मनसेने उघड केली प्रशासनाची अनास्था साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जळगाव महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली सुरू केलेले शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र अक्षरशः दुरवस्थेचे चित्र दाखवत आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू केलेल्या केंद्रात मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचे वास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणले आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रातील स्वच्छतागृहांना दरवाजे नसल्याने रुग्ण, महिला व वृद्ध नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. आजारपणाच्या अवस्थेतही बाब अधिकच त्रासदायक ठरत आहे. तसेच रुग्णांना बसण्यासाठी आवश्यक असलेली आसन व्यवस्था नसल्याने अनेकांना उभ्यानेच उपचारांची प्रतीक्षा करावी…
Author: Sharad Bhalerao
दिव्यांग केंद्रातील मुलांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांतर्फे श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त (जयंतीनिमित्त) उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात सूत कताई प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती अशोक जैन यांनी चरखा चालवून उपक्रमाला औपचारिक सुरुवात केली. आठ दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणामुळे दिव्यांग केंद्रातील मुलांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार आहे. रुशील मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचे संचालन केले जाते. केंद्रातील मुले आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावीत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती जैन यांच्यासमवेत दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालिका हर्षाली चौधरी, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई तसेच बरुन मित्रा उपस्थित होते.…
डेमला कॉलनीत भाविकांची दर्शनासाठी गर्दी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्रमांक ७ येथील डेंमला कॉलनी येथे श्री साईबाबा मंदिराचा १३ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. यानिमित्त सकाळी आरतीसह महाप्रसादाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सुरुवातीला साईबाबांचे नामस्मरण आणि भजन भाविकांनी मोठ्या उत्साहाने म्हटले. साई नामस्मरण, आरती व प्रसादरूपी सेवेमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. वर्धापनदिनात चेतन दिलीप तिवारी आणि दीपाली चेतन तिवारी आणि परिवार डेंमला कॉलनी यांच्या हस्ते अभिषेक झाला. सोहळ्यासाठी शहराचे आ. सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी विशेष सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेवक दीपमाला काळे, मनोज काळे,…
जळगावात नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : नाभिक समाजातील ९ वर्षाच्या अज्ञान, निरागस बालिकेवर खतनाम, ता. सटाणा, जि. नाशिक येथे एका ७० वर्षीय नराधमाने पाशवी बलात्कार केला आहे. ही घटना संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी तसेच निंदनीय व घृणास्पद आहे. अशाच प्रकारची घटना नुकतीच मालेगाव शहरात घडली आहे. अशा घटनांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यासाठी संबंधित नराधामास तात्काळ शिक्षा होण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक (जलदगती न्यायालय) न्यायालयात चालविण्यात येऊन खटल्याकामी विशेष सरकारी वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्त करण्यात यावी. तसेच नराधमास १०० दिवसाचे आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, शासनाकडून पीडित मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कुटुंबास मदत मिळावी, अशी मागणीही नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या…
कैद्यांना मूलभूत मानवी हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र कारागृह विभागाच्या “सुधारणा व पुनर्वसन” या धोरणात्मक ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त जळगाव जिल्हा कारागृहात मानवी हक्क जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची संकल्पना सचिव, मानवी हक्क आयोग, मुंबई प्रदीपकुमार डांगे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पुणे सुहास बारके आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पुणे योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात आली. कार्यक्रमात कारागृहातील न्यायाधीन बंद्यांना मानवी हक्क, विधिक मदत, पुनर्वसनाच्या संधी आणि मूलभूत संवैधानिक अधिकारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कारागृहातील पुनर्वसन उपक्रम, व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी, तणाव व्यवस्थापन, समाजमुखी पुनर्वसनाचे महत्व आदी विषयांवर माहितीही देण्यात आली.…
‘साईमत’च्या वृत्ताची सा.बां.विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा येथील सोनी नगर जवळील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले होते. याबाबत दैनिक ‘साईमत’मध्ये गेल्या ३१ ऑक्टोबर रोजी वृत्त प्रकाशित झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत प्रत्यक्षात काम सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी ‘साईमत’चे आभार मानले आहेत. रस्त्यामुळे दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याच्या घटना घडत होत्या. याबाबत वृत्तपत्रात बातम्या छापून आल्याने प्रशासन जागे झाले. ५० मीटर पुलाचे काम सुरू २.४६ कोटीचा निधी मंजूर आहे. आ. सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाने या रस्त्याचे कामे सुरू झाली आहेत. सोनी नगर जवळील ५० मीटर पुलाच्या कामाचा शुभारंभ पिंप्राळा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, सुरेश सोनवणे…
‘जळगाव प्रथम’च्या मोहिमेला प्रतिसाद ; सुभाष चौकात उद्या मोहीम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील वाढत्या नागरी समस्या दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप करून तसेच त्यांच्या उपाययोजनांमध्ये निष्क्रीय ठरत असल्याचे म्हणत, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हटावसाठी “आयुक्त हटाव -जळगाव बचाव” ही स्वाक्षरी मोहीम ९ डिसेंबर रोजी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उत्साहात पार पडली. मोहिमेला अराजकीय व्यासपीठ ‘जळगाव प्रथम’ तर्फे आयोजन केले आहे. शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनपाच्या कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी उपस्थित राहून स्वाक्षऱ्या नोंदवल्या आणि आपला निषेध व्यक्त केला. मोहिमेचे महत्व प्रमुख वृत्तवाहिन्यांनी टिपले व नागरिकांच्या समस्या लोकांसमोर मांडल्या. कार्यक्रमात जळगाव प्रथमचे संयोजक माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर, माजी…
स्पर्धेत ६५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ लाला नारायण साव स्कूल (शेठ ला. ना. सा. विद्यालय) येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही “किशोर महोत्सव-२०२५” चे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. दोन्ही स्पर्धांमध्ये तब्बल ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा अ, ब आणि क अशा तीन गटात घेण्यात आल्या. चित्रकला स्पर्धेत ‘स्वच्छता अभियान’, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘भारतातील ए.आय. क्रांती’ विषयांवर ३०० विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या दृष्टीवेधक कल्पनांनी स्पर्धेला एक वेगळेच अविष्कार प्राप्त झाला.सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचे…
१४ डिसेंबरला वधू-वर, पालक परिचय मेळाव्याचे आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय भव्य मेळाव्याचे कलश व मंडप भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले. हा मेळावा येत्या रविवारी, १४ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात आयोजित केला असून तयारीला सुरुवात झाली आहे. भूमिपूजनाचा हा प्रारंभ शांताराम चौधरी यांच्या हस्ते विधीवत करण्यात आला. यावेळी युवक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, सचिव अनिल पाटील तसेच कार्याध्यक्ष विनोद चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीमुळे भूमिपूजन सोहळ्याला विशेष उत्साह लाभला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्तरावर मोठ्या…
जिल्हाधिकाऱ्यांकडून १० हजारांचा निधी देऊन संकलनाचा प्रारंभ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : “आपण फक्त ध्वज दिनाचे लक्ष्य पूर्ण केले नाही, तर पुढील वर्षी हे लक्ष्य ओलांडण्याचा निर्धार केला आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध राहील.” अशा शब्दांत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन कार्यक्रमात निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ म्हणून १० हजार रुपयांचा निधीचे योगदान दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात यंदाचा १ कोटी ३२ लाख रुपये निधी संकलनाचा लक्ष्य जिल्हा प्रशासनाने शंभर टक्के पूर्ण केल्याची माहिती देताना त्यांनी नागरिक, शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्थांचे आभार मानले. येत्या नवीन सत्रात उदिष्टापेक्षा अधिक निधी जमा करून सैनिक कल्याण उपक्रमांना…