रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्क्यावर घडली घटना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या मालधक्क्यावर काम करताना एका तरुणाच्या डोक्यावर लोखंडी हुक पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी, १८ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. होतकरू आणि कष्टाळू कामगाराच्या मृत्यूमुळे धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कैलास रमेश माळी (वय २७, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो लहान भाऊ, काका यांच्यासह पाळधी येथे वास्तव्यास होता. मालधक्क्यावर काम करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, कैलास हा नेहमीप्रमाणे बुधवारी, १८ रोजी कामावर…
Author: Sharad Bhalerao
जागतिक सिकलसेल दिनानिमित्त लेख सिकलसेल हा एक अनुवंशिक आजार आहे. त्याचा अर्थ आई किंवा वडील या रोगाने पीडित किंवा रोगाचे वाहक असतील तर हा रोग एका पिढीतून दुसऱ्या पीडित जातो. ॲनिमिया म्हणजे शरीरातील रक्ताचे (पर्यायाने) रक्तातील हिमाेग्लोबीनचे प्रमाण कमी होणे. हा लाल रक्तपेशींशी निगडित असलेला आजार आहे. सामान्यतः गोल असणाऱ्या लाल रक्तपेशी कोयत्याच्या आकार घेतात. रोग्याच्या शरीरातील प्लिहा ही मोठी होत जाते. त्यामुळे रोग्याला ॲनिमियाबरोबर कावीळ होते. सिकलसेल हा रोग प्रामुख्याने दोन प्रकारात आढळतो. एक म्हणजे पीडित रोगी व दुसरा म्हणजे वाहक. पीडित रुग्णांना वारंवार व जास्त प्रमाणात त्रास होतो. सिकलसेलग्रस्त असल्यास त्याला औषधोपचाराची गरज असते. सिकलसेल वाहक असल्यास बाह्यता…
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना मनसेने दिले निवेदन साईमत/यावल/प्रतिनिधी : शहरातील वैकुंठधामात (स्मशानभूमी) लाईट लावणे, स्वच्छता ठेवणे तसेच यावल शहरात कीटकनाशक धुर फवारणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केली आहे. यासंदर्भात यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे मनसेने केली आहे. निवेदनावर मनसेचे राज्य उपाध्यक्ष जनहित विभाग चेतन आढळकर, किशोर नन्नवरे, गौरव कोळी, शाम पवार यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाच्या प्रती आरोग्य मंत्री, आयुक्त नाशिक, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावल शहरातील व्यास मंदिराच्या मागील वैकुंठधामात लाईटची व्यवस्था नाही. त्याठिकाणी एकच हायमस्ट लावला आहे. उर्वरित ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही. वैकुंठधामात सायंकाळी अग्नीडाग देतांना पुरेसा प्रकाश नसतो. स्मशानभुमीतील गैरसोयीमुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित…
ग्रामपंचायत प्रशासनाचा बेफिकीर कारभार साईमत/सावदा, ता. रावेर/प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बु.येथील ग्रामपंचायतीच्या जीर्ण झालेल्या जलकुंभाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. जलकुंभ अतिशय जीर्ण झाला आहे. जलकुंभावरील छताचे ढेकळी पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष जलकुंभ कधी ढासळेल आणि प्राणहानी, जीवितहानी होईल, हे सांगताच येत नाही. हा जलकुंभ मोठा वाघोदा येथील बसस्थानक परिसरात आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी आहे. जलकुंभाखाली १० व्यावसायिक दुकानांचे गाळे असलेले व्यापारी संकुल, पान टपरी आहे आणि याच व्यापारी संकुलात व्यावसायिकांच्या दुकानात नेहमीच ग्राहकांची गर्दी, सतत नागरिकांची वर्दळ असते. कदाचित अचानक हा जलकुंभ ढासळला तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जीर्ण जलकुंभाबाबत ग्रामपंचायतीकडे…
चोरट्यांचा संगणकाच्या तीन संचावर डल्ला, गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धीविनायक चौकात रात्रीच्या वेळी बंद असलेल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून चोरट्यांनी संगणकाचे तीन संच लांबविले आहे. ही घटना १४ जूनला रात्री ते १५ जून रोजी सकाळच्या दरम्यान घडली. साहित्य चोरी झाल्याचे १५ रोजी सकाळी सात वाजता लक्षात आले. दरम्यान, चोरी झालेल्या परिसरात एकाकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे. मात्र, ते बाहेरगावी गेलेले असल्याने फुटेज मिळू शकले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धीविनायक चौकात मनीषा विशाल पाटील (वय ४३) यांचे घराशेजारीच कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. तेथे विद्यार्थ्यांचे क्लास घेतले जातात. १४ जून…
पहिल्याच दिवशीच विद्यार्थ्यांनी लावली शाळेत हजेरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सी.बी.एस.ई.पॅटर्न) येथे शाळेच्या पहिल्या दिनानिमीत्त शाळेत ‘प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टयानंतर पुन्हा शाळेत परततांना विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. प्रथम दिवशीच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. शाळेच्या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षाव करुन स्वागत केले. प्रथम दिनानिमित्त शाळेत उत्तम अशी सजावट केली होती. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी मुलांचे स्वागत करुन त्यांचे औक्षण केले. तसेच शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांचा सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी तसेच आ.सत्यजित तांबे यांच्यासोबत झालेल्या सभेतील निर्णयांची कार्यवाही करणे, कार्यालयातील दप्तर दिरंगाईबाबत जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, इतर सर्व सहयोगी संघटनांच्यावतीने मंगळवारी, १७ जून रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणा दिल्या. आंदोलनानंतर श्रीमती सुर्वे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात ज.जि. माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एच.जी.इंगळे, सचिव एस.डी.भिरुड, ज्येष्ठ शिक्षक नेते आर.एच. बाविस्कर, संभाजी पाटील, जे.के.पाटील, मुख्याध्यापक संघाचे गोपाळ पाटील, सी.के. पाटील, जिल्हा प्राध्यापक संघटनेचे सुनील गरुड,…
जामनेरातील गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रवेशोत्सवाचे उद्घाटन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाला १६ जून रोजी पुन्हा सुरूवात झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर गजबजून गेला होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी गावात प्रवेश फेरी काढून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले तर शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांना आपल्या मुलांना शाळेत दाखल करण्याचे आवाहन केले. प्रवेशोत्सवाचे उद्घाटन जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सकाळी शाळेत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी उत्साहात स्वागत केले. वर्गात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गावातून एक छोटी जनजागृती फेरी काढली. फेरीत ‘शाळेत चला, ज्ञान मिळवा!’, ‘शिक्षण हेच खरे…
जी. एम. फाउंडेशन, खान्देश केटरिंग असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील जी. एम. फाउंडेशन आणि खान्देश केटरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या सहकार्याने पंडित प्रदीप मिश्रा यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री सामुदायिक मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबीर आयोजित केले होते. शिबिरात ५२५ नागरिकांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते तपासणी करण्यात आली. तसेच ६० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शिबिराला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जी. एम फाउंडेशनचे आरोग्यदूत पितांबर भावसार, खान्देश केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव रतन सारस्वत उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते…
संशयित तीन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मोहन टॉकीज परिसरातील एका घरात अवैधरित्या गॅस भरणा केंद्र उभारले होते. या केंद्रांवर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकत ६१ सिलेंडर जप्त केले असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी संशयित तीन जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे. तसेच रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? त्याचा शोध घेत आहे. अवैध गॅस भरणा केंद्रामुळे या भागातील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शनिपेठ पोलिसांनी २८ व्यावसायिक सिलिंडर (१० भरलेले, १८ रिकामे) आणि ३३ घरगुती सिलिंडर (१३ भरलेले, १० रिकामे) जप्त केले आहेत. अवैधरित्या गॅस भरण्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी…