चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे अभिनव उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : मोबाईलच्या वाढत्या अतिवापरामुळे शालेय विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी आता मोबाईल दिसू लागले आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. असे सर्वत्र चित्र लक्षात घेऊन राष्ट्रीय मार्गावरील गिरणा नदीकाठालगतच्या जलाराम बाप्पा मंदिराशेजारील चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या अभिनव उपक्रमात येत्या रविवारी, २४ ऑगस्ट रोजी सर्वांसाठी अशी मोफत ‘मोबाईल मुक्तीची कार्यशाळा’ जलाराम मंदिराच्या हॉलमध्ये सकाळी १० ते २ वाजेपर्यंत आयोजित केली आहे. कार्यशाळेत काऊन्सेलर डाॅ.रुपाली सरोदे, माईंड कोच डॉ.नितीन विसपुते हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मोबाईलचा अतिवापर करणारे सर्व जण कार्यशाळेत सहभागी होऊन मोबाईलचा अतिरेक सहज थांबवू शकतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे…
Author: Sharad Bhalerao
विविध संगीतावर विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्याद्वारे उपस्थितांची मने जिंकली साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रेमनगरातील बीयूएन रायसोनी स्कूल (सीबीएसई पॅटर्न) मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव नुकताच आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या पालक–शिक्षक संघाच्या सदस्यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेची आरती करून झाली. इयत्ता नर्सरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध संगीतावर मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. रिमझिम पावसाच्या सरींमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी थरावर थर रचून कान्ह्याच्या रुपात दहीहंडी फोडली. यावेळी “हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी कृष्ण, राधा, सुदामा आदींच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. दहीहंडीचा क्षण सगळ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज…
जळगावात सुवर्णकार समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, मागण्यांचे दिले निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : मुंबई प्रांतासह अखंड हिंदुस्थानचे शिल्पकार तथा महान समाजसुधारक नामदार ‘शंकरशेठ’ यांचे नाव मुंबई टर्मिनलला देण्यात यावे तसेच संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजासाठी तात्काळ तीन अशासकीय सोनार समाजाचे सदस्य नियुक्त करून महामंडळाचे कार्य प्रारंभ करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन जळगाव शहरातील सुवर्णकार अर्थात सोनार समाजाच्यावतीने तसेच महाराष्ट्र सुवर्णकार सेना, सोनार हितकारणी सभा, अहिर सोनार महिला मंडळ आणि ऋणानुबंध वधू-वर पालक मेळावा समिती, जळगाव जिल्हा सुवर्णकार कारागीर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांंची भेट घेऊन समाजातील विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येऊन निवेदन सादर…
बहादरपुरातील कार्यक्रमात कवी मनोहर आंधळे यांचे ठाम मत साईमत/पारोळा/प्रतिनिधी : “मज मनापासूनी आवडते ही शाळा लाविते लळा जसा माऊली बाळा” अशा काव्योक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळा हवी असते. सोप्याकडून कठीणाकडे नेत अभ्यासाची व विषय काठीण्य पातळीची जराही भीती न दाखवता आईप्रमाणे शिक्षकाची भूमिका असली पाहिजे. म्हणजे तो विषय व शिक्षक विद्यार्थ्यांना आवडू लागतो. अर्थातच अश्याच मायाळू, संयमी व अभ्यासू शिक्षकांमुळेच शाळा समाजप्रिय ठरते, असे चाळीसगाव येथील कवी मनोहर आंधळे यांनी आपले ठाम मत मांडले.ते पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे नुकत्याच झालेल्या नूतन शिक्षण मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्ष व संस्थापक-अध्यक्ष कै. रामलाल काळूराम मिश्र यांच्या जयंतीनिमित्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मंचावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर…
साप पकडण्यासाठी संस्थेच्या सदस्यांनी दिली ‘टाँग’ची भेट साईमत/रावेर/प्रतिनिधी : तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील पाल येथील लक्ष्मण चैतन्य बापू आश्रमात स्वातंत्र्य दिनानिमित्त जळगाव वन्यजीव संरक्षण संस्थेतील सदस्यांनी सर्प जनजागृतीच्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला. त्यात सर्प, सर्पदंश, प्रथमोपचारविषयी त्यांनी माहिती दिली. आश्रमात सर्प निघण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आश्रमाला वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी सापाला न हात लावता टाँगने कसा पकडायचा त्याविषयी माहिती दिली. आश्रमास साप पकडण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी टाँग भेट दिली. यशस्वीतेसाठी जळगाव वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य राजेश सोनवणे, गणेश सपकाळे, किरण पाटील, हेमंत चव्हाण, बबलु सोनवणे, सागर मराठे, सागर चौधरी, राकेश लोखंडे, ऋषिकेश पाटील, योगेश गुंजाळ, वैभव पाटील यांनी परिश्रम…
एकता महर्षी मेहतर बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा भागातील संत मिराबाई परिसरातील एकता महर्षी मेहतर बहुउद्देशीय संस्थेतर्फे समाजातील दहावी, बारावी तसेच पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त आ.सुरेश भोळे यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी दै. ‘साईमत’चे कार्यकारी संपादक सुरेश उज्जैनवाल, सामाजिक कार्यकर्ते दिलीप चांगरे, समाजसेवक रमेश घुसर, डॉ.उमेश गोगडिया, प्रा. अविनाश जावळे, प्रा.सुनील खोडे, सफाई कामगार युनियनचे अध्यक्ष अजय घेंगट, जितेंद्र बागरे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ज्या समाजात आपला जन्म झाला. त्या समाजाचे ऋण फेडावे लागते.विद्यार्थ्यांनी शिक्षणात अथक परिश्रम घेऊन उच्च शिक्षण घेणे…
महिला सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे ‘सहल’ ठरली अविस्मरणीय साईमत/जळगाव/प्रतिनिधी : लाडशाखीय वाणी समाज सुमंगल महिला मंडळाच्यावतीने जळगाव ते उमाळा, अजिंठा व्हीव पॉईंट, आंबॠषी, सोनबर्डी महादेव मंदिर येथे महिलांची एक दिवसीय पावसाळी सहल नुकतीच उत्साहात पार पडली. सहलीत समाजातील १०० महिला सहभागी झाल्या होत्या. सहलीचे नियोजन व संकल्पना महिला मंडळाच्या अध्यक्षा सरला वाणी यांनी मांडली. ही सहल सर्व महिला सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे अविस्मरणीय ठरली. समाजातील सर्व महिला सदस्यांना एकत्र आणणे, परस्परांमध्ये जिव्हाळा, संवाद व एकोपा वाढविणे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य, अध्यात्माचा अनुभव घेणे, असा सहलीचा उद्देश होता. प्रवास सुरू होण्यापूर्वी समाजाचे युवा नेते गजानन मालपुरे, शांतीलाल नावरकर यांच्या हस्ते गाडीचे पूजन करून सहलीचा प्रारंभ…
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जाणून घेतला आढावा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी सविस्तर आढावा जाणून घेतला. अशा प्रकल्पामुळे जळगाव, जामनेर, पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांचा मोठा दिलासा मिळणार आहे. भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाची एकूण किंमत ३५३३.०५ कोटी रुपये आहे. शासन निर्णय क्रमांक ९२४/प्र.क्र.४३६/२४/मो.प्र.१, ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पत्रान्वये सुधारीत प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. अशा योजनेतून जामनेर व पाचोरा तालुक्यातील ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांचे लाभक्षेत्र स्थिर केले जाणार आहे. एकूण ९८.३५ दलघमी पाणीसाठ्याचा उपयोग होणार आहे. त्याद्वारे जळगाव तालुक्यातील १३ हजार ९०४ हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष…
सुविधेचा मंडळांनी लाभ घेण्याचे वीज महावितरणतर्फे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सार्वजनिक गणेश मंडळांना वीज महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीज जोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. या सुविधेचा सार्वजनिक गणेश मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे. गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी, पोलीस स्थानक परवाना, विद्युत निरीक्षकांचे वीज संच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी, चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. गणेशोत्सव…
२ हजार भाविकांना आ.सुरेश भोळे घडवताहेत ‘अयोध्या काशी दर्शन’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील भाविकांसाठी मोफत रेल्वेने अयोध्या-काशी यात्रा प्रवासाचे जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे यांच्या पुढाकाराने आयोजन केले आहे. विशेष यात्रेची सुरुवात रेल्वे स्थानकावरून ‘जय श्रीराम’ ‘हर हर महादेवाचा’ जयघोष करत रविवारी, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता २ हजार भाविक अयोध्या जाण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी मंत्री ना.गिरीष महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे, खा.स्मिताताई वाघ, आ.सुरेश भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण अध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी आदींनी रेल्वेला झेंडा दाखवून भाविकांना रवाना केले. ही धार्मिक यात्रा भाविकांसाठी एक अध्यात्मिक अनुभव ठरणार आहे. सर्वांच्या सहकार्याने ती यशस्वी होईल, असा विश्वास आ.सुरेश…