वाटपात टाकळी खुर्द, पळासखेडा बु. येथील जि.प.च्या शाळांचा समावेश साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांच्या विचाराने प्रेरित जामनेर तालुका सत्यशोधक समाज संघातर्फे तालुक्यातील टाकळी खुर्द, पळासखेडा बु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास २०० च्यावर विद्यार्थ्यांना वह्यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. टाकळी येथील कार्यक्रमात अध्यक्षस्थानी गणेश महाजन होते. यावेळी मुख्याध्यापक लवगे, रेखा पाटील, विजय पवार, रवींद्र परदेशी, गोपाल चौधरी, दीपकसिंग राजपूत, संदीप पालवे तर पळासखेडा येथे मुख्याध्यापक रमेश चवरे, अर्चना पाटील, सोनाली सोनवणे, रामदास पांगूड उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जे.बी.चौधरी, अर्जुन आमले, विनोद जाधव, राजू माळी, श्री.जगताप, मोहन बावस्कर, ग्रा.पं.सदस्य बाळू चवरे यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाजाचे…
Author: Sharad Bhalerao
यशस्वी विद्यार्थ्यांचा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते गौरव साईमत/जामनेर/प्रतिनिधी : गेल्या फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल जामनेरचे तब्बल १५ विद्यार्थी तर पूर्व प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे दोन विद्यार्थी असे १७ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी समिती प्रमुख ललित लामखेडे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकांसह शिक्षक उपस्थित होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती मिळविणारे विद्यार्थी असलेल्या जामनेरातील न्यू इंग्लिश स्कूल ही जिल्ह्यातील एकमेव…
जामनेरातील आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाप्रसंगी प्रतिपादन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : विद्यार्थिनींनी उज्ज्वल भविष्यासाठी अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवावा. शिक्षण घेतांना शैक्षणिक गुणवत्तेसह स्वतःच्या संरक्षणासाठी आवश्यक गोष्टीही आत्मसात कराव्यात, असे प्रतिपादन गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट चैतन्य धामचे संस्थापक-अध्यक्ष प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी केले. येथील पंचायत समितीच्या कार्यालयातील सभागृहात वसंतराव नाईक अधिकारी-कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित केलेल्या स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थिनींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात महिला सदस्य म्हणून अंजू पवार, सविता राठोड, माधुरी नाईक, पितांबर राठोड, पुखराज पवार यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ५० विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देऊन गौरव केला. सत्कार सोहळ्यात…
तालुक्यात कुटुंब नियोजनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान साईमत/जामनेर/जामनेर : राष्ट्रीय लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून जामनेर तालुक्यात कुटुंब नियोजनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा नुकताच प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कुमावद, डॉ.किरण पाटील यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जामनेर तालुक्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. एक दिवस आधी लाभार्थ्यांना दाखल करून त्याच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येते. जामनेर तालुक्यात गेल्या वर्षात ८ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, १०५ लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया, १ हजार ८२ स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया अशा १…
शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्याचा मान्यवरांनी केला गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथे अठरावे बहिणाबाई-सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. संमेलनात जळगाव येथील केसीई सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील (मु.जे.महाविद्यालय) येथे कार्यरत कवयित्री तथा प्रा.संध्या महाजन यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संमेलनाध्यक्ष साहित्यिक प्रा.डॉ.फुला बागुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्याचा गौरव करत खा.स्मिताताई वाघ यांच्या हस्तेही विशेष सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. संमेलनाला आ.राजूमामा भोळे, खा.स्मिताताई वाघ, विष्णू भंगाळे, स्वागताध्यक्ष पुष्पा साळवे, साहित्यिक बी.एन.चौधरी, डॉ.संजीवकुमार सोनवणे, अरविंद नारखेडे, सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड, आयोजक विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे, डॉ.अशोक पारधे, संमेलन…
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्याचा बैठकीत निर्णय साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत पाचवी बहुमताच्या आधारावर जन सुरक्षा विधेयक पास करण्यात आले. त्याच्या विरोधात समविचारी संघटनांची बैठक पद्मालय विश्रामगृहात आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी मुकुंद सपकाळे होते. जन सुरक्षा विधेयक म्हणजेच जनतेची मुस्कटदाबी करणारे विधेयक आहे. जनतेचा आवाज आणि जनतेची अभिव्यक्ती दाबण्याचा हा प्रयत्न आहे. इंग्रजांच्या काळात असणारा रौलेट कायदा जसा काळा कायदा होता, तसा जन सुरक्षा विधेयक हा काळा कायदा आहे. हा काळा कायदा रद्द झाला पाहिजे. त्यासाठी मंगळवारी, १५ जुलै दुपारी ११:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्यावतीने मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली उग्र निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर…
माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरूणमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये आ.राजू मामा भोळे यांच्या पुढाकाराने आणि माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपये मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. हा सोहळा आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रशांत नाईक यांनी आ.भोळे यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी कल्लू खाटीक, अल्ताफ शेख, वसीम खान, वसीम बेपारी, नदीम दादा, अनिश शेख, कल्लू पैलवान, सुतार भाई, अखिल खान, पेंटर, इक्बाल पिरजादे, नारायण महाजन, महारू सांगळे, राजेंद्र पाटील, ईश्वर सोनवणे, सलमान खाटीक, अफसर खाटीक, मगबुल तडवी, मुस्तफा…
जळगाव एमआयडीसी पोलिसांची यशस्वी कामगिरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुकुंद नगरातील लाठी शाळेच्या मागे मानेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगास चांदीच्या मुकुटासह इतर दागिने चढविलेले असतात. हे सर्व दागिने मंदिरासमोरील राहणारे अरुण लक्ष्मण शेटे यांच्या घरी ठेवलेले असतात. सण, उत्सवाच्यावेळी ते मंदिरातील शिवलिंगास लावले जातात. फिर्यादी अरुण शेटे हे पुणे येथे कुटुंबासह मुलाकडे गेले होते. घरात ठेवलेले महादेव मंदिराचे ६१ हजार ५०० रुपये किमतीच्या चांदीच्या मुकुटासह दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लांबविले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. चोरीचे गांभीर्य लक्षात घेत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्यांच्या गुन्हे शोध पथकातील पीएसआय चंद्रकांत धनके…
जळगाव शहरातील शिंपी समाजाच्या विविध संघटनांनी व्यक्त केला तीव्र निषेध साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पुणे येथे शिक्षणासाठी गेलेला शिंपी समाजाचा युवक निखिल अशोक सावळे (रा.ठेंगोडा, ता.बागलाण) ह्याच्या झालेल्या निर्घृण हत्याकांड प्रकरणी गुन्हेगारांना कडक शासन होण्याबाबत जळगाव शहरातील शिंपी समाजाच्या विविध संघटनामार्फत तीव्र निषेध व्यक्त करून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी, एकता शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप, महाबळ परिसर नाम संस्कृती शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष किशोर निकुंभ, नाम विश्व शिंपी समाज फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जगताप, जळगाव सांस्कृतिक आघाडीचे जिल्हा प्रमुख संजय चव्हाण, जळगाव नाम संस्कृती फाउंडेशनचे मनोज नेरपगार,…
मनपातील आयुक्तांच्या कार्यालयासमोर महिलांनी केले ठिय्या आंदोलन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील जुना खेडी रस्त्यासह आजूबाजूच्या परिसरातील महिला सोमवारी, १४ जुलै रोजी रस्त्यावर उतरल्या. महानगरपालिका प्रशासनाच्या दीर्घकालीन दुर्लक्षाविरुध्द त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत नागरी सुविधांबाबत जोरदार आवाज उठविला. शांततेत पार पडलेल्या आंदोलनाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. शहरातील जुना खेडी रस्ता, डीएनसी कॉलेज परिसर, दत्तनगर, सुनंदिनी पार्क आणि गट क्रमांक ७५ ते ७८ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था, गटारांची दुरुस्ती, वीज डीपींचा अभाव तसेच कचऱ्याच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर महिलांनी एकत्र येत ठोस कृतीची मागणी केली. आंदोलनादरम्यान महिलांनी प्रशासकीय दुर्लक्षाविरुध्द “फक्त आश्वासन नको, कृती हवी” अशा…