Author: Sharad Bhalerao

व्याघ्र संवर्धन चळवळीची घेतली पताका साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जळगाव वन्यजीव संरक्षण संस्था आणि यावल वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीस सोमवारी, २८ जुलै रोजी जळगाव येथून उत्साहात प्रारंभ झाला. रॅलीला आ.राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या दोन दिवसांच्या रॅलीत राज्यभरातून आलेले १०० व्याघ्रदूत आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे २५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. रॅलीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. यावल वनविभागाकडून त्यांना जंगल सफारीचा अनुभव देण्यात येणार आहे. नशिराबाद, भुसावळ, सावदा,…

Read More

नागपंचमीनिमित्त विशेष… जळगावातील सर्पमित्र राजेश सोनवणे यांची घेतलेली मुलाखत शरद भालेराव/साईमत/जळगाव : पावसाळ्याच्या दिवसात साप दिसल्यास मारु नये. अशावेळी त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांना बोलवावे. तसेच नागरिकांनी सापांना ‘जीवदान’ देऊन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करावी, अशी माहिती जळगावातील हरीविठ्ठल नगर भागातील व्यंकटेश नगरातील रहिवासी तथा सर्पमित्र राजेश सोनवणे यांनी देऊन जनतेला तसे आवाहनही केले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने नागपंचमी दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची पूर्वसंध्येला भेट घेवून मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते सलूनचा व्यवसाय सांभाळून गेल्या १० वर्षांपासून सापांबद्दल आवड निर्माण करुन त्यांना ‘जीवदान’ देण्याचे कार्य करत आहे. तसेच ही आवड यापुढेही जोपासणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मुलांनाही ते…

Read More

पाच जोडप्यांच्या हस्ते अभिषेक, ६ ऑगस्टला कावड यात्रा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा भागातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी, २८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पाच जोडप्यांच्या हस्ते जलाभिषेक, दुग्धाभिषेक पूजा त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी माणिक-कल्पना चौधरी, धनंजय-आशा सोनार, नारायण-माधुरी येवले, समाधान-पूजा ठाकरे, भिकमचंद राठोड, गणेश जाधव, शरद नेवे यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृतने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा करुन महाआरती करण्यात आली. दरम्यान, येत्या ६ ऑगस्ट रोजी मंदिरातून सावखेड्यातील गिरणा नदीपर्यंत कावड यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती नरेश बागडे यांनी दिली. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने २८ जुलै रोजी भाविकांनी मंदिरात महादेवाचे…

Read More

श्री स्वामी समर्थांच्या पादुका नऊ वर्षांनंतर जिल्ह्यात दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील रामेश्वर कॉलनीतील येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी सेवा केंद्रात रविवारी, २७ जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या पादुकांच्या पूजनासह पालखी सोहळा उत्साहात पार पडला. गेल्या २०१६ नंतर पुन्हा नऊ वर्षांनी शहरातील प्रतापनगर, आनंदनगर, बिबानगर, कानळदा, अयोध्यानगर अशा विविध केंद्रामध्ये ११ जुलैपासून महाराजांच्या पादुकांच्या पूजनासह पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात २७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांसह मूर्ती रथाचे आगमन झाले. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आरती झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या पूजनाचा विधी करण्यात…

Read More

न्यू जोशी कॉलनी परिसरात घडली घटना, रुग्णालयात परिवाराचा आक्रोश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील सम्राट कॉलनीतील रहिवासी तरुणाची जुना वाद उफाळल्याने चाकूने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची घटना रविवारी, २७ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. या घटनेत आणखी एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. अशा घटनेमुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, परिसरात तणावाचे वातावरण असून चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे. घटनेतील मयत तरुणाचे धीरज दत्ता हिरवाडे (वय २४) असे नाव आहे. तसेच यात कल्पेश भटू चौधरी (वय २३, रा.सम्राट कॉलनी) हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेबद्दल…

Read More

संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने जळगाव येथील मान्यताप्राप्त नामांकित समाज चिंतामणी प्रतिष्ठान संस्थेतर्फे येत्या १३ ते १५ ऑगस्टपर्यंत असे तीन दिवशीय अ. भा. ‘आंतरभारती’ साहित्य संमेलन आयोजित केले आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड केली आहे. तसेच नागपूर येथील ज्येष्ठ लेखिका प्रा. विजया मारोतकर संमेलनाच्या स्वागताध्यक्षा असतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत होणाऱ्या साहित्य संमेलनात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच नामांकित साहित्यिक सहभाग असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी अभिरुची निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. वैशिष्ट्यपूर्ण…

Read More

विविध मागण्यांसह प्रश्न मांडण्याचा लोकमान्यचे मगन पाटीलांनी केला प्रयत्न साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सोसायटीच्या (ग. स. सोसायटी) शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात रविवारी, २७ जुलै रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाल्याचे दिसून आले. ग.स.सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील हे वार्षिक अहवाल सादर करत होते. तेव्हा लोकमान्य गटाचे अध्यक्ष मगन पाटील यांनी त्यांना विरोध दर्शविला. तसेच माहिती मांडण्यात अडथळा निर्माण केला. सभेत मगन पाटील यांनी व्यासपीठावर जाऊन आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा विरोधी सहकार गट, प्रगती गट आणि लोक सहकार गटाच्या सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्याजवळील माईक हिसकावून घेतल्याचा आरोप मगन पाटील यांनी केला. ग.स. सोसायटीच्या कर्जावरील व्याज कमी करावे,…

Read More

‘इको क्लब फॉर मिशन लाईफ’ अंतर्गंत पर्यावरण दिन साजरा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील साने गुरुजी कॉलनीतील स्थित खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये ‘इको क्लब फॉर मिशन लाईफ’ अंतर्गंत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातंर्गंत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यासाठी शाळेच्या परिसरात इको क्लबचे विद्यार्थी, सदस्य आणि त्यांच्या आई स्वप्ना कुलकर्णी यांना आमंत्रित केले होते. यावेळी स्वप्ना कुलकर्णी, दीपक पाटील यांच्या हस्ते करंजच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जळगाव येथील सामाजिक वनीकरणाचे अधिकारी दीपक पाटील, मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस.चौधरी, पर्यवेक्षक के.आर.पाटील, राष्ट्रीय…

Read More

जिल्हा प्रशासनाने झुगारला शासनाचा निर्णय  साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रियेसाठी लेखा अधिकारी संवर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. निवडणुकीच्या कामकाजापोटी एक महिन्याचे मूळ वेतन देण्याचे शासनाचा निर्णय असतानाही जिल्हा प्रशासनाने मात्र या निर्णयाला केराची टोपली दाखवून केवळ १,२०० रुपये मानधन खात्यावर जमा केले. तुटपुंजे मानधन प्राप्त झाल्याने राजपत्रित लेखा अधिकारी संतप्त होऊन नाराज झाले आहेत. दरम्यान, मानधनापोटी प्राप्त झालेले १,२०० रुपये जिल्हा प्रशासनाला त्यांनी परत पाठविले आहेत. विधानसभा निवडणूक २०२४ जाहीर झाल्यानंतर शासनाच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक खर्चाचे लेखांकन करण्यासाठी दैनंदिन खर्चासह अन्य निवडणूक खर्च विषयक कामकाजासाठी लेखा अधिकारी संवर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती…

Read More

एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद पाटील यांची मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : हल्लीच्या धावत्या युगात अनेक लोक असे आहेत की, कोणाच्या आधाराविना विविध कारणांमुळे सिंगल म्हणजे ‘एकल’ जीवन जगत आहेत. त्यात अनेक स्त्री-पुरुष, युवक-युवतींचा समावेश आहे. त्यांच्या भविष्याचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून अशा व्यक्तींना दैनंदिन जीवनात त्यांचा शिक्षणाचा प्रश्न, आरोग्य, स्वतःचे हक्काचे घर, रोजगार, सुरक्षितता, आपुलकीचा वर्ग, दरमहा शासनाकडून वेतन मिळावे, अशा अनेक विषयांवर जीवन जगणाऱ्या लोकांसाठी विविध कार्पोरेट कंपनी, विविध समाजसेवी संस्था, सोशल वर्कर्स, देणगीदार, अभ्यासक आदी लोकांनी अशा लोकांना समजून घेऊन सहकार्य करणे काळाची गरज आहे. अशा एकल, अविवाहित (एज बार झालेले) व्यक्तींना शासनाने त्यांच्या उदरनिर्वाहासह विकासासाठी विविध योजना राबवाव्यात. तसेच कोणताही…

Read More