रथोत्सवात लेझीमच्या तालावर आ.सुरेश भोळे यांनीही धरला ठेका साईमत/जळगाव/प्रतिनिधी : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावातील पिंप्राळा येथे रविवारी, ६ जुलै रोजी पांडुरंगाच्या रथोत्सवाच्या आयोजन केले होते. रथोत्सवात मोठ्या भक्तीमय वातावरणात ‘जय जय रामकृष्ण हरी’चा जयघोष करत ‘जय हरी विठ्ठलाचा’ जयघोष करत रथोत्सव पिंप्राळा येथून काढण्यात आला. रथोत्सवात विठ्ठलाच्या जयघोषात ‘भक्तांचा मेळा’ भरल्याचे दिसून आले. पिंप्राळा उपनगरातील श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंचमंडळ, ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सव यशस्वी पार पडला. रथोत्सवाची जवळपास १५० वर्षाची परंपरा आहे. त्यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करत भक्तगणांनी आपला सहभाग नोंदविला होता. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भाविक याठिकाणी विठुरायाच्या…
Author: Sharad Bhalerao
डॉ. मुखर्जींच्या विचारांसह राष्ट्रभक्तीला उपस्थित मान्यवरांनी केले नमन साईमत/शिरपूर/प्रतिनिधी : जनसंघाचे संस्थापक, महान देशभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त रविवारी, ६ जुलै रोजी भाजपातर्फे शिरपूर नगरपालिकेच्या डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात डॉ. मुखर्जींच्या तैलचित्र प्रतिमेस आ.काशिराम पावरा, धुळे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते माल्यार्पण करून त्यांच्या अतुलनीय योगदानाचे आदराने स्मरण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. मुखर्जींच्या विचारांसह त्यांच्या राष्ट्रभक्तीला नमन केले. देशाच्या एकात्मतेसाठी डॉ. मुखर्जी यांनी केलेला संघर्ष आणि दिलेले बलिदान हे राष्ट्रनिष्ठेचे सर्वोच्च प्रतीक आहे. ‘एक देश, एक विधान, एक निशान व एक प्रधान’ अशा त्यांच्या घोषणेने तत्कालीन परिस्थितीत देशाची एकता टिकविण्यासाठी महत्त्वाचे…
जळगाव जुक्टो संघटनेच्या मागणीचे आमदारांना दिले निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यात बहुतांश उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पदे गेल्या २०१२ पासून शिक्षक भरती बंद असल्याने रिक्त आहेत. अशावेळी व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेता संबंधित शिक्षण संस्थांनी प्रशिक्षित अर्हताधारक शिक्षकांची शासन नियमानुसार घड्याळी तासिका तत्त्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केली आहे. शिक्षकांना शासन शैक्षणिक वर्षाच्या शेवटी मानधन अदा करीत असते. मात्र, जळगाव जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून कार्यरत जवळपास २० शिक्षकांचे मानधन जे की अत्यंत तुटपुंज्या प्रमाणात आहे, ते शिक्षण आयुक्त स्तरावरून अद्यापही मंजूर न झाल्यामुळे संबंधित शिक्षकांना अद्यापही अदा झालेले नाही. त्यामुळे घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे थकीत मानधन त्वरित अदा…
माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी केले पालखीचे पूजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक, डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त रविवारी, ६ जुलै रोजी ‘पंढरीची वारी’ साजरी करण्यात आली. सुरुवातीला माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर शालेय परिसरातून टाळ, मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांसह दिंडी काढण्यात आली. तसेच भक्तीगीतांसह भजन गायनाने शालेय परिसराचे वातावरण भक्तीमय झाले होते. वारकरी सांप्रदायिक महोत्सवाचे त्या माध्यमातून महत्त्व विशद करण्यात आले. यावेळी विठ्ठल-रूख्मिणी, संतांच्या आकर्षक वेशभूषा धारण करून शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चिमुकल्या बालगोपाळांनी विठ्ठल नामाचा जप करत संपूर्ण परिसर भक्तीमय केला. विठ्ठल नामाच्या जपाबरोबरच विद्यार्थ्यांनी…
विविध कार्यक्रमांसह विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा होणार सत्कार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरापासून जवळील कुसुंबा येथील गट नं. ३८६, सद्गुरू धाम, पुरुषोत्तम पाटील नगर, स्वामी समर्थ शाळेच्या पुढील स्वामी समर्थ केंद्राजवळ सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज सेवा प्रतिष्ठानतर्फे सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा महोत्सव तसेच कल्पवृक्ष शिवमंदिर, स. स. दत्ता आप्पा महाराज पादुका मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा येत्या गुरुवारी, १० जुलै रोजी साजरा होणार आहे. यावेळी कार्यक्रमात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले. गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त १० जुलै रोजी सकाळी ९ ते ११ वाजता पाद्यपूजन, अभिषेक दासबोध ग्रंथ पूजन, सत्संग नाम संकीर्तन सुनील…
लेझीम पथकासह पर्यावरण विषयक घोषणांनी परिसर दणाणला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखीसह वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक विलास सांगोरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. लेझीम पथकासह पर्यावरण विषयक घोषणांनी परिसर दणाणला होता. तसेच सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दिंडीच्या समोरापानंतर सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष सांगोरे, संचालक भूषण सांगोरे, मुख्याध्यापिका योगिनी बेंडाळे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक निखिल जोगी, पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख अजय पाटील, पंकज सूर्यवंशी, लक्ष्मीकांत महाजन, प्रवीण पाटील , योगेंद्र पवार, अमृत पाटील, सुनील पाटील, संतोष चौधरी, राहुल देशमुख, सुनील साळवे,…
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची आग्रही मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यापूर्वी केवळ मुंबई, मुंबई उपनगरे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती. मात्र, यंदाच्या वर्षापासून त्याची व्याप्ती वाढवत संपूर्ण राज्यात एकाच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ३०जूनपासून सुरू झालेल्या पहिल्या फेरीत बऱ्याचशा त्रुटी आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक वर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा त्रुटींचे निरसन त्वरित व्हावे, पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या संचालकांना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्यावतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेता त्वरित…
वारकऱ्यांचे रूप परिधान करून विद्यार्थ्यांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सादरीकरण साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेषभूषेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुरुवातीला पालक संघाच्या सदस्य श्वेता लढ्ढा, लतिका राजपूत यांच्या हस्ते विठोबा, सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विठोबा, रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, वारकऱ्यांचे रूप परिधान करून सादरीकरण केले. शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी यांनी विधीपूर्वक पालखी पूजन केले. त्यानंतर शाळेपासून पिंप्राळा येथील भवानी मंदिरापर्यंत पारंपरिक दिंडीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग, ढोल, वीणा अशा पारंपरिक वाद्यांसह…
माजी विद्यार्थ्याने ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून राबविला स्तुत्य उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील आसोदा येथील समर्थ ॲक्वाचे संचालक जनार्दन तोताराम कोल्हे यांच्याकडून स्वातंत्र्यसैनिक तोताराम चावदस कोल्हे यांच्या स्मरणार्थ १५० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अनिल महाजन होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते. यावेळी जनार्दन कोल्हे म्हणाले की, मी या शाळेचा माजी विद्यार्थी असल्यामुळे शाळेप्रती असलेल्या आपुलकी आणि ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून उपक्रमाचे आयोजन करायचे ठरविले. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक गोपाळ महाजन, सूत्रसंचालन शुभांगिनी महाजन तर आभार अनिता पाटील यांनी मानले.
मागण्यासंदर्भात योग्य न्याय देण्याचे आयुक्तांनी दिले आश्वासन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांची कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेऊन नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या विविध अडचणी समस्या संदर्भात चर्चा केली. त्यांना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष सुनील सोनवणे, विभागीय अध्यक्ष रावसाहेब जगताप, महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, सल्लागार विजयकुमार मौर्य यांनी निवेदन दिले. याप्रसंगी प्रवीण गेडाम यांनी सकारात्मक चर्चा करून विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी तसेच मागण्यासंदर्भात योग्य प्रकारे न्याय देण्याचे आश्वासन दिले. निवेदनात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवेतील रिक्त पदांचा अनुशेष बिंदू नामावलीप्रमाणे भरण्यात यावा, ३१ डिसेंबर २०१७ ते ७ मे २०२१ या कालावधीमध्ये मागासवर्गीयांच्या…