प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान : साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी : ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात ‘धरती आबा जनभागीदारी अभियान’ नावाने शिबिरांचे आयोजन केले आहे. अभियानात जिल्ह्यातील ७१७ गावांचा समावेश केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सर्व संबंधित विभागांना सक्रिय सहभाग घेऊन अभियानाचा लाभ सर्व आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहे. अभियानाला रविवारी, १५ जूनपासून सुरुवात होणार असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोद्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी दिली आहे. आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारद्वारे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात महाराष्ट्रातील ४ हजार ९७५ आदिवासी गावांचा समावेश आहे. या माध्यमातून राज्यातील…
Author: Sharad Bhalerao
दोन दिवसांपासूनच तयारी सुरु : २९ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना साईमत/नाशिक/प्रतिनिधी : नाशिक महानगरपालिकेला शासनाने तीन दिवसांपूर्वी प्रभाग रचनेचे काम करण्याचे आदेश दिले असता पुन्हा शासनाने महानगरपालिकेला आदेश देत प्रभाग रचना तयार करण्याचे टप्पेच ठरवून दिले आहेत. नऊ टप्प्यात महानगरपालिका प्रशासनाला प्रभाग रचनेचे काम करावे लागणार आहे. प्रगणक गटाच्या मांडणीस सुरूवात झाली आहे. सोमवारी, १६ जूनपर्यत याकरिता अवधी दिला आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडून २९ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. प्रभाग रचनेचे काम ११ जून ते ४ सप्टेंबर कालावधीत होणे अपेक्षित आहे. तसे निर्देशच शासनाच्या नगरविकास खात्याने महानगरपालिकेला दिले आहेत. प्रभाग रचनेसंदर्भात शासनाने कालबध्द कार्यक्रमांतर्गत…
आगामी शैक्षणिक वर्षासाठी विविध उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणीबाबत ठरविली दिशा साईमत/नाशिक/प्रतिनिधी : येथील महानगरपालिकेच्या मनपाच्या स्थायी सभागृहात शिक्षण विभागाची आढावा बैठक शुक्रवारी, १३ जून रोजी पार पडली. अध्यक्षस्थानी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे होते. बैठकीला शिक्षक आमदार किशोर दराडे, अजय बोरस्ते, विजय करंजकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, प्रदीप चौधरी (शहर), नाशिक शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ.मिता चौधरी यांनी स्लाईड शोद्वारे मनपा शिक्षण विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेतला. तसेच आगामी शैक्षणिक वर्षासाठी विविध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीबाबत दिशा बैठकीत ठरविण्यात आली. नाशिक महानगरपालिकेच्या…
शिरपूर पोलिसांच्या तत्परतेचे होतेय कौतुक साईमत/शिरपूर/प्रतिनिधी : चोरीला गेलेली होंडा सी.बी. शाईन मोटार सायकल शिरपूर पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या २४ तासांच्या आत सराईत गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हस्तगत करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिरपूर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल शिरपूर ठाणे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मनोहर दत्तात्रय कोळी (वय ३०, रा.अर्थ खुर्द, ता. शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ७ जून रोजी दुपारी ३.३० ते ४.४५ वाजेच्या सुमारास त्यांची ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा सी.बी. शाईन (क्र.एम. एच. १८, बी.बी.५५२६) मोटारसायकल शिरपूर शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स समोरून चोरीला गेली होती. अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून दुचाकी चोरून नेल्याची…
सुकाणू समितीच्या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांची माहिती साईमत/धुळे/प्रतिनिधी : जिल्ह्यात डायरिया आजाराचे प्रमाण कमी ठेवण्याकरीता केंद्र शासनाच्या सुचनेनुसार ‘स्टॉप डायरिया अभियान २०२५’ हे अभियान १ जून ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली. विशेष जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १५ मे रोजी सुकाणू समितीची बैठक झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.तरन्नुम पटेल तसेच अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यात १ जून ते…
अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात जि.प.च्या सीईओ मिनल करनवाल यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासासोबत शिस्त, सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले. त्या शुक्रवारी, १३ जून शहरातील जी.एस. मैदानाजवळील विद्यानिकेतन शाळेत सुरु केलेल्या अभ्यासिकेत आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. यशस्वी उमेदवारांचे व्हिडीओ बघून अभ्यासाची पद्धत ठरवू नका. स्वतःच्या क्षमतेनुसार योग्य पद्धतीने अभ्यास करा. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. प्रत्येक परीक्षेसाठी एक निश्चित अभ्यासक्रम असतो. तो डोळ्यासमोर ठेवून मागील…
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली पूर्व तयारीची बैठक साईमत/नाशिक/प्रतिनिधी : येथे २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे. संमेलनाच्या पूर्व तयारीसाठी कार्यालय सुरू करून नियोजनाचा नियमितपणे आढावा घ्यावा, अशा सूचना उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात शुक्रवारी, १३ जून रोजी दुपारी विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समीक्षक डॉ. वरखेडे, कुलगुरू डॉ. सोनवणे, ॲड. ठाकरे यांच्यासह उपस्थित साहित्यिकांनी विविध सूचना केल्या. यावेळी आ.सीमा हिरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकुमार देवरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, मराठी भाषा…
विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेने आगार प्रमुखांना दिले निवेदन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील बस स्थानकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोऱ्या आणि गैरप्रकार पाहता आगार परिसरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, दिव्यांगांना एसटी बसमध्ये आरक्षित जागेवर बसण्यासाठी मदत करण्यात यावी, दिव्यांगांसाठी स्थानकावर व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने शुक्रवारी, १३ जून रोजी आगार प्रमुखांना देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पवन माळी, दिव्यांग नवी दिशाचे रवी झाल्टे अपंग एकता संघटनेचे संगीता जोशी, यमुनाबाई, अंबाबाई, जीवन राठोड यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर आगार प्रमुख दिनेश नाईक यांनी संबंधित निवेदनाची योग्य ती दखल घेत योग्य ती…
निवडणुकीसाठी शिंदे अन् अजित पवार गटाचीही तयारी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अद्याप निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी आत्तापासूनच मनपाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. भाजपने शक्य तिथे महायुती आणि ज्या ठिकाणी ताकद आहे तेथे स्वबळाची भाषा वापरली आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिंदे आणि अजित पवार गटाने मात्र एकत्र येत वेगळी ‘चूल’ मांडण्याची तयारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महायुती सरकारमधील तीनही नेते ठामपणे भूमिका घेताना दिसत नाहीत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्य तिथे महायुती करून निवडणुका लढवू, असे विधान केल्याने काही ठिकाणी स्वबळाचे संकेत दिले आहेत. तसेच स्थानिक…
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उबाठातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे शिवसेना उबाठाच्यावतीने शुक्रवारी, १३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या उबाठा गटाने दिला आहे. जळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पंचनामे करून त्वरित भरपाई मिळावी, यासह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे, सरसकट कर्जमाफी द्यावी,…