जागृत स्वयंभू ; गिरणेच्या पाण्याने अर्ध नारेश्वर महादेवाला अभिषेक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कावड यात्रा ही भगवान शंकराप्रती असलेल्या भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. कावडीया आपली कावड खांद्यावर घेऊन पायदळ चालतात आणि त्यात असलेले पवित्र जल शंकराच्या पिंडीवर अर्पण करतात. पिंप्राळा परिसरातील जागृत स्वयंभू महादेव, सुख अमृत नगरातील अर्धनारेश्वर महादेव मंदिरावर कावडयात्रेकरूंनी सावखेडा येथून गिरणा नदीतून तांब्याच्या पात्रता पाणी आणून शंकराच्या पिंडीवर ५०० लिटर जल अर्पण केले. सुरुवातीला सावखेडा गिरणा नदीजवळ वाळूची पिंड करून पूजा करण्यात आली. त्यानंतर गिरणा नदीची पूजा, आरती करून महिला भाविकांनी तांब्याच्या पात्रता पाणी भरले. त्यानंतर सुख अमृत नगर, सोनी नगरातील भाविक ‘चल रे कावरीया भरके घगरीया’ गाण्यावर…
Author: Sharad Bhalerao
जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू साईमत/जळगाव/प्रतिनिधी : उत्तरकाशीमध्ये घडलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर जळगाव जिल्ह्यातील १९ भाविक अडकले आहे. त्यात विविध तालुक्यांतील नागरिकांचा समावेश आहे. अशा भाविकांपैकी केवळ तीन जणांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. त्यापैकी उर्वरित १६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तरकाशी येथे काही दिवसांपूर्वी अचानक भूस्खलन व मुसळधार पावसामुळे काही रस्ते पूर्णतः बंद झाले. ज्यामुळे अनेक भाविक अडकल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील १९ जण अडकल्याचे समोर आले आहे. त्यात जळगाव शहरातील तीन, पाळधी गावातील १३, धरणगाव येथील दोन आणि पाचोरा येथील…
निवडीत उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे, सचिव ॲड. विरेंद्र पाटील, सहसचिव ॲड. लीना म्हस्के तर कोषाध्यक्षपदी ॲड. प्रवीण चित्ते यांचाही समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत यंदा मोठी चुरस निर्माण झाली होती. यंदाच्या निवडणुकीत ॲड. सागर एस. चित्रे यांनी अध्यक्षपदावर विजय मिळविला आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. संजय राणे यांचा १०१ मतांनी पराभव केला. अध्यक्षपदासोबतच इतर पदांवरही नूतन पदाधिकारी विराजमान झाले आहेत. त्यात उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता आर. झाल्टे, सचिवपदी ॲड. विरेंद्र एम. पाटील, सहसचिवपदी ॲड. लीना ए. म्हस्के आणि कोषाध्यक्षपदी ॲड. प्रवीण ए. चित्ते यांचा निवडीत समावेश आहे. तसेच १० सदस्यांमध्ये ॲड. कोमल एस. काळे, ॲड. दीपक ए. शिरसाठ,…
ताणतणावाचे वातावरण विसरून सर्वांनी लुटला आनंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या एप्रिल २०१९ मध्ये विशाल महाजन आणि नितीन नारखेडे यांनी मिशीगन लेवा समाजातील बांधवांना एकत्र आणण्याच्या उद्देश्यातून एक ग्रुप सुरू केला होता. त्यानंतर एकेक करत ७-८ परिवारांचा ग्रुप ५० परिवारांच्या ग्रुपमध्ये रुपांतरीत झाला आहे. नितीन नारखेडे, रवींद्र पाटील, विशाल महाजन, निखील जंगले, संध्या नारखेडे यांच्या नियोजनातून अभिजीत चौधरी, विजेंद्र पाटील, धीरज खर्चे, ललित नारखेडे, पियुष सावदेकर, भावेश चौधरी यांच्यासह अन्य क्रियाशील लेवा पाटीदार बांधवांच्या संयुक्त सहभागातून मिशीगनमधील लेवा समाजाचे द्वितीय संमेलन अमेरिकेतील मिशीगन राज्यातील ‘ब्लूम फिल्ड हिल्स’ याठिकाणी गेल्या रविवारी, ३ ऑगस्ट रोजी पार पडले. संमेलनाला वय वर्षे ७ महिनेपासून तर ७५…
स्थानिक निवडणुका…वेध राजकीय स्थितीचा…! साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : येत्या दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार आहे, तशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या घोषणेनंतर जळगाव जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्थानिक निवडणुकीसाठी चर्चेसह तयारी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दै.‘साईमत’ने ‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक वेध राजकीय स्थितीचा…’ अशी वृत्त मालिका सुरु केली आहे. जिल्ह्याची विद्यमान राजकीय स्थिती लक्षात घेता शिवसेना (शिंदे गट) राज्याच्या सत्तेत असलेला पक्ष आहे. या पक्षाचे जिल्ह्यात पाच आमदार आहेत. याच पक्षाचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे गुलाबराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पक्षाचे नेते आणि वक्तृत्व शैलीमुळे ‘मुलुख मैदान’ तोफ अशी त्यांची राज्यभर ओळख आहे.…
मनमानी कारभाराचा आरोप ; १४ संचालक सहलीवर रवाना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शामकांत बळीराम सोनवणे यांच्याविरुध्द बाजार समितीच्या १४ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी, ६ ऑगस्ट रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. सभापतींविरुध्द अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर १४ संचालक लगेच सहलीवर रवाना झाले आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अशा अविश्वास प्रस्तावाने शिवसेना उबाठाला मोठा धक्का बसला आहे. ही राजकीय खेळी महायुतीच्या माध्यमातून झाल्याचे सांगितले जात आहे. बाजार समितीच्या १४ संचालकांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, बाजार समितीचे सभापती शामकांत सोनवणे यांचे समितीच्या संचालकांशी वागणे बेजबाबदारीचे आहे. संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी…
युवा जिल्हाध्यक्षपदी कुणाल गालफाडे तर जिल्हाध्यक्षपदी अनिल टोंगे साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : शहरातील नहाटा महाविद्यालयाजवळील संत शिरोमणी संत सेना महाराज सभागृहात अखिल भारतीय जिवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी दिनेश महाले होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून युवा प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगारे, सुधाकर सनान्से, प्रदेश संघटक सुधीर महाले, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष समाधान निकम, भुसावळचे अध्यक्ष संजय बोरसे, युवा प्रदेश सचिव डॉ.नरेंद्र महाले, जिल्हाध्यक्ष गणेश सेठी उपस्थित होते. मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात युवक पूर्व विभागाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी कुणाल गालफाडे तर पूर्व विभागीय जिल्हाध्यक्ष अनिल टोंगे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश सेठी, उत्तर महाराष्ट्र तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश ठाकरे, जिल्हा मार्गदर्शक…
आयोजकांतर्फे सुवर्णकार समाज बांधवांना उपस्थितीचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरूणमधील संत शिरोमणी नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७८२ व्या जयंती महोत्सवानिमित्त सायंकाळी ७ वाजता प्रतिमा पूजन, आरती सोहळा आणि सुनील जाखेटे (सी.ए.) इस्कॉन परिवाराच्या टीमच्यावतीने कीर्तन संध्या अश्या स्वरूपात जयंती महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. यंदा महोत्सवाचे विशेष औचित्य साधून हा सोहळा संस्थेचे माजी सचिव ॲड.केतन भिकन सोनार यांच्या प्लॉट नं.२० अ, सर्व्हे नं. २५१ , स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी, मेहरूण येथील राहत्या घरी साजरा होणार आहे. जयंती सोहळ्यासाठी सर्व सुवर्णकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,…
मीटर तोडून जीवे मारण्याची धमकी, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील वावडदा येथील वीज महावितरण सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या जळके गावात वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या पथकाला एका ग्राहकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी देऊन वीज मीटरची तोडफोड केली. ११ केव्ही उच्च दाबाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी, ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित वीज ग्राहकावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अशा घटनेमुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सविस्तर असे की, जळके गावातील एका ग्राहकाने जास्त वीज…
एसीबीच्या पथकाने तिघांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले साईमत/जळगाव/प्रतिनिधी : बांबू लागवडीच्या परवानगीसाठी ३६ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी आणि त्यांचे दोन सहकारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले आहे. त्यांना अटक केली असल्याचे संबंधितांनी सांगितले. कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. सविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील सडावण येथे रहिवासी असणाऱ्या व्यक्तीला बांबू लागवड करायची होती. त्याच्या सोबत त्याच्या परिचयातील तिघे अशा चौघांना बांबू लागवडीची परवानगी हवी असल्याने त्यांनी सामाजिक वनीकरण खात्याच्या कार्यालयात संपर्क साधला. येथे आरएफओ मनोज कापुरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.…