एलसीबीच्या कारवाईत १३ मोबाईल, लाखोंच्या रोकडसह आठ जणांना अटक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील जयनगरातील सागरपार्क मैदानाजवळील हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये गुरुवारी, १० जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून जुगाराचा मोठा अड्डा उद्ध्वस्त केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या जुगाराच्या सत्रावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलमध्ये धाड टाकून कारवाई केली आहे. कारवाईत १९ लाख ९७ हजार रुपये रोख, १३ मोबाईल फोनसह आठ जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.…
Author: Sharad Bhalerao
ग्रामस्थ त्रस्त, कनिष्ठ अभियंता नसल्याने परिस्थिती बनली गंभीर साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील तळेगाव भागात गेल्या महिन्याभरापासून कनिष्ठ अभियंता नियुक्त नसल्यामुळे तळेगाव, शेळगाव आणि परिसरातील आठ गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सतत खंडित होणारी वीज सेवा आणि दुरुस्तीची विलंबित कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. जामनेर तालुक्यातील तळेगाव, शेळगावसाठी स्वतंत्र गावठाण वीज फीडरचे काम पूर्ण झाले असले तरीही संबंधित ट्रान्सफॉर्मर (विद्युत रूपांतरण यंत्र) बसविण्यात अद्यापही विलंब होत आहे. परिणामी, पावसाळ्यात वारंवार वीज खंडित होते आणि नागरिकांना अंधारात रहावे लागते. या गावांमध्ये एकाच वीजवाहिनीवरून आठ गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे या गावांपैकी कोणत्याही…
उत्कृष्ट भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक, माध्यमिक, डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवारी, १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. तसेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पुष्पगुच्छांसह भेटवस्तू देऊन स्वागत केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच महर्षी व्यास यांच्या महान कार्याची विद्यार्थ्यांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शाळेतील भार्गवी पाटील, चेतन सोनार, राशी धनपाल, मैथली देवरे या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. उत्कृष्ट भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक ज्ञानचंद…
जळगावातील कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह प्रतिनिधींचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भांतु समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीसाठी झटणाऱ्या भांतु समाज सेवा ट्रस्ट (रजि. क्र. १२९७/२०१८) यांच्यावतीने हरिद्वार येथे “भांतु भवन” धर्मशाळेच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी, ११ आणि शनिवारी, १२ जुलै रोजी केले आहे. अशा महत्त्वपूर्ण कार्याची प्रेरणा प.पू. महात्मा रोशन महाराज यांच्यामुळे मिळाली आहे. त्यांच्या आशिर्वादाने भव्य उपक्रम प्रत्यक्षात येत आहे. भूमीपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विशेषतः जळगाव येथून कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह प्रतिनिधी गुरुवारी, १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता हरिद्वारकडे रवाना झाले आहेत. भूमिपूजन सोहळ्यासाठी जळगावसह पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर…
९ तरुणांवर कारवाई, २५ तरुणांना समज देवून सोडले साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शाळांसह महाविद्यालय परिसरातील विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिसांनी पुन्हा एकदा ठोस आणि जनहितकारी पावले उचलली आहेत. दामिनी पथकाच्या माध्यमातून जळगाव शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात गस्त वाढविली आहे. टवाळखोरी करणाऱ्या व छेडछाड करणाऱ्या मुलांवर पोलिसांकडून तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. अशातच दामिनी पथकातील पोलीस अंमलदारांनी त्वरित कारवाई करत ९ तरुणांवर कारवाई केली. २५ तरुणांना समज देवून सोडण्यात आले. दामिनी पथकाच्या कारवाईमुळे परिसरातील पालकांसह विद्यार्थिनींमध्ये एक सकारात्मक व सुरक्षिततेच्या भावनांचा जागर झाला आहे. पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी प्रत्येक पो.स्टे.मधून २ पुरुषांसह १ महिला अंमलदार अशा १२ पुरुष…
अधिकाऱ्यांनी दिले तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने, कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर मंगळवारी, ८ जुलैपासून साखळी उपोषण सुरू केले होते. २ कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ केला होता. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्त्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यावर दोघांनी अधिकाऱ्यांच्या हातून लस्सी पाजून उपोषण सोडले. त्यामुळे संघटनेत आनंदाचे वातावरण तयार होऊन प्रशासनाचे आभार मानले आहेत. मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकानुसार १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश असताना आणि बदल्यांसाठीची टक्केवारी शिल्लक असतानाही कामगारांच्या बदल्या केल्या नसल्यामुळे कामगारांना अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. उपोषणाला कामगार संघटनेने पूर्ण पाठिंबा दर्शविला होता. मात्र, मंगळवारी रात्री उपोषणाच्या स्थळी जळगाव मंडळाचे महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील…
धरणगावात पोलिसात दाखल गुन्ह्यात आता खुनाचे कलम वाढणार जळगाव/धरणगाव : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी घेतलेल्या कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची धरणगावातील घटना आता खुनात बदलली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लिलाबाई रघुनाथ विसपुते (वय ७०, रा. महाबळ) यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू असताना त्यांचा मंगळवारी, ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आता खुनाचे कलम वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे धरणगाव परिसरात खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्याने लिलाबाई विसपुते यांनी नातू तेजस विलास…
गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ दिवसांपूर्वीच धरण भरले साईमत/साक्री/प्रतिनिधी : पावसाळा म्हटला की, धरण भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत रहावे, अशी अपेक्षा सर्वांनाच असते. मात्र, हेच धरण जेव्हा पावसाच्या पाण्याने अत्यल्प भरलेले दिसले की, सर्वांनाच चिंता सतावते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच चांगल्या पावसामुळे धरण क्षेत्रात जलसाठा वाढला आहे.साक्री तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण समजला जाणारा पांझरा मध्यम प्रकल्प रविवारी रात्री ८ वाजता पूर्ण क्षमतेने भरून “ओव्हरफ्लो” झाला आहे. त्यामुळे आता धरणावर पर्यटकांचीही गर्दी वाढू लागली आहे. पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस पडल्याने लाटीपाडा धरण रविवारी १०० टक्के भरून सांडव्यावरून…
मुदत वाढीच्या निर्णयाचे मंत्र्यांसह अनेकांनी केले स्वागत साईमत/जळगाव/प्रतिनिधी : रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून धानसह भरडधान्य खरेदीसाठी शासनाने यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदत निश्चित केली होती. मात्र, BeAM पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा स्तरावर अनेक शेतकऱ्यांची खरेदी प्रक्रिया प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ७ जुलै २०२५ रोजी संदर्भीय शासन निर्णयान्वये धानसह भरडधान्य खरेदीसाठीची अंतिम मुदत २० जुलै २०२५ पर्यंत वाढविली आहे. अशा मुदत वाढीच्या निर्णयाचे राज्याचे मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय राज्य मंत्री खा.रक्षा खडसे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार यांनी स्वागत केले आहे.…
कळंबातील दिंडी सोहळ्याप्रसंगी विठुरायाबाबत काढले गौरवोद्गार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पंढरीचा पांडुरंग म्हणजे अविट गोळीचा भक्ती रस आहे. अशा भक्तीरसाचा स्वाद ज्ञानोबा, तुकाराम यांनी तर घेतलाच. पण त्यानंतर ७५० वर्षांपूर्वी वारकऱ्यांनी भक्तीरसात उडी घेतली होती. त्यामुळे मनुष्य देहाचे सार्थक ‘विठरायाच्या’ भक्तीरसात असल्याचे गौरवोद्गार रुक्मिणी माता मंदिराच्या पुजारी उर्मिला भाटे यांनी विठुरायाबाबत काढले. पंढरपूर शहरातील कळंब येथे गुरु शंकर भारती महाराज यांच्या दिंडी सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र धर्म मराठी माणसांमुळे वाढीस लागला आहे. ज्ञानोबा, तुकारामांचे अभंग थोर कवी, लेखक, साहित्यिकांनी त्यात भर घातली आहे. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी अशा साहित्यामुळे वारकरी परंपरा समृद्ध झाली आहे. सामान्य वारकऱ्याला, शेतकऱ्याला हा भगवंत सतत…