अविश्वास प्रस्तावाच्या सभेला सामोरे जाण्यापूर्वीच दिला राजीनामा साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : अविश्वास प्रस्ताव सभेच्या एक दिवसाआधीच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शामकांत बळीराम सोनवणे यांनी सभापती पदाचा सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी राजीनामा दिला आहे. सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्याकडे स्वत:हून सादर केलेल्या राजीनामा पत्रात आपण वैयक्तिक कारणास्तव तसेच आपण हा निर्णय कुणाच्याही दबावाखाली घेतलेला नसून स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, श्री.सोनवणे यांचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांनी मंजूर केला आहे. जळगाव बाजार समितीचे सभापती शामकांत सोनवणे यांच्या कारभाराला कंटाळून समितीच्या एकूण १८ संचालकांपैकी १४ संचालकांनी ६ ऑगस्ट रोजी सोनवणेंविरुध्द अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. अशा दाखल अविश्वास…
Author: Sharad Bhalerao
खुनाच्या घटनेने जळगाव हादरले…! पोलिसांपुढील गुन्हेगारी प्रवृत्तीचे आव्हान कायम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेल्या जळगावात पुन्हा रामेश्वर कॉलनीतील एका तरूणाचा खून झाल्याने परिसर हादरला आहे. दरम्यान, ‘तरुणा’वर अज्ञात ६ ते ७ जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला संपवून ‘यमसदनी’ धाडले आहे. हा थरार पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जळगावातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचा सूर जनसामान्यांमधून उमटत आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची (बंसवाल) नावाच्या तरुणाची सोमवारी,…
सोनी नगरातील महादेवाला पंचामृताने सात जोडप्यांच्या हस्ते अभिषेक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : श्रावण महिन्यातच देवी पार्वतीने महादेवाची उपासना करून व्रत उपवास करुन त्यांना आपल्या भक्ती आणि श्रद्धेने प्रसन्न केले होते. श्रावण महिन्यात भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. अशातच पिंप्राळा परिसरातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिर मनोकामना पूर्ती करणारे असल्याने चौथ्या श्रावण सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी भर पावसातही भक्तगण ओलेचिंब होऊन ‘हर हर महादेव’, ‘बोल बम का नारा है, भोले बाबा एक सहारा है…’ असा जयघोष करत भक्तिमय वातावरणात मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी पंचामृताने सात जोडप्यांच्या हस्ते अभिषेक करून पाणी, दूध आणि बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले. त्यानंतर भाविकांच्या हस्ते…
सागर पार्कवर चित्तथरारक कसरतींसह शौर्यवीर, वज्रनाथ, पेशवा ढोलपथकातील ४१५ वादकांवर युवतींचा जल्लोष साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगावच्या गोपिकांनी रोप मल्लखांब… चित्तथरारक कसरती… सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमांमधून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद द्विगणित केला. सोबतीला शौर्यवीर, पेशवा, वज्रनाथ ढोलपथकातील ४१५ वादकांनी परिसर दणाणून सोडला. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान हरिजन कन्या छात्रालय ‘गोपिकांच्या’ पथकाने चौथ्या थरावर जाऊन फोडून मिळविला. त्यांना विशेष पारितोषिकाने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशनतर्फे कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) वर २० फुट उंचीवर युवतींच्या दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी खा.स्मिता वाघ, आ.सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, जिल्हा…
प्रतिभा शिंदेंनी असंख्य अनुयायांसह ‘राष्ट्रवादीत’ प्रवेश केल्याने रा.काँ.ची ताकद निश्चितपणे वाढणार साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि रा.काँ.चे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या रविवारी, १७ ऑगस्ट रोजीच्या जळगाव दौऱ्याचे फलित काय…? असा जर राजकीयदृष्ट्या मुद्दा उपस्थित होत असेल तर त्याचे उत्तर एवढेच देता येईल की, त्यांच्या दौऱ्याने जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षात ‘नवी उमेद’ जागविली आहे. राजकीयदृष्ट्या अधिकाधिक प्रबळ होण्यासाठी हा दौरा उपयोगी पडू शकतो, असे राजकीय निरीक्षकांमध्ये मानले जात आहे. विशेषत: खान्देशमधील आदिवासी जनतेच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा त्याग करुन आपल्या असंख्य अनुयायांसह राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पक्षाची ताकद निश्चितपणे वाढणार आहे. प्रतिभा शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास…
सार्वजनिक बांधकाम विभागाची कामगिरी कौतुकास्पद ठरविणारे जिल्ह्यातील पहिलेच ठरले अधीक्षक अभियंता साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : राज्यातील म्हणा की जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या विभागाचे अभियंते कायम टिकेचे धनी राहिलेले आहेत. त्यांच्या कामांचे कौतुक तर खूप दुर्मिळ बाब आहे, पण हा समज किंवा ओळख जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी पुसुन काढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कामगिरी कौतुकास्पद ठरविणारे जिल्ह्यातील बहुधा श्री.सोनवणे पहिलेच अधीक्षक अभियंता असावे. विशेषत: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उत्स्फूर्तपणे कौतुक करावे, हे तर खूपच अनपेक्षित आहे. काहीही असो श्री. सोनवणे यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पकतेच्या जोरावर या विभागाची शान वाढविली आहे, हे मात्र निश्चित. ही प्रस्तावना…
छायाचित्रे काढणाऱ्या कॅमेराप्रेमींचा लाडका दिवस : ‘छायाचित्र दिन’ असे म्हणतात की, १ हजार शब्द जेवढे सांगू शकत नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त एक ‘छायाचित्र’ सांगून जाते. तेवढे सामर्थ्य एका छायाचित्रात अर्थात फोटोत असते. म्हणूनच, प्रत्येक छायाचित्रकार एक कलाकार असतो. अनेक छायाचित्रांना तो बोलकं करतो. छायाचित्रण कलेला प्रोत्साहन देणे हाच छायाचित्र दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. त्यानिमित्त यादिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. छायाचित्रण प्रदर्शनही आयोजित केले जाते. ज्याद्वारे देशातील प्रसिद्ध छायाचित्रकारांनी ‘क्लिक’ केलेले दुर्मीळ फोटो कार्यक्रमात प्रदर्शित केले जातात. जगभरातल्या छायाचित्रे काढणाऱ्या कॅमेराप्रेमींचा हा अत्यंत लाडका दिवस मानला जातो. यंदाही मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक छायाचित्र दिन’ आहे. अशा दिवसाला…
उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रशंसा करून उपस्थितांना केले आश्चर्यचकित साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : जिल्हा प्रशासनातर्फे जळगाव जिल्ह्यात झालेल्या कामांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुक्तकंठेपणाने प्रशंसा केली. रविवारी, १७ ऑगस्ट रोजी श्री.पवार जळगाव दौऱ्यावर आले होते. जिल्हा नियोजन भवनात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकास कामांची आढावा बैठक त्यांनी घेतली. बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, खा. स्मिताताई वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.अमोल पाटील. आ.किशोर पाटील, आ. अनिल भाईदास पाटील,आ. चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी श्री.पवार म्हणाले, मी राज्यभर फिरत असतो, कामकाजाची माहिती घेत असतो. मी प्रामाणिकपणे सांगतो की, जिल्ह्यातील काम बघून मला समाधान वाटले. विशेषतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…
पालकमंत्र्यासह जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांचा गौरव, अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे दिले आदेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा नियोजनमधून झालेल्या कामांचा आढावा घेतो. अशातच रविवारी, १८ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला. कामे खूप चांगली आणि महत्वाच्या क्षेत्रासाठी झाली आहेत. त्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्ह्यातील सर्व मंत्री, प्रशासनाच्या प्रयत्नांचे आपण विशेष कौतुक करतो, असे सांगून येणाऱ्या अर्थ संकल्पात जिल्ह्याला निश्चितपणे वाढीव निधी देऊ, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गेल्या तीन दिवसात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे करावे,…
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी केली प्रस्तावित जागेची पाहणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : यावल तालुक्यातील हिंगोणा बु. येथे केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी रविवारी, १७ ऑगस्ट रोजी पाहणी केली. भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडमार्फत अत्याधुनिक केंद्र उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र म्हणजे आशेचा किरण ठरणार आहे. अशा केंद्रामुळे शेतकऱ्यांना रोगमुक्त, उच्च उत्पादनक्षम आणि परवडणाऱ्या दरातील टिशू कल्चर रोपे वेळेत उपलब्ध होणार असून उत्पादनात वाढ होईल. हिंगोणा हे ठिकाण केंद्रासाठी आदर्श निवडले गेले आहे. खोल काळी सुपीक माती, पुरेशी पाण्याची उपलब्धता तसेच केळी पट्ट्याच्या मध्यभागी असलेला…