Author: Sharad Bhalerao

पीअर एज्युकेटर्स यांना भेट वस्तूंचे वाटप साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुला-मुलींना किशोरवयात येणाऱ्या समस्या, वयामध्ये होणारे बदल तसेच सुयोग्य आहाराबाबत सविस्तर मागदर्शन करण्यात आले. तसेच पीअर एज्युकेटर्स यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कोमल देसले,राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमाच्या समन्वयक वैशाली अहिरे उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ.सोनवणे, डॉ.देसले यांनी उपस्थित किशोरवयीन मुला-मुलींना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित आशा स्वयंसेविका यांचे कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूर व गरोदर माता यांच्या घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुला-मुलींना…

Read More

जुक्टो संघटनेने संबंधितांना दिले मागणीचे निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : राज्यातील अंशतः अनुदानित तत्त्वावरील उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसह प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसाठी वाढीव २० टक्के अनुदानाचा शासन आदेश १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केला. गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यासाठी अत्यावश्यक आर्थिक तरतूद करणे अपेक्षित होते. मात्र, राज्यातील सर्व विभागातील शिक्षक आमदारांनी जोरदार मागणी करूनही शासनाने यामागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना राज्यातील समस्त अंशतः अनुदानित शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा पूर्वलक्षी प्रभावाने त्वरित लागू करावा, अशी मागणी जुक्टो संघटनेने केली आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्यावतीने शासन दरबारी प्रयत्न करण्याबाबत जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने उपाध्यक्ष डॉ.अतुल…

Read More

पद्मालय विश्रामगृहात आयोजित बैठकीत कास्ट्राईब संघटनेच्या कार्याध्यक्षांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शासकीय, निमशासकीय क्षेत्रात काम करणारा कर्मचारी हा आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतो. अशावेळी अनेक विविध समस्या, लोकसंपर्काच्या दृष्टीकोनातून येणाऱ्या अडचणी लोकप्रतिनिधींचा असणारा कामासाठीचा दबाव, दडपण याचा विचार करता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘कर्मचारी संघटना’ ही साधन आहे. संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अबाधित राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांनी केले. शहरातील पद्मालय विश्रामगृहात आयोजित संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष सुनील सोनवणे होते. शासकीय, निमशासकीय तसेच प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कायद्याच्या चौकटीत रहावे. नियम, नियमावलीला अवगत करावे. आपल्याकडे येणाऱ्या…

Read More

जि.प.च्या सभागृहात पार पडली समुपदेशन प्रक्रिया साईमत/नाशिक/प्रतिनिधी : जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत अनुकंपा तत्त्वावर ज्येष्ठता यादीत प्रतिक्षेत असलेल्या ३४ उमेदवारांना गट ‘ड’ संवर्गात तर सध्या अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या गट ‘ड’ मधील पात्र ६ कर्मचाऱ्यांना गट ‘क’ मधील पदावर अशा ४० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. अनुकंपा तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या धोरणानुसार, जिल्हा…

Read More

वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे : ग्रामस्थांची मागणी साईमत/नवापूर/प्रतिनिधी : तालुक्यातील कोठडा शिवारात आणि रायगण परिसरातील शिवम जिनिंगजवळ शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने दहशतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये, विशेषतः शेती कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी आठ वाजेच्या सुमारास काही शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना कोठडा परिसरातील शिवम जिनिंगजवळ त्यांना अचानक बिबट्या दिसला. बिबट्याच्या पायाचे ठसे परिसरात स्पष्टपणे दिसून आले आहेत. जे बिबट्याच्या नियमित संचारचे द्योतक आहे. त्यामुळे बिबट्याची उपस्थिती केवळ तात्पुरती नाही. तो परिसरातच वावरत असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बिबट्यामुळे शेतीची कामे करणे धोकादायक बनले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन…

Read More

भाजपतर्फे स्मारकाजवळ फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष साईमत/धुळे/प्रतिनिधी : शहरात सुरू असलेल्या विकासकामांना विरोध करण्याचे, खास करून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोधाचे कारस्थान करत उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांना सणसणीत चपराक बसली आहे. त्यामुळे आता रयतेचे राजे असलेल्या छत्रपतींचे स्मारक मोठ्या उत्साहाने, दिमाखदारपणे भव्य स्वरूपात पूर्ण होईल. उबाठाच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आता जनताच उत्तर देईल. विरोधकांना आणखी कुठे जायचे असेल तर खुशाल जावे, असे आव्हान आ.अनुप अग्रवाल यांनी दिले. शहरातील मनोहर चित्रपटगृहाजवळ सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती.…

Read More

मानसिक आरोग्यासाठी सदैव योग करण्याचा विद्यार्थ्यांनी केला निर्धार साईमत/साक्री/प्रतिनिधी : येथील आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन योगाभ्यास करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एन. के. शिंदे यांनी योग शास्त्राचे महत्व सांगत योगविद्या भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी शारीरीक तंदुरुस्ती सोबत मानसिक आरोग्यासाठी सदैव योग करण्याचा निर्धार केला. योग क्रीडात विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग विद्यालयाचे क्रीडा शिक्षक डी. सी.बेडसे, योग अभ्यासक तथा योगगुरू एच.जे.देवरे तसेच धुळे येथील सहजयोग केंद्रातील योगगुरू यांनी विद्यार्थ्यांसमोर योगासने, प्राणायाम करून दाखविले. विद्यार्थ्यांनी योग क्रीडात सहभाग घेतला. सहावीची विद्यार्थिनी आराध्या हिने विशेष योगासने सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Read More

नियमित योगा केल्याने शरीरातील ताणतणाव होतो दूर साईमत/साक्री/प्रतिनिधी : येथील विद्या विकास मंडळ संचलित जिजामाता कन्या विद्यालयात शनिवारी, २१ जून रोजी योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी यांनी विद्यालयाच्या मैदानावर योगासनाचे विविध प्रकार प्रात्याक्षिकाद्वारे करुन योगाचे धडे घेतले. नियमित योगा केल्याने शरीरातील तणाव कमी होतो. शरीर मजबूत, एकाग्रता वाढते तसेच लवचिक होते. विविध आसने केल्याने स्नायू बळकट होतात. शरीराची हालचाल करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योग साधनेचे विशेष महत्त्व असल्याचे विद्यार्थिंनींना मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर योगा पोहचूून भारताचे नावलौकिक होण्याच्या दृष्टीने संपूर्ण भारत देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यानिमित्त विविध…

Read More

उपाध्यक्षपदी सुरेश सोनवणे यांची निवड, अनेकांनी केला निवडीबद्दल सत्कार साईमत/साक्री/प्रतिनिधी : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाची २०२५-३० ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात वाचनालयाच्या अध्यक्षपदी साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांची पदसिद्ध अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक सुरेश सोनवणे यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी साक्रीचे तहसीलदार तथा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून साहेबराव सोनवणे यांचा ज्येष्ठ संचालक सुरेश सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तहसिलदारांनी वाचनालयातर्फे वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. यावेळी नूतन कार्यकारिणीची…

Read More

मलनिस्सारणची टाकी फुल्ल, पिंप्राळा हुडको परिसरात पसरली दुर्गंधी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील नागरिकाने घराजवळील मलनिस्सारणाची सेफ्टिक टाकी फुल्ल भरल्याने त्यांनी रितसर मनपाकडे ८०० रुपये भरून पावती घेऊन पाच महिने उलटले आहे. मात्र, मनपाच्या आरोग्य विभागाने ‘झोपेचे सोंग’ घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिंप्राळा हुडको परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशातच डेंग्यू, मलेरियासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत मनपा प्रशासनाने त्वरित सेफ्टिक टाकी खाली करून देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जैनोद्दीन शेख सलीम मिस्त्री यांनी केली आहे. शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी अशपाक इब्राहिम पिंजारी यांच्या घराजवळील मलनिस्सारणची टाकी फुल्ल झाल्याने त्यांनी मनपा प्रशासनाला १०…

Read More