समाज परिवर्तनाच्या कार्यात योगदान देण्याचा केला निर्धार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील नेरी नाका चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण करत समाज परिवर्तनाच्या कार्यात योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. १ ऑगस्ट १९२० रोजी जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि प्रतिभावान लेखक होते. दलित, वंचित, उपेक्षित समाजाच्या व्यथा, संघर्ष आणि आत्मसन्मान यांना त्यांनी आपल्या लेखणीतून वाणी दिली. त्यांच्या साहित्याने समाजप्रबोधन आणि परिवर्तनाची दिशा दिली. म्हणूनच त्यांना ‘लोकशाहीर’ ही उपाधी मिळाली होती. यांची लाभली उपस्थिती सोहळ्यात कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे मुख्य सल्लागार…
Author: Sharad Bhalerao
भाजपचे आ. प्रसाद लाड यांचे ‘लेटरहेड’ गैरवापर प्रकरण जळगाव/विशेष प्रतिनिधी : भाजपचे विधान परिषद सदस्य आ.प्रसाद लाड यांच्या ‘लेटरहेडचा’ गैरवापर करुन ३.४० कोटीच्या निधीचा अपहाराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण राज्यभरात सध्या गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अमित सोळुंकेच्या विरोधात २ जुलै रोजी एफआयआर दाखल आहे. अमित सोळुंके हा भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश सचिव म्हणून कार्यरत होता. तथापि, आ.लाड यांच्या ‘लेटरहेडचा’ गैरवापर केल्याचे प्रकरण समोर येताच सोळुंकेची पक्षाच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी १९ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्रान्वये त्याला पदमुक्त केल्याचे म्हटले आहे. किंबहुना तसे पत्र जारी केले गेले. त्यात पक्षविरोधी कार्य, पक्षाची नितीमूल्ये, शिस्तविरुध्द वर्तन…
विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुण भागातील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील तृष्णी राठोड, दिवेश जंगले ह्या विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या महान कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी तृष्णी राठोड, भार्गवी पाटील, शितल हटकर, हर्षदा पाटील, चेतन सोनार, रितेश लोहार, राशी धनपाल ह्या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्यासह शिक्षक ज्ञानचंद बऱ्हाटे, केतन बऱ्हाटे, संदीप खंडारे आदी उपस्थित…
लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठेंच्या योगदानावर वक्त्यांनी टाकला प्रकाश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जलाराम बाप्पा मंदिरालगतच्या चेतना व्यसनमुक्ती केंद्रात समाजसेवक अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच ज्येष्ठ विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करुन दोघा महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या कार्याचे स्मरण करुन दोघा महापुरुषांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ज्ञान वेद अबॅकसचे संचालक संदीप सोनार, ज्येष्ठ समाजसेवक अशोक भावसार, दूरदर्शन तथा टीव्ही कलावंत नितीन तायडे, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांच्यासह सहकाऱ्यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक कार्यावर तर लोकमान्य…
जळगावात जिल्ह्याचा अनुभव असणारे असतील तिघे अधिकारी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) च्या कलम २२ नुसार प्रशासकीय कारणास्तव, रा.पो.से. (राज्य पोलीस सेवा) अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनांबाबत आदेश जारी केला आहे. शासनाच्या आदेशानुसार जळगावातील एका अधिकाऱ्याची बदली केली आहे. तसेच दोन नवीन अधिकारी जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य शासनाने पोलीस उपअधीक्षक, सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र) संवर्गातील ६५ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत. त्यात जळगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांची भुसावळ शहर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली केली आहे. जळगाव जिल्ह्यात बाहेरून २ उपअधीक्षक येणार आहे. त्यात चाळीसगाव उपविभागीय…
जळगाव बालरंगभूमी परिषद शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी दिली माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : संपूर्ण भारतात मराठी बालरंगभूमीची समृध्द परंपरा आहे.मराठी बालनाट्यालाही ६६ वर्षांची समृध्द परंपरा लाभली आहे. मराठी बालनाट्यांचे सर्वात जास्त प्रयोग महाराष्ट्रात होतात. २ ऑगस्ट १९५९ रोजी पहिल्या व्यावसायिक बालनाट्याचा प्रयोग झाला होता. त्यामुळे बालरंगभूमी परिषदेतर्फे शनिवारी, २ ऑगस्ट हा ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याची माहिती जळगाव बालरंगभूमी परिषद शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी दिली. बालरंगभूमी परिषद अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था आहे. संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये मराठी बालनाट्य दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्यात २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात…
महसूल सप्ताहातंर्गंत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रकार परिषदेत आवाहन साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : जिल्ह्याच्या महसूल विभागाशी निगडीत नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्याचबरोबर महसूल विभागाचा कारभार अधिकाधिक पारदर्शक करण्याचा जिल्हा प्रशासनाने कसोशीने प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेत रस्ते, जीवंत सातबारा, शेतजमीन तुकडे बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी, घरकुलांसाठी जागा उपलब्ध करुन देणे, रेशनकार्ड, ऑनलाईन सेवा कलेक्टर ऑफीस तुमच्या (नागरिक) पॉकेटमध्ये आदी नाविन्यपूर्ण उपक्रम, सुविधा राबविण्यात आम्ही कुठेही मागे राहिलो नाहीत तर ऑनलाईन सेवेच्या बाबतीत आम्ही राज्यात आघाडीवर असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. त्यांनी गुरुवारी, ३१ जुलै रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा प्रशासनातर्फे १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात…
लाभार्थी वंचितांना धान्य वेळेवर मिळण्याची होतेय मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील हरीविठ्ठल नगर भागातील दारिद्र्य रेषेखालील आणि दिव्यांग धान्यापासून वंचित राहत आहे. याकडे संबंधित विभागासह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वंचितांना धान्य वेळेवर मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. धान्याचा काळा बाजार न चुकता सुरू आहे. याबाबत फोटोसह व्हिडीओ पुरावे काही नागरिकांकडे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रेशन दुकानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह शासकीय कर्मचारी उपस्थित राहणे गरजेचे असल्याची अपेक्षाही दिव्यांग लाभार्थ्यांनी बोलून दाखविली आहे. लाभार्थ्यांना मिळणाऱ्या हक्काच्या धान्याचा काळाबाजार थांबवून तो लाभार्थ्यांना मिळावा, अशीही मागणी दिव्यागांनी केली आहे. शासनाने अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्ड धारकांना नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानदारामार्फत कार्ड अपडेट नाही, इतर…
सोनी नगरात जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी: पर्यावरणाची काळजी घेतल्याने आपले जीवन अधिक सुंदर आणि सुरक्षित होते. त्यासाठी वृक्षांची काळजीही घेतली पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात किमान एक तरी झाड लावावे, असे प्रतिपादन जळगाव सहकारी जनता बँकेचे अध्यक्ष सतीष मदाणे यांनी केले. शहरातील पिंप्राळा भागातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव परिसरात गुरुवारी, ३१ जुलै रोजी आयोजित वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. परिसरात विविध प्रकारची २५ झाडे ट्री गार्डसहित लावण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, श्रीकृष्ण मेंगडे, घनश्याम बागुल, नारायण येवले, विठ्ठल जाधव, मधुकर ठाकरे, भैय्यासाहेब बोरसे, निलेश जोशी,…
संमेलनासाठी महिला मान्यवरांची उपस्थिती लाभणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील महाबळामधील अभियंता भवनात ‘आम्ही सिध्द लेखिका’ संस्थेच्या शाखेतर्फे रविवारी, ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून केवळ महिलांसाठी ‘काव्यधारा काव्य संमेलना’चे आयोजन केले आहे. काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री माया धुप्पड राहतील. उद्घाटक ‘आम्ही सिध्द लेखिका’ संस्थेच्या खान्देश विभाग प्रमुख प्रा.संध्या महाजन असतील. तसेच स्वागताध्यक्ष कवयित्री जयश्री काळवीट राहतील. संमेलनास लेखिका प्रा.विमल वाणी, ललिता टोके, स्मिता चौधरी यांचीही उपस्थिती राहील. महिलांनी संमेलनाचा आनंद घेण्याचे आवाहन संमेलनात जळगाव परिसरातील कवयित्री सहभागी होतील. संमेलनासाठी संस्थेच्या उपाध्यक्ष ज्योती राणे, सदस्य ज्योती वाघ, संध्या भोळे, संगिता महाजन, पुष्पा साळवे, इंदिरा जाधव, मंजुषा पाठक, सुनिता येवले आदी सर्व भगिनी…