३० लाखांहून अधिक ‘व्ह्यूजचा’ टप्पा पार साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : जळगाव जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाने ऑनलाईन सेवेच्या माध्मातून नागरिकांना प्रशासनाशी जोडण्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लेट फॉर्मने कालपर्यंत ३० लाखांहून अधिक ‘व्ह्यूजचा’ टप्पा पार केला आहे. अशा ऑनलाईन सेवांमुळे जळगाव जिल्ह्याची डिजिटल होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या ‘सुलभ प्रणाली’ने सेवांच्या बाबतीत क्रांतीकारक बदल घडवून आणण्यात यश संपादन केल्याचे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही. अलीकडच्या काळात सुरु झालेल्या ऑनलाईन सेवेने नागरिकांनाही आकर्षित केले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण पध्दतीने काम करण्याचा हा परिणाम म्हणता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाने ऑनलाईन संदर्भात सुरु केलेल्या…
Author: Sharad Bhalerao
रॅलीतील सहभागी देशभक्तांनी हातात घेतलेल्या ‘तिरंग्याने’ वेधले लक्ष…! साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील बळीराम पेठेतील ‘वसंत स्मृती’ भाजपाच्या कार्यालयात मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० भारत मातेच्या माल्यार्पणासह पूजन करून रॅलीला सुरुवात केली. स्वातंत्र्य दिन उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मंडळ क्रमांक १च्यावतीने तिरंगा पदयात्रा रॅली आयोजित केली होती. ही रॅली जळगावच्या खा.श्रीमती स्मिताताई वाघ, जळगावचे आ. सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. यावेळी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, मंडळाध्यक्ष आनंद सपकाळे, हर घर तिरंगा व रॅली महानगर संयोजक जयेश भावसार, माजी महापौर भारती सोनवणे, उदय भालेराव, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भैरवी पलांडे, राजू मराठे, उपाध्यक्ष नितीन इंगळे,…
भाजप महाराणा प्रताप मंडळातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पदयात्रा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय…’असा जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करत देशप्रेमींनी हाती तिरंगा घेत, महापुरुषांच्या घोषणा देत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी भाजप महाराणा प्रताप मंडळ क्रमांक ५ तर्फे काढण्यात आलेल्या पदयात्रेने पिंप्राळावासियांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे स्फुल्लिंग पेटविले. पदयात्रेचा समारोप महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नतमस्तक होऊन करण्यात आला. पिंप्राळा उपनगरातील भाजप महाराणा प्रताप मंडळातर्फे मंगळवारी सकाळी दहा वाजेला ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मंडळाध्यक्ष अतुल बारी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा नितू परदेशी, माजी नगरसेविका शोभा बारी, रेखा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य शिवस्मारकापासून पदयात्रा काढण्यात…
एका संघात ७० ते ८० गोपिका, ५०० युवती प्रात्यक्षिकेही सादर करणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशनतर्फे शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान सागर पार्कवर युवतींच्या दहीहंडीचे आयोजन केले आहे. दहीहंडी पथकात यंदा प्रथमच युवतींचे ११ संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघात ७० ते ८० गोपिका असतील. त्यासाठी ५०० युवती गोविंदांनी कसून सराव सुरू केला आहे. यंदा ५ थरांपर्यंत सराव करत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. गेल्या १७ वर्षांपासून महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी सुरू आहे. अशा उत्सवासाठी संघाची तयार अंतिम टप्प्यात आली आहे. गोपिकांच्या दहीहंडीत विविध चित्तथरारक कवायती, रोप मल्लखांब,…
भडगाव तालुक्यातील गुढे गावात पसरली शोककळा; कर्तृत्व अन् शौर्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) स्वप्निल सुभाष सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूनंतर मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या भडगाव तालुक्यातील मूळ गावी गुढे येथे सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. “वीर जवान अमर रहे” च्या घोषणा देण्यात आल्या. गावातील नागरिक, नातेवाईक, मान्यवर व माजी सैनिकांनी अश्रूंच्या धारा वाहत आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप दिला. गेल्या ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीओपी ढोलागुरी येथे सीमा फ्लड लाईट खांब दुरुस्त करताना विजेचा धक्का बसून जवान सोनवणे गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना…
स्थानिक निवडणुका… वेध राजकीय स्थितीचा…! साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : सध्याच्या राजकारणात काही नेते मंडळी स्वत:च्या राजकीय सोयीनुसार पक्षीय भूमिका बदलतात, पण या नेत्यांप्रमाणे त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिकाही बदलते का…? आणि बदलत असेल तर त्याचे प्रमाण किती…? हा खरा प्रश्न आहे. ज्येष्ठ नेते आणि रा.काँ.चे सर्वेसर्वा अर्थात संस्थापक शरद पवार यांचा ‘राष्ट्रवादी’ पक्ष शिवसेनेप्रमाणेच दुभंगला गेला आहे. त्यातून दोन गट निर्माण झाले आहेत. पण पक्षातील फुटीने काही नवीन राजकीय समिकरणे निर्माण होऊ पाहत आहेत. मूळ ‘राष्ट्रवादी’ पक्षातील फुटीमुळे दोन गट निर्माण झाले एक ‘शरद पवार’ आणि दुसरा उपमुख्यमंत्री ‘अजित पवार’ गट या दोन्ही गटाची जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती फारशी वेगळी नाही. उपमुख्यमंत्री अजित…
खा.वाघ यांचे प्रयत्न अन् तत्परता ठरली फलदायी…! साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : सुपर फास्ट नागपूर-पुणे १२ कोच असलेली वातानुकुलीत ‘वंदे भारत’ रेल्वे एक्स्प्रेस रविवारी, १० ऑगस्टपासून सुरु झाली. अशा सुपर फास्ट रेल्वे ट्रेनची जळगाव जिल्ह्यात मोठी उत्सुकता होती. ती उत्सुकता अखेर रविवारी पूर्ण झाली. पण सुपर फास्ट आणि लांब पल्ल्याच्या ट्रेनला भुसावळनंतर जळगावला थांबा मिळाला कसा…? असा प्रश्न जाणकार प्रवासी आणि खुद्द स्थानिक रेल्वे प्रशासनात चर्चिला गेला. ‘वंदे भारत’ ट्रेनला जळगाव स्थानकावर थांबा देण्याचे सुरवातीच्या वेळापत्रकात नियोजित नव्हतेच. किंबहुना जळगावच्या थांब्याचा विषयच नव्हता. पण जळगाव लोकसभेच्या खा.स्मिताताई वाघ यांनी साधारणपणे १५ दिवसांपूर्वी केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या कार्यालयात भेट…
प्राध्यापकांसह विद्यार्थिनींनी सादर केली ‘पावसाची गीते’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील डॉ.अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) येथे कला मंडळ, संगीत विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुंदर साजिरा श्रावण आला’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीला कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.व्ही. जे. पाटील होते. कार्यक्रमाचे उदघाट्न प्रमुख पाहुणे जळगाव येथील ‘हास्य जत्रा’ फेम प्रा. हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार ‘वर्धापन दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी बहिणाबाई चौधरी यांच्या कार्याचा गौरव करून संगीत विभागाच्या प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी विद्यापीठ गीत सादर केले. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ विनोदी मालिकेतील सुप्रसिद्ध कलावंत…
श्रीराम चौकातील विसावे परिवाराने मानले सर्पमित्राचे आभार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : साप पाहिल्यावर भल्या भल्यांची ‘भंबेरी’ उडते. मात्र, सापाला जीवंत पकडून त्याला सुरक्षित जंगलात सोडण्याचे कार्य सर्पमित्र करतात. अशातच जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील श्रीराम चौकातील एका घरात विषारी नाग जातीचा साप आढळला होता. त्याठिकाणी शहरातील सर्पमित्राने पकडून त्याला सुरक्षितस्थळी जंगलात सोडले आहे. याबद्दल परिवाराने सर्पमित्राचे आभार व्यक्त केले आहेत. जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर भागातील व्यकंटेश नगरातील रहिवासी तथा सर्पमित्र राजेश सोनवणे यांना रात्री ११ वाजेच्या सुमारास ‘दादा, आमच्या घरात साप शिरला आहे, तुम्ही लवकर या…’ असा भ्रमणध्वनीवरुन निरोप मिळाला होता. तेव्हा ते विनाविलंब कोल्हे हिल्स परिसरातील श्रीराम चौकातील ज्ञानेश्वर विसावे यांच्या…
बालसाहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांसह तरुणांमध्ये बालपणापासून साहित्याची आवड निर्माण व्हावी. तसेच साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, अशा उद्देशाने समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे १३, १४ आणि १५ ऑगस्ट २०२५ असे तीन दिवशीय ‘पहिले अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या साहित्य संमेलनात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच महाराष्ट्रातील साहित्यिक सहभागी होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी अभिरुची निर्माण होण्यास मदत होणार आहे.साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. जगातील कानाकोपऱ्यातून साहित्यिकांसह साहित्य रसिकांना प्रवास न करता अगदी घरी बसून साहित्य संमेलनाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे वेळेसह खर्चाचीही बचत होणार आहे. गेल्या…