तीन दिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा लाभला उत्स्फूर्त सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील केसीई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र आणि ओजस्विनी कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला मातीचे गणपती बनवू या’ अशा तीन दिवसीय शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता. कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांनी १०८ मातीच्या ‘गणरायाच्या’ मूर्त्या कल्पकरित्या साकारल्या. तीन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून शाडू मातीपासून गणपती तयार करताना, गणपती स्थापनेच्या शास्त्रीय पद्धतींच्या आधारावर गणेश मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक शिल्पकार दिगंबर शिरसाळे, पियुष बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना दिले. गणपतीची बैठक व्यवस्था, शरीर यष्टी, सोंडेचा आकार, मुकुट आणि आयुध आदींबाबतीत विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साकारण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या…
Author: Sharad Bhalerao
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना दिले मूर्ती बनविण्याचे धडे साईमत/जळगाव/प्रतिनिधी : प्रेमनगरातील स्थित सीबीएसई पॅटर्न बीयूएन रायसोनी स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यशाळेत गणपती मूर्ती बनविण्याचे धडे देण्यात आले. अशा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्तींच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहचविण्यात आला. कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक साहित्य घरूनच आणून स्वावलंबन आणि क्रिएटिव्हिटीचे उत्कृष्ट दर्शन घडविले. कार्यशाळेदरम्यान पूनम अत्तरदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आकर्षक शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारल्या. संस्था चालकांनी विद्यार्थ्यांना दिले प्रोत्साहन उपक्रमातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी जागरूकता वाढविण्याबरोबरच शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करण्याचा संदेशही देण्यात आला. शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष…
बेंडाळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : समाजातील विविध अंगांचे दर्शन बहिणाबाईंच्या काव्यातून घडते. ‘मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावरं’ ह्या त्यांच्या कवितेतून मनाची चंचलता बहिणाबाईंनी अचूकपणे टिपली. ‘मनाचे’ शास्त्र जणू उलगडून सांगितले. त्यामुळे मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईडच्या रांगेत त्या जाऊन बसल्या, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्याकाळी त्यांच्या गाण्यांचा इंग्रजीत अनुवाद झाला असता तर बहिणाबाईंना नक्कीच साहित्याचा ‘नोबेल’ पुरस्कार मिळाला असता. इतक्या उंचीचे त्यांचे साहित्य असल्याचे प्रतिपादन बेंडाळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे यांनी केले. येथील डॉ.अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात (स्वायत्त) मराठी विभागाच्यावतीने खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त पूर्वदिनी…
कवितासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचे मत साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कुटुंब व्यवस्थेतील हरवत जाणारा संवाद आणि बोलका होणारा भ्रमणध्वनी समाजमनाला आज आव्हानात्मक दिशा देऊ पाहत आहे. अशावेळी पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची गरज आहे. ‘बालगुंजन’ कवितासंग्रह बालकांच्या मनातल्या गूज गोष्टी मांडत असल्याचे मत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी व्यक्त केले. बाल निरीक्षणगृहात आयोजित सुनिता नारखेडे-येवले लिखित अथर्व पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘बालगुंजन’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कवयित्री माया धुप्पड होते. प्रमुख पाहुणे म्हणून भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, बालगृह अधीक्षक रवीकिरण अहिरराव, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.नितीन विसपुते आदी उपस्थित होते.…
कार्यशाळेत जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचा सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निती आयोग व अटल इनोव्हेशन मिशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या अनुषंगाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘Arduino UNO-R4’ विषयावर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विविध विद्यालयातील शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळा नुकतीच पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि उद्दिष्टे समजावून सांगितली. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डायलबाग एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे साहिल राजपूत, बाघरा येथील स्वामी कल्याण देव डिग्री महाविद्यालयातील सौरभ कुमार यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अकॅडमीक डीन…
पुरस्कारात मानपत्रासह सन्मानचिन्हाचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसित करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातर्फे अत्यंत प्रतिष्ठित तथा मानाचा समजला जाणारा ‘स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभाला कोईमतूर येथील ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ शुगरकेन रिसर्च’ संस्थेचे संचालक डॉ. पी. गोविंदराज, नॅशनल रिसर्च इन्स्टिटयूट ऑन इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचे संचालक डॉ. आर. थंगवेलू आणि तामिळनाडू आदिवासी विभागाचे संचालक श्री. एस. अण्णादुराई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे गेल्या २१…
डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटलचा उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये तीन दिवसीय बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन कार्यशाळेला प्रतिसाद मिळाल्यामुळे उत्साहात पार पडली. कार्यशाळेत वैद्यकीय महाविद्यालयातील ३० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, डॉ.चित्रा नेतारे, एनएमसीचे निरीक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी वैद्यकीय संचालक डॉ.एन एस. आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. सुहास बोरोले, डी.एम.कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. अनंत बेंडाळे, डॉ सी.डी सारंग, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ.कैलाश वाघ, डॉ. शुभांगी घुले, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. बापुराव बिटे, डॉ.…
निमखेडी शिवार परिसरात ‘रेडक्रॉस’ दवाखान्याचे उद्घाटन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आरोग्य सेवेच्या क्षेत्रात ‘रेडक्रॉस’ने आणखी एक यशस्वी पाऊल टाकत भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून निमखेडी शिवार तसेच चंदू अण्णा नगर, शिवधाम मंदिर परिसरातील सर्व नागरिकांना अत्यल्प सेवाशुल्कात सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा आणि सवलतीच्या दरात औषधी व रुग्णसेवा मिळावी, अशा उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉसचे पदसिद्ध अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या हस्ते रेडक्रॉस संचलित रेडक्रॉस दवाखाना सुरू करण्यात आला. रेडक्रॉस संस्थेच्या पुढाकाराने सुरु केलेल्या दवाखान्यामुळे परिसरातील गरजू नागरिकांना अत्यल्प सेवा शुल्कात सेवा मिळणार आहे. भविष्यात याठिकाणी अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आरोग्य तपासणी शिबिरे व इतर आरोग्य सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे मनोगत व्यक्त…
जैन हिल्सवरील ‘पारंपरिक सण’ डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आदिवासी पारंपरिक नृत्य…विश्व गर्जना युवा सदस्यांचे ढोल-ताशांच्या वादनासह सादरीकरण, पारंपरिक संबळ वाद्यावर कंपनीच्या विविध ठिकाणी कामावर असलेल्या सालदारांचे नृत्य…कृषी संस्कृती ते मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक…जैन हिल्सवरील ‘पारंपरिक पोळा सण’… डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. अशोक जैन यांच्यासह शहरातील मान्यवरांसह अनुभूती स्कूल, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी ठेका धरत आनंदोत्सव उत्साहात साजरा केला. जैन इरिगेशनचे संस्थापक-अध्यक्ष भवरलाल जैन यांनी २९ वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्याची पद्धत सुरू केली होती. यावेळी नव्या पिढीला भारतीय कृषी संस्कृती अनुभवता यावी, त्याचे महत्त्व समजावे अशा मुख्य हेतुने शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शहरातील…
बीयूएन रायसोनी स्कूलमध्ये ‘बैलपोळा-तान्हा पोळा’ सण साजरा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रेमनगरातील सीबीएसई पॅटर्न बीयूएन रायसोनी स्कूलमध्ये पारंपरिक ‘बैलपोळा-तान्हा पोळा’ सण उत्साहात साजरा करण्यात आला. नर्सरी ते सिनिअर केजीपर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घरून रंगीबेरंगी मातीचे बैल सजवून शाळेत आणले होते. शेतकऱ्यांच्या वेषभूषेतील विद्यार्थी पाहून वातावरणात ग्रामीण संस्कृतीची ‘झलक’ खुलवली होती. लहान वासरांना सजवून त्यांना हळदी-कुंकवाचा मान देऊन गोडधोड खाऊ घालून साजरा केला जाणारा पारंपरिक सण म्हणजे ‘तान्हा पोळा’. मुले सणात घरगुती मातीच्या बैलांना सजवितात. वासरांच्या मिरवणुकीत सहभागी होऊन कृषी प्रधान संस्कृतीचा आनंद घेतात. शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी विद्यार्थ्यांना बैलपोळा सणाचे ग्रामीण जीवनाशी असलेले महत्व समजावून सांगितले. यावेळी पालक-शिक्षक संघाच्या सदस्या माला…