राकडील जागा विविध विकासकामांसाठी हस्तांतरण करणे, शहरी भागातील घरकुल योजनांचा आढावा, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निवासी प्रयोजनासाठी नियमनकुल करणे, प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण, नाट्यगृहाचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही व अस्तित्वातील इमारतींचे निर्लेखन, मनपा…
आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक परंपरेला बळकटी देणारा ठरला कार्यक्रम साईमत/नवापूर/प्रतिनिधी : तालुक्यातील विसरवाडीतील अखिल भारतीय आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था यांच्यावतीने तिसऱ्यांदा आयोजित केलेला ‘नव हिजारी कणी वाटपाचा’ कार्यक्रम नर्मदा जिल्ह्यातील सागबारा तालुक्यातील देवमोगरा येथील याहा मोगी माता धाम येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आदिवासी समाजाची कुलभक्ती, रूढी आणि परंपरा जिवंत ठेवणे होता. याप्रसंगी याहा मोगी पुजारी यांच्या हस्ते देव हिजारी पूजन करून देव कणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला बळकटी देणारा ठरला आहे. कुल समाजाची कुलभक्ती आणि रूढी परंपरेचा महान उद्देश टिकून राहण्यासाठी सर्व धाम, गाव…
शहरातील प्रभाग चारमधील उद्यान विकासाच्या भूमिपूजनप्रसंगी प्रतिपादन साईमत/धुळे/प्रतिनिधी : नागरिकांसाठी मूलभूत सोयी-सुविधांची पूर्ती झाली म्हणजे विकास झाला, असे होत नाही. धुळे शहराच्या विकासाला उद्योगांची जोड हवी आहे. जोपर्यंत धुळे शहरात उद्योग-व्यवसायांना चालना मिळत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास घडून येणार नाही. त्यासाठी शहरातील तरुणांच्या, कुशल मनुष्यबळाच्या हातांना काम उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठीच रावेर परिसरात नवीन औद्योगिक वसाहत सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे शहरात उद्यमशीलतेला चालना मिळेल, असे प्रतिपादन आ.अनुप अग्रवाल यांनी केले. शहरातील प्रभाग चारमधील जयहिंद कॉलनी व आनंदनगरला लागून असणाऱ्या मोकळ्या जागेत उद्यान विकासाचे काम सुरू आहे. त्या जागेत जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जीम, ज्येष्ठ नागरिकांसाठी…