लोकप्रतिनिधींसह स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी, वीरमाता-पितांची राहणार उपस्थिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी होईल. कार्यक्रमाला जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी, वीरमाता, वीरपिता उपस्थित राहतील. सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी ते ९.३५ वाजता या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी ८.३५ वाजेपूर्वी किंवा ९.३५ वाजेनंतर आयोजित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील…
Author: Sharad Bhalerao
उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही होता समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : राज्यातील प्रत्येक शाळेत १४ ऑगस्ट रोजी ‘पसायदान’ म्हणण्याचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्तालय, शिक्षण आयुक्त यांना काढले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार यंदाचे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे. शासनाच्या आदेशानुसार शहरातील मेहरुण भागातील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसह शिक्षकांसमवेत पसायदान म्हणण्यात आले. उपक्रमासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील तसेच ज्ञानचंद बऱ्हाटे, केतन बऱ्हाटे, संदीप खंडारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
सात जोडपी रंगेहाथ पकडली, कॅफे चालकावर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील बेटावद येथील कॅफेमधील घटनेची गंभीर दखल घेत जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘कॉलेज कट्टा’ नावाच्या कॅफेवर गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता पोलिसांनी छापा टाकला. कॅफेत शाळेसह महाविद्यालयातील मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. अशातच पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सात जोडपी अश्लील चाळे करत असताना रंगेहाथ पकडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात कॅफे चालकावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अशा प्रकारच्या कॅफेमुळे समाजात गैरप्रकार वाढू शकतात. त्यामुळे अशा कारवाईचे सुज्ञ नागरिकांनी स्वागत केले आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गोपनिय…
प्रवाशांच्या सुरक्षेच्या खात्रीसाठी महत्त्वाचे ठरले ‘मॉक ड्रिल’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील रेल्वे स्थानकावर दोन दहशतवादी बॉम्बसह असल्याची माहिती मिळताच आरपीएफ, जीआरपीसह पोलीस रेल्वे स्थानकात दाखल झाल्यामुळे रेल्वे स्थानकावर छावणीचे स्वरूप आले होते. पण हे पाहून प्रवाशांचीही धांदल उडाली होती. मात्र, हे सर्व मॉकड्रील असल्याचे माहिती झाल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव, १५ ऑगस्ट आणि पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी, १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब हल्ल्याचे मॉक ड्रिल घेण्यात आले. प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील गर्दीच्या ठिकाणी झालेल्या मॉक ड्रिलमध्ये बॉम्बसह दोन दहशतवाद्यांना पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. सरावासाठी जिल्हा पोलीस दल, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस, रेल्वे…
महालक्ष्मी देवी चॅरिटेबल ट्रस्टची वार्षिक सभा उत्साहात साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील महालक्ष्मी देवी चॅरिटेबल ट्रस्टची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद किसन मानकर होते. सभेला कडूबा पाटील, शकुंतला पाटील, संतोष पाटील, युवराज पाटील, प्रतिभा पाटील, व्ही.डी.पाटील आदी सभासद उपस्थित होते. प्रास्ताविकात ट्रस्टचे सचिव डी.डी.पाटील यांनी ट्रस्टच्या कामकाजाविषयी सभासदांना सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेमार्फत खुली जागा मिळवून महालक्ष्मी देवीचे भव्य मंदिर उभारण्याचा ट्रस्टचा संकल्प आहे. तो पूर्णत्वाकडे न्यायचा आहे. शहरात इतर अनेक मंदिरे आहेत. परंतु महालक्ष्मी देवीचे मंदिर नाही. शहरासह परिसरातील जनतेच्या मागणीनुसार महालक्ष्मी देवीचे मंदिर उभारले जाईल, असेही ते…
विविध उपक्रमांनी सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील हतनूर सांस्कृतिक सभागृहात स्वामिनी फाउंडेशन संचलित ‘लेवा सखी घे भरारी’चा सातवा वर्धापन दिन नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण आफ्रिकेत ९० कि.मी.ची कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या ६५ वर्षीय विद्या बेंडाळे, डॉ. रती महाजन उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पूजनासह दीप प्रज्ज्वलनाने झाली. वर्धापनदिनाचा कार्यक्रम सर्व सखींच्या हृदयात अतिशय आनंदाची उधळण करून गेला. सर्व सखींनी रोजच्या धकाधकीच्या जीवनात सिद्ध होण्यासाठी आनंदी क्षण पुन्हा हृदयात भरून घेतले. यावेळी ॲड. भारती ढाके यांनी मनोगतात लेवा पाटीदार समाजात आदर्श विवाह पद्धती अंमलात आणून…
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश ; मुख्यमंत्र्यांचे मिळाले विशेष सहकार्य साईमत/जळगाव/प्रतिनिधी : Approval for establishing a banana tissue culture plant at Hingona. केळीची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि उच्च दर्जाच्या लागवड साहित्याची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह दृष्टिकोनाशी सुसंगत, भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड यांनी महाराष्ट्र राज्यात एक अत्याधुनिक केळी ऊतक लागवड रोपे उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली आहे. ही सुविधा जळगाव आणि महाराष्ट्र राज्यातील इतर भागांमधील केळी उत्पादक शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या गरजा पूर्ण करेल, परवडणाऱ्या किमतीत रोगमुक्त, खऱ्या प्रकारातील, जास्त उत्पादन देणारी केळीची रोपे तयार करण्यासाठी संस्था काम करेल. यासाठी केंद्रीय…
नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृतीचा अभियानाचा उद्देश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उत्साहात प्रारंभ झाला आहे. अशा अभियानांतर्गत १३, १४ आणि १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक घर, दुकान, खासगी आस्थापना तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. अशा महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्देश केवळ स्वातंत्र्य दिन साजरा करणे नाही तर नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक तीव्र करणे असणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आपल्या घरावर आणि आस्थापनांवर राष्ट्रध्वज लावताना राष्ट्रध्वज संहितेतील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन…
स्पर्धेत आठवी ते दहावीच्या वर्गातील ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने विश्व संस्कृत दिनानिमित्त अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेनुसार बुधवारी, १३ ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे विशेष आयोजन केले होते. स्पर्धेत जळगाव शहरातील २५ शाळांमधून इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद ब.गो.शानबाग विद्यालयाने पटकावत सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे फिरता चषकासह सन्मानचिन्हावर नाव कोरले आहे. स्पर्धेचे उद्घाटन केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका डॉ.मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते भारतीय परंपरेनुसार शंखनाद व अग्नी प्रज्वलित करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी मू.जे.स्वायत्त महाविद्यालयाच्या विज्ञान…
रक्षाबंधननिमित्त ‘ग्रीन आर्मी’ने राबविला स्तुत्य उपक्रम साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथून जवळील मालदाभाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्त ग्रीन आर्मीच्या विद्यार्थ्यांनी गणित सुत्रे विज्ञानाच्या संज्ञा वापरुन झाडांसाठी राख्या तयार केल्या होत्या. जेव्हा-जेव्हा विद्यार्थी झाडांना पाणी देण्यासाठी येतील किंवा झाडाच्या सावलीत बसतील तेव्हा-तेव्हा त्याला भूमितीय आकृत्यांची माहिती, पायथागोरस प्रमेय, सुत्रे, घातांकाचे नियम विज्ञानातील न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, विज्ञानातील पचन संस्था, श्वसन संस्था, गतीचे नियम यासारख्या अनेक संज्ञा संकल्पना पाहतील वारंवार पाहिल्याने मुखोद्गत होतील, असा ग्रीन आर्मीचा उद्देश आहे. गेल्या आठवड्यापासून गणित शिक्षक जी.टी.पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी राख्या बनविण्याचे काम सुरू केले होते. अध्यक्षस्थानी प्र. मुख्याध्यापक एस.आर.शिकोकारे होते. यशस्वीतेसाठी…