जि.प.च्या सीईओ मिनल करनवाल यांच्या अनोख्या उपक्रमाची घोषणा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुख आणि गटविकास अधिकारी यांना प्रशासकीय काम करताना प्रोत्साहन मिळावे, चांगले काम केल्याबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, यादृष्टीने महिनाभरात विविध विषयांबाबत उत्तम काम करणाऱ्या विभागप्रमुख, गटविकास अधिकारी यांना प्रोत्साहनपर अर्ध शासकीय पत्र देण्याची घोषणा केली आहे. मे महिन्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार आणि जामनेर येथील गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांची निवड केली आहे. प्रशासकीय काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करून विहित कालावधीत ठरलेली कामे पूर्ण करून त्या बाबींचा लाभ सामान्य घटकापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न…
Author: Sharad Bhalerao
मनपा आयुक्तांकडे मनसेची निवेदनाद्वारे मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : स्व.पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या कार्याचा प्रेरणादायी ठसा जनमानसावर उमटावा, या उद्देशाने जळगाव शहरातील एका प्रमुख चौकाला त्यांचे नाव द्यावे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना नुकतेच दिले. निवेदन देतांना मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले, उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, ललित शर्मा, सतीश सैंदाणे, राजेंद्र निकम, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, प्रकाश जोशी, ॲड. सागर शिंपी, किशोर खलसे, ऐश्वर्या श्रीरामे उपस्थित होते. निसर्गप्रेमी, साहित्यिक चितमपल्ली हे नामवंत पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक, लेखक व पर्यावरण कार्यकर्ते होते. २००९ मध्ये जळगाव शहरातील ‘वसुंधरा…
ओव्हरटेक करण्याचा नाद भोवला साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी : शिंदखेडा-विरदेल रस्त्यावरील दलवाडे प्र.न.फाट्याजवळ जळगाव-नंदुरबार बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक होऊन बसमधील ९ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना धुळे येथे पाठविण्यात आले आहे तर बसमधील इतर १२ जखमींना शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात ओव्हरटेक करण्याच्या नादात झाला आहे. घटनास्थळी बिट हवालदार गणेश सोनवणे दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. दोन्ही वाहनवरील चालकांना धुळे येथे उपचारासाठी रवाना केले आहे. जळगाव येथून नंदुरबारकडे जात असलेली नंदुरबार आगाराची एसटी बस (क्र.एमएच २० बीएल ४०२५) आणि ट्रक (क्र.एमएच १८ बीझेड ६६१८)यांच्यात दलवाडे फाट्याजवळ समोरासमोर धडक दिल्याने मोठा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही…
शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला मिळाला प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महानगर शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात प्रतिभा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, शिवसेना सदस्य नोंदणी अभियान, राजमालती नगर येथे वृक्षारोपण, पांझरा पोळ येथील गोशाळा येथे चारा आणि कुट्टीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महानगर प्रमुख संतोष पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, समन्वयक राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, उपमहानगरप्रमुख प्रमोद शिंपी, सागर पाटील, युवासेना उप महानगरप्रमुख सनी सोनार, वेदांत पाटील, शिवम सोनवणे, अमर राजपूत, राहुल पाटील, पंकज सोनवणे, नयन चव्हाण, दीपक सोनवणे, धीरज सोनार, दुर्गेश महाजन, निलेश…
उपासमारीची वेळ आल्याने विक्रेत्यांचा टाहो : मनपा उपायुक्तांना दिले निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील महात्मा फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमधील शेकडो हॉकर्स विक्रेत्यांवर १ जून २०२५ पासून जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमुळे उपासमारीची वेळ आली आहे. कारवाईमुळे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत हॉकर्सचे व्यवसाय बंद पडले आहे. त्यांच्या कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पथविक्रेता समिती गठीत झाली आहे.तात्काळ कार्यान्वित करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन मनपाच्या उपायुक्तांना महात्मा फुले, सेंट्रल फुले मार्केट हॉकर्स युनियनतर्फे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अतिक्रमण पथकाच्या कारवाईमुळे हॉकर्स बांधवांचे व्यवसाय पूर्णपणे थांबले आहेत. जून महिन्यात शाळा सुरू झाल्याने मुला-मुलींच्या शिक्षणावर गदा येण्याची शक्यता निर्माण…
पांझरा रिव्हर फ्रंटसह विविध मागण्यांवर मंत्रालयातील बैठकीत कार्यवाहीची ग्वाही साईमत/धुळे/प्रतिनिधी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा करण्यासह भविष्यातील गरज पाहता प्रकल्पामध्ये धुळे शहरासाठी पुढील ५० वर्षांकरिता पाण्याचे आरक्षण करण्याची गरज आहे. शहरातून वाहणाऱ्या सुशी नाल्याच्या दोन्ही काठांवर रिटेनिंग वॉल बांधून नाल्याचे संवर्धन करणे, पांझरा रिव्हर फ्रंटअंतर्गत दोन्ही काठांवर विविध कामांसह सुशोभीकरण करणे, प्रकाशा-बुराई प्रकल्पातून मालनगाव धरणापर्यंत स्वतंत्र उदनलिका टाकून मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरणे, अशा आ.अनुप अग्रवाल यांच्या आग्रही मागण्यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत त्वरित कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मुंबई येथील मंत्रालयात मंगळवारी, १७ जून रोजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात धुळे…
माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांना यश साईमत/धुळे/प्रतिनिधी : साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरण (निम्न पांझरा प्रकल्प) २०१८ मध्ये पूर्ण झाले. परंतु आज अक्कलपाडा धरण पूर्ण भरता येत नाही.शासनाच्या नियमानुसार फक्त ६५ टक्के भरले जाते जर कधी १०० टक्के धरण भरले तर जी जमीन अधिग्रहीत नाही. त्या जमिनीत धरणाचे पाणी जाते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. त्यामुळे धरण फक्त ६५ टक्के भरले जाते. त्यापेक्षा जास्त पाणी आले तर त्याचा विसर्ग करावा लागतो. अश्या रितीने ३५ टक्के पाणी म्हणजे १.६ टीएमसी क्षमतेचे धरण बांधायचे असेल तर त्याला खर्च येतो ८०० कोटी रुपये म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे की, अक्कलपाडा धरण १०० टक्के…
परिवाराच्या आक्रोशाने परिसर हेलावला साईमत/जळगाव/प्रतिनिधी: घरी उशिरा आल्याच्या कारणावरून वडिलांनी रागावल्याने आणि किरकोळ मारहाण केल्याने एका अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करुन जीवन संपविल्याची घटना गुरुवारी, १९ जून रोजी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. प्रज्ञा रवींद्र शिंदे (वय १६, रा. खेडी हुडको परिसर, जळगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रज्ञाचे वडील रवींद्र शिंदे हे सेंटिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना पत्नी, तीन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे. १८ जून रोजी सकाळी प्रज्ञा घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली…
भावाचा आक्रोश अन् तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी: आपल्या भावासोबत पहिल्यांदाच पुण्याला नोकरीच्या शोधात निघालेल्या एका परप्रांतीय तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना १८ जून रोजी मोहाडी शिवारात रात्रीच्या सुमारास मोहाडी शिवारातील रेल्वे खांब क्रमांक ४०९ ते ४१० दरम्यान घडली. मयत तरुणाचे नाव राहुल साहब सरोज (वय २३, रा. शिकरारा, अलिशाहपूर, जौनपूर, उत्तर प्रदेश) असे आहे. दरम्यान, याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. उत्तर प्रदेशातील शिकरारा गावात राहुल सरोज हा आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होता. त्याचा मोठा भाऊ गोपाळ पुण्यात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतो. कुटुंबाला आणि भावाला आर्थिक हातभार लागावा, अशा…
धक्का लागल्याच्या कारणावरुन केला मुलाचा खून, तिसरा साथीदार फरार साईमत/जळगाव/प्रतिनिधी: एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १४ वर्षीय तेजस गजानन महाजन ह्याचा खून करून पळून गेलेल्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केवळ ३६ तासात ताब्यात घेतले आहे. सोमवारी, १६ जून रोजी तेजसच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी ग्रामस्थांनी रास्ता रोको करत तातडीने तपास करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिल्यानंतर दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, त्यांचा तिसरा साथीदार फरार असून त्याचाही मागोवा पोलिसांकडून सुरु असल्याचे सांगण्यात आले.…