भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा साईमत/शिरपूर/प्रतिनिधी : येथील नगरपालिकेलगतच्या उद्यानात भाजपातर्फे बलिदान दिनानिमित्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तैलचित्राला उपस्थित सर्वांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कार्याबद्दल भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी माहिती देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर भाजपा माजी तालुकाध्यक्ष किशोर माळी, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, ग्रामीण मंडळ अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, जिल्हा चिटणीस हेमंत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, अल्पसंख्यक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र भोई, ओबीसी मोर्चाचे…
Author: Sharad Bhalerao
घरफोडी केल्याची दिली कबुली, नवापूर पोलिसांची कामगिरी साईमत/नवापूर/प्रतिनिधी : शहरातील घरफोडीच्या घटनेतील संशयित मुलास पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. तसेच चोरीला गेलेला दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई नवापूर पोलिसांनी केली. शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या जयेश शंकर वसावे यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले दागिने, मोबाईल, घड्याळ असा १ लाख ५२ हजार ६५० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. जयेश वसावे यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील यांनी तपासासाठी पथक तयार करून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात एका मुलाच्या संशयित…
सर्व तक्रारींचा शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्परतेने केला निपटारा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या २७ मे रोजी एरंडोल येथे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या शिक्षक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून झालेल्या शिक्षक तक्रार निवारण सभेतील उर्वरित प्रकरणांची आणि नव्याने आलेल्या प्रकरणांची २४ जून रोजी जि.प.च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात सभा घेण्यात आली. सभेत शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘नो पेंडिंग सिस्टीम’ ची ग्वाही दिली. शिष्टमंडळाचे नेतृत्व समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी केले. सभेला उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण, अधीक्षक प्रतिभा सुर्वे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी विविध विभागातील संबंधित अधिकारी यांच्याशी विविध प्रकरणांच्या अनुषंगाने…
जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील नवीन बसस्थानकातून सुटी असल्यामुळे जामनेर येथील मूळगावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना आरोग्य सेविकेच्या ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पोतवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ज्योती प्रमोद वाघ (वय ४७, रा. खोटे नगर, मूळ रा. जामनेर) असे त्या महिला आरोग्य सेविकेचे नाव आहे. जळगाव जिल्हा परिषदेत ज्योती वाघ ह्या आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. २१ जून रोजी त्या सुटीनिमित्त आपल्या मूळगावी जामनेरला जाण्यासाठी नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १३.२० ग्रॅम वजनाची आणि अंदाजे…
दुसरा चालक गंभीर जखमी, उपचारासाठी दाखल केले रुग्णालयात साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ दोन ट्रकच्या धडकेत एक ट्रक चालक जागीच ठार तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला झाल्याची घटना मंगळवारी, २४ जून रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार एका ट्रकने रस्ता ओलांडताना वेगावर नियंत्रण गमावल्यामुळे ही धडक झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ ओडिशा पासिंगचा ट्रक (क्र.ओडी-१५-सी-२९६३) आणि राजस्थान पासिंगचा ट्रक (क्र.आरजे-१४-जीटी-०४२१) यांच्यात समोरासमोर जबरदस्त धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की, एक ट्रक चालक केबिनमध्ये…
जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी: जिल्ह्यात वाढलेल्या मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कारवाईत चोरीचे तब्बल ३३ मोबाईल हस्तगत केले आहेत. तरुण नोरसिंह गुजरिया (वय २३, रा. इंदूर, मध्य प्रदेश) अशा संशयित आरोपीला कासमवाडी परिसरातून अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी, २३ जून रोजी पत्रकार परिषदेत दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे…
शिक्षण क्षेत्रातील संघटनांसह शिक्षकांनी बदल्यांबद्दल व्यक्त केला आनंद साईमत/नाशिक/प्रतिनिधी : नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात सदैव चर्चेत राहिलेला व वादग्रस्त निर्णयाने गाजलेल्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व उपसंचालकांच्या बदल्यांचे आदेश काढून शिक्षणमंत्र्यांनी वादग्रस्त अधिकाऱ्यांना अखेर चंद्रपूर, गडचिरोलीत पाठवून भाकरी फिरवली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन आदेशानुसार गट ‘ब’ मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. बदल्यांचे आदेश काढून शिक्षण विभागाने अर्थात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी वादग्रस्त अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवली आहे. झालेल्या बदल्यांबद्दल शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी, शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. नाशिक शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांची विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक…
नागरिकांसह क्रीडाप्रेमींमध्ये संताप, न.पा.च्या कारभारावर प्रश्नचिन्ह साईमत/नवापूर/प्रतिनिधी : कधीकाळी क्रिकेटपटूंच्या आवाजाने गजबजलेले आणि नवोदित खेळाडूंना घडवणारे नवापूर शहरातील दिगंबर पाडवी क्रिकेट मैदान आज केवळ अतिक्रमणाचा विळखा आणि प्रशासकीय दुर्लक्षाचे बोलके उदाहरण बनले आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेली खेळाडूंची इमारत आता भग्नावस्थेत आली आहे. तिचा वापर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आणि जुगार खेळणाऱ्यांचा अड्डा म्हणून होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मैदानाची झालेली दुरवस्था पाहून स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, नवापूरचे एकमेव क्रिकेट मैदान आता अतिक्रमणाने ग्रस्त झाले आहे. तसेच लाखो रुपये खर्चून उभारलेली इमारत आज केवळ इमारत…
घरगुती उपाय टाळा, लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा साईमत/धुळे/प्रतिनिधी : नागीण ही एक विषाणूजन्य त्वचेची समस्या आहे. ताप येणे तसेच डोकेदुखी ही काही सामान्य लक्षणे आहेत. तसेच थकवा जाणवणे आणि पोटदुखी ही सुरुवातीची काही लक्षणे आहेत. काही दिवसांनी काही गंभीर लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे अशा रुग्णांनी घरगुती उपचार करू नये, अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन धुळे जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. अभिषेक पाटील यांनी केले आहे. तज्ज्ञांच्या मते, नागीण आजार वेरिसेला झोस्टर या कांजण्यांच्या विषाणूमुळे होतो. त्यामध्ये शरीरावर पाण्याचे बारीक पुरळ किंवा फोड येतात. ज्यामुळे शरीराला खाज सुटते. जळजळ होते. तसेच वेदना आणि…
दर्शनचा भविष्यात अभिनेत्यासह मॉडेल बनण्याचा मानस साईमत/शहादा/प्रतिनिधी : येथील दर्शन विक्रांत धोबी हा धुळे येथे नुकत्याच झालेल्या मॉडेलिंग स्पर्धेत ‘ग्लेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र’ विजेता ठरला आहे. द गेम चेंजर प्रोडक्शन हाऊसकडून फाउंडर अनिकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथे मॉडलिंग प्रेझेंट शो घेण्यात आला. कार्यक्रमात शरद उगले आणि गायत्री ठाकूर परीक्षक होते. त्यांनी ग्लेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र मिस्टर ग्रुपचा विजेता कंटेस्टंट नंबर ४० दर्शनची निवड केली. तो शहादा येथील शिरूर चौफुली येथील प्रकाश नगरातील रहिवासी विक्रांत धोबी यांचा चिरंजीव आहे. दर्शनने दहावीपर्यंत व्हॅलंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळेत शिक्षण घेतले आहे. तसेच कै. सौ. जी. एफ. पाटील कॉलेजमध्ये बारावीत उत्तीर्ण झाला. तो…