लाखा बंजारा ग्रुपतर्फे ‘जळगाव ते राजस्थानातील रामदेवराला पदयात्रा रवाना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : मानवी जीवनात अध्यात्मिक तसेच चिंतनामुळे मनाला समृध्दी, संपन्नता, शांती लाभते. हजारो किलोमीटर असणाऱ्या पदयात्रेला यात्रेकरु जात आहेत. त्यासाठी आपल्यात असणारी जी काही वाईट व्यसने असतील त्यांचा रामदेव बाबांच्या चरणी त्याग करावा. यासोबतच एक चांगला संकल्प घेऊन चांगल्या मनाने पदयात्रा करुन परत यावे, असा उपदेश जामनेर येथील गुरूदेव सेवा आश्रमाचे प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी दिला. लाखा बंजारा ग्रुपतर्फे आयोजित ‘जळगाव ते रामदेवरा’ (राजस्थान) पदयात्रेला शनिवारी, २६ जुलै रोजी प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते पदयात्रेकरुंसह उपस्थित समाज बांधवांसमोर मार्गदर्शन करतांना बोलत होते. सुरुवातीला जळगावातील राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोरील रामदेव महाराज यांच्या…
Author: Sharad Bhalerao
खान्देशस्तरीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथे अठरावे बहिणाबाई-सोपानदेव चौधरी खान्देश स्तरीय साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. संमेलनात डॉ. अशोक पारधे यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. फुला बागुल यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना संमेलनात आ.राजूमामा भोळे, खा.स्मिताताई वाघ, विष्णू भंगाळे, स्वागताध्यक्ष पुष्पा साळवे, साहित्यिक बी.एन.चौधरी, डॉ.संजीवकुमार सोनवणे, डॉ.अरविंद नारखेडे, सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड, आयोजक डॉ.विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे, विजय लुल्ले, प्रा.संध्या महाजन, सुनिता येवले, मनोहर तेजवानी, प्रकाश पाटील, डॉ. अ. फ. भालेराव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला. जळगावातील साने गुरुजी कॉलनी स्थित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथी इंग्लिश स्कूल येथे…
खा.स्मिताताई वाघ यांच्या हस्ते देऊन स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. डी. पाटील यांना नुकत्याच झालेल्या बहिणाबाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले. कविवर्य पुरुषोत्तम नारखेडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पवन चॅरिटेबल ट्रस्ट, जळगाव व अपर्णा सेवा ट्रस्ट कविवर्य पुरुषोत्तम नारखेडे बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या अठराव्या बहिणाबाई सोपानदेव खान्देश राज्य मराठी साहित्य संमेलनातर्फे खा.स्मिताताई वाघ यांच्या हस्ते डी.डी.पाटील यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी मराठी साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.फुला बागुल, उद्घाटक आ.राजू मामा भोळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बी. एन.चौधरी, स्वागताध्यक्ष…
जामनेर तालुक्यातील गोंडखेल ग्रा.पं.चा आदर्श उपक्रम साईमत/जामनेर/प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी गोंडखेल ग्रामपंचायतीने आदर्श उपक्रम राबवित पहिलीत प्रवेश घेतलेल्या पाल्यांच्या पालकांना वर्षभरासाठी घरपट्टीसह पाणीपट्टी कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गावातील मराठी शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याचे आश्वासन जामनेर तालुक्यातील गोंडखेलचे सरपंच विठ्ठल सोन्ने यांनी दिले. गोंडखेल येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत गोंडखेलतर्फे दप्तर व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी सरपंच विठ्ठल सोन्ने यांनी वरील निर्णय घोषित केला. तसेच शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. भविष्यात शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद मराठी…
आवश्यक ‘त्या’ त्रुटींची पूर्तता करण्याचे विद्यार्थ्यांसह पालकांना आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून त्रुटीपूर्ण अर्जांवरील कार्यवाहीला अडथळा येत आहे. अनेक विद्यार्थ्यांसह पालकांनी वेळेवर त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे अर्ज रखडले आहेत. अर्जदारांनी समितीकडून एसएमएस, ई-मेल वा लेखी पत्राच्या माध्यमातून सूचना मिळूनही कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही, असे निरीक्षण समितीकडून नोंदविण्यात आले आहे. अशा पार्श्वभूमीवर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा नयना बोंदार्डे, उपायुक्त राकेश महाजन, संशोधन अधिकारी नंदा रायते यांनी स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांसह पालकांनी तातडीने समिती कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या त्रुटींची पूर्तता करावी, त्यामुळे समितीला निर्णय घेणे शक्य होईल. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती,…
विधानसभा निवडणुकीनंतर ४५ हजारांवर मतदारांची भर साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यात मे २०२४ तसेच ऑक्टोबर दरम्यान लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यात गेल्या दहा ते अकरा महिन्यांच्या कालावधीत सद्यस्थितीत तब्बल ४५ हजार मतदारांची भर पडली आहे. त्यात महिला नवमतदारांच्या नोंदणीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोदवड वगळता जिल्ह्यातील १८ पालिकांसाठी संभाव्य प्रभागांची हद्द तपासणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पालिका प्रशासनाने ही मोहीम गुगल मॅपवर प्रभागांचे नकाशे तयार झाल्यानंतर हाती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्हा…
प्रथम विजेत्या मंडळाला ५ लाखांसह पारितोषिक, प्रमाणपत्र मिळणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चे आयोजन केले आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्या मंडळास तब्बल ५ लाख रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी राज्यभरातील नोंदणीकृत किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. २० जुलै ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. स्पर्धा पूर्णतः निःशुल्क आहे. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. स्पर्धेत मंडळांनी…
विविध मागण्यांसाठी आता घेतला तीव्र आंदोलनाचा पवित्रा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी, १९ रोजीपासून सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सर्व परिचर्या संवर्गातील स्त्री-पुरुषांनी (सिस्टर, ब्रदर) हे बेमुदत संपावर जाणार आहे. वरिष्ठ पातळीवर कुठलाही सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे अखेर संघटनेला हा आक्रमक पवित्रा घ्यावा लागला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने गेल्या ६ जून रोजी परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा शासन निर्णय निर्गमित केला. त्याला राज्यभरातून कडाडून विरोध करुन शासन निर्णय रद्द केला. राज्यात वाढत्या लोकसंख्येनुसार १०० टक्के पद निर्मिती करणे, १०० टक्के पदोन्नतीसाठी संघटना…
साईमत/जळगाव/प्रतिनिधी : राज्यभरातील परिचारिकांनी गुरूवारी, १७ जुलै रोजी विविध मागण्यांसाठी एक दिवसीय संप पुकारला होता. त्यात नर्सिंग भत्ता मिळावा, वेतन त्रुटी दूर व्हाव्यात आदी मागण्या परिचारिकांकडून केल्या होत्या. मात्र, जळगाव जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत ३५० परिचारिकांनी संपात सहभाग घेतला नाही. त्यामुळे त्यांनी संपातून माघार घेतल्याचे दिसून आले. जिल्ह्याभरात ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कार्यरत परिचारिकांनी संपात सहभाग न घेता घोषणा झाल्यानंतही जिल्ह्याभरात सेवा दिली आहे. परिचारिकांनी संपात सहभाग न घेतल्याने आरोग्य सेवेवर कोणताही विपरित परिणाम झाला नाही. परिचारिकांची दिवसभर अविरत सेवा सुरू होती. शासनाकडून याबाबत सकारात्मक निर्णय न घेण्यात आल्याने परिचारिकांनी संप पुकारला होता. सर्व आरोग्य केंद्रातील परिचारिकांनी…
समग्र विकासासाठी बैठक ठरली फलदायी, नवकल्पनांवर झाली चर्चा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील स्टार्टअप्स, नवउद्योजक, इनोव्हेटर्स आणि इन्क्युबेशन संस्थांसोबत ‘इंजिन्स ऑफ ग्रोथ संवाद’ अशा विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक जिल्ह्याच्या समग्र विकासासाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या आधारे स्थानिक उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून फलदायी ठरली आहे. संवादात कृषी, अन्न प्रक्रिया, अॅगटेक, हेल्थटेक, फिनटेक, एडटेक अशा विविध क्षेत्रातील नवकल्पनांवर सविस्तर चर्चा झाली. स्टार्टअप्सना आवश्यक निधी, मार्गदर्शन, सवलती आणि सशक्त इकोसिस्टीम मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, बँका, विद्यापीठे आणि औद्योगिक संस्था यांच्यात त्रिसूत्री समन्वयाची संकल्पना मांडण्यात आली. स्थानिक तरुणांसाठी उद्योजकतेचे प्रशिक्षण, व्यावसायिक सल्ला आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचवर विशेष भर देण्यात आला. संवादावेळी जिल्ह्याच्या आर्थिक विकासात स्टार्टअप्स ‘इंजिन्स…