Author: Sharad Bhalerao

मान्यवरांच्या उपस्थितीत झाला नवागत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव साईमत/धुळे/प्रतिनिधी : ‘मुला-मुलींना शाळेत पाठवू या, सारे शिकुया, पुढे जाऊया, चला जाऊ शाळेला, नव्या गोष्टी ऐकायला, आधी रोटी खाऐंगे, स्कूल जरुर जाऐंगे, बच्चे मांगे प्यार दो, शिक्षा का अधिकार दो’ च्या जयघोषात नवागत विद्यार्थ्यांचा, कुठे बैलगाडीतून तर कुठे बग्गीतून मिरवूणक काढून शाळा प्रवेशोत्सव सोहळा सोमवारी साजरा झाला. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या उपस्थितीत धुळे तालुक्यातील तिखी येथे नवागत विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास तहसीलदार अरुण शेवाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.किरण कुवर, गटशिक्षणाधिकारी भारती भामरे, सरपंच कविता पाटील, विस्तार अधिकारी (शिक्षण) सतिलाल कोळी, मुख्याध्यापिका ललीता बोरसे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब बेलदार यांच्यासह विद्यार्थी,…

Read More

बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख, संपर्क साधण्याचे आवाहन साईमत/धुळे/प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार देशभरात १५ ऑगस्टपर्यंत ‘साथी मोहीम’ राबविण्यात येणार आहे. रस्त्यावरील बेवारस व निराधार बालकांनाही आता आधार कार्ड मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा स्थायी समितीची स्थापना केली आहे. ही समिती सर्वे करून विविध ठिकाणी आढळलेले १८ वर्षाखालील बालक ज्यांच्याकडे कसलेही पुरावे नाहीत, अशा निराधार बालकांना आधार कार्ड ओळखपत्राच्या माध्यमातून ओळख निर्माण करून देणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण एन. कुलकर्णी यांनी दिली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा…

Read More

तीन संशयितांना घेतले ताब्यात, एरंडोलला खुनाचा गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील अवघ्या १३ वर्षांच्या तेजस गजानन महाजन ह्याचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, १७ जून रोजी सकाळी उघडकीस आली. खर्ची गावाजवळ त्याचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा खून नरबळीच्या संशयातून झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी एरंडोल पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे तेजस महाजन हा आपल्या आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत वास्तव्यास होता. त्याचे वडील शेतीसोबतच हार्डवेअरचे दुकान…

Read More

ओझरला तमायचे युवा फाउंडेशनच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट यांचे प्रतिपादन ओझर, ता.जुन्नर/जळगाव : आजही कंजरभाट समाजातील शिकलेल्या मुला-मुलींना नोकरी नाही. उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार फिरताना युवक दिसत आहे. शिक्षणात आपली मुले-मुली भटकू नये, आजारी असलेल्यांची अवस्था वाईट होऊ नये, सगळ्या लोकांना मदत व्हावी. तसेच राज्यभरातील तमायचे संघातील लोकांना सशक्त व समृद्ध करून महिलांना सशक्तीकरण करून तळागाळातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट यांनी केले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र विघ्नहर ओझर येथे विमुक्त कंजारभाट समाजातील तमायचे परिवार युवा फाउंडेशनची सामाजिक सशक्तीकरण व प्रबोधन बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला उपस्थित…

Read More

शनिपेठच्या पोलीस निरीक्षकांनी सर्व हॉकर्सला दिली तंबी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील चौकाचौकांमध्ये भाजीपाला विक्रेते व्यवसाय करतात. त्यातील काही हॉकर्स त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्याचा वाहनचालकांसह पादचारी नागरिकांना त्रास होतो. बळीराम पेठ आणि शनिपेठ येथे मुख्य मार्गांवर हॉकर्स गाड्या लावतात. यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत कावेरी कमलाकर यांनी अशा बेशिस्त हॉकर्सला शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सोमवारी, १६ जून रोजी स्वतः पायी फिरून सर्वांना तंबी दिली आहे. दरम्यान, कावेरी कमलाकर यांच्या कार्यकाळात बळीराम पेठ आणि शनिपेठचा मुख्य रस्ता सोबतच गल्ल्या मोकळा श्वास घेतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केले आहे. जळगाव शहरात दररोज शनिपेठ…

Read More

एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुदैवाने बचावले ; एक ताब्यात, तिघे फरार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अशा घटनांना आळा बसावा, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. अशातच रविवारी, १५ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गोवंश तस्करी करणाऱ्या इनोव्हा वाहनाचा मुक्ताईनगरजवळून पाठलाग सुरु केला. त्यांना हे वाहन अकोला जिल्ह्यात पकडण्यात यश आले. परंतु, वाहनातील तस्करांनी पोलिसांवर हल्ला चढविला. तस्करांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना वाहनाने चिरडण्याचाही प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक अनिल जाधव…

Read More

पिंप्राळा परिसरात एलेमेंटरी परीक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : मुले सकारात्मक पध्दतीने घडतात. त्यांना त्यांच्या आवडीनुसार काम करू द्या. अनेकवेळा पालकांकडून मुलांच्या कला दाबल्या जातात. पालक त्यांच्यावर दडपण टाकतात. अशातच चित्रकला हा पण अभ्यासाचा एक भाग आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना रागवू नये. मुलांना चित्रकलेतही ‘करिअर’ करता येणार असल्याचे भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे सिनियर सेकंडरी इ.एम.स्कुलचे सेवानिवृत्त ज्येष्ठ कलाशिक्षक राजेंद्र जावळे यांनी सांगितले. शहरातील पिंप्राळा परिसरातील कलादर्शन ड्राॅईंग क्लासेसतर्फे एलेमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद सोनवणे, गिरीष डेरे, जितेंद्र चौधरी, नृत्यकला दिग्दर्शक नरेश बागडे आदी उपस्थित होते. गुणगौरव सोहळ्यात…

Read More

एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील तांबापुरा भागातील परिसरात राहणाऱ्या एका तरुणीच्या घरात घुसून अश्लिल चाळे करून धमकी देत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी, १५ जून रोजी दुपारी १ वाजता घडला आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील एका भागातील २० वर्षीय तरुणी ही वास्तव्याला आहे. १५ जून रोजी दुपारी १ वाजता पीडित तरुणी ही घरी असताना परिसरात राहणारा नाझीर (पूर्ण नाव मिळू शकले नाही) हा तरुणीच्या घरात घुसून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर याबाबत पीडित तरुणीने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल…

Read More

आपत्ती व्यवस्थापनासह विविध योजनांचा घेतला आढावा साईमत/नवापूर/प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी नवापूर तालुक्याचा दौरा करत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीला पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. उपस्थित होते. नवापूर येथील तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत मान्सूनपूर्व तयारी, संभाव्य पूरस्थिती आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या. विशेषतः रंगावली व इतर नद्यांना पूर आल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर प्रभावी नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश दिले. सर्व गावांमध्ये ‘आपदा मित्र’ तयार करून त्यांना आपत्ती काळात कृतीशील राहण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही आढावा घेतला. स्थानिक वनपट्टे धारकांशी साधला…

Read More

बारा आठवड्यात सर्वेक्षण करुन न्यायालयाकडून कारवाईचे निर्देश साईमत/नाशिक/प्रतिनिधी : महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मागील बाजूस पाटबंधारे विभागाच्या जागेवर वसलेल्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीवर आता ‘हातोडा’ पडणार आहे. झोपडपट्टीचे बारा आठवड्यात सर्वेक्षण करून ती हटवावी, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते रतन लध यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने झोपडपट्टी हटविण्याचे आदेश दिले आहेत. ‘पीटीसी’च्या मागील बाजूस आणि कृषिनगर जॉगिंग ट्रॅककडे जाताना पाटबंधारे विभागाच्या जागेवर सिद्धार्थनगर झोपडपट्टी आहे. गंगापूर धरण थेट पाइपलाइन योजनेवरच ही झोपडपट्टी असल्याने ती अनधिकृत आहे. ती हटविण्यासाठी लध यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू असतानाच…

Read More