Author: Sharad Bhalerao

माजी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते ‘श्रीं’ची स्थापना साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील मेहरुण भागातील रामेश्वर कॉलनीतील स्थित किड्स झोन प्रि-स्कूल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी, २७ ऑगस्टपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मनपाच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते ‘श्री’ गणेशाची प्रतिष्ठापना करुन आरती करण्यात आली. तत्पूर्वी, लेझीमसह ढोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीतून ‘श्रीं’ची मूर्ती आणून प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी जयश्रीताई महाजन यांनी शाडू माती किंवा स्वहस्ते तयार केलेल्या शेतमातीच्या मूर्तींचाच स्वीकार करावा. ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, निर्माल्य कलशाचा…

Read More

मेहरूण भागातील घटना, रुग्णालयात आईचा हेलावणारा आक्रोश साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   शहरातील मेहरूण भागातील ममता हॉस्पिटलजवळ खेळत असलेल्या ६ वर्षीय चिमुकलीला अज्ञात रिक्षा चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत जबर धडक दिली. धडकेत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी सकाळी १२ ते १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत चिमुकलीचे मनिषा जयसिंग बारेला (वय ६, रा. नागलवाडी, ता. चोपडा, हल्ली मु. मेहरूण, जळगाव) असे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, स्थानिक ठेकेदार अहमद खान यांच्याकडे बांधकाम व्यवसायावर मनीषाची आई ही हातमजुरी करून उदरनिर्वाह करीत…

Read More

कविता सादर करणाऱ्यांचा प्रशस्तिपत्रक देवून सन्मान साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील ‘अभियंता भवन’ येथे रोटरी क्लब आणि व. वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त ‘रोटरी वाचन कट्टा’ उपक्रमा अंतर्गत ‘बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन’ अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात बहिणाबाईंच्या कविता सादर करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देवून सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ कवयित्री माया धुप्पड यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचे वाचन, त्यांचे रसग्रहण केले. त्यांच्या काही ओव्यांचे गायन केले. कवयित्री पुष्पा साळवे यांनी बहिणाबाईंचा जीवनपट उलगडून दाखविला आणि बहिणाबाईंवर स्वरचित कविता प्रभावीरित्या सादर केली. ‘अभियांत्रिकी स्पंदने’ पुस्तकाचे लेखक इंजि. प्रा. डॉ. महेंद्र इंगळे यांनी मनोगतात मानवी मनाच्या वर्तनावर भाष्य…

Read More

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील खंडेराव नगरातील रेल्वेपुलाखालील नाल्यात एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मयताचे मनोज माणिकराव देशमुख (रा.आशाबाबा नगर, जळगाव) असे नाव आहे. मयताच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परिसरातील नागरिकांनी आपदा मित्र जगदीश बैरागी यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यांनीही लागलीच ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मयताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तसेच बैरागी यांनी रुग्णवाहिकेसाठी पप्पू जगताप यांच्याशी संपर्क साधून तेही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. घटनास्थळी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केल्यावर मयताच्या…

Read More

तिघांना दिले एरंडोलला पोलिसांच्या ताब्यात साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  ट्रकमधून सबमर्सिबल आणि सोलर पंप चोरी करणाऱ्या चोरट्यांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील तपासकामी एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक केलेल्या तिघांची आकाश लालचंद मोरे, भरत बाबुराव बागुल, पृथ्वीराज रतीलाल पाटील अशी नावे आहेत. चोरीप्रकरणी गेल्या ३१ मे २०२५ रोजी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला होता. एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळ रस्त्यावर घडलेल्या चोरीच्या घटनेत २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सबमर्सिबल आणि सोलर पंप चोरट्यांनी ट्रकमधून चोरुन नेले होते. गुन्ह्याचा समांतर तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. गुप्त बातमीदारासह तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून हा गुन्हा आकाश लालचंद…

Read More

कंडारी जि.प. शाळेच्या भेटीप्रसंगी केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  आधुनिक तंत्रज्ञानासह उपक्रमशील अध्यापन आणि सुरक्षित, प्रेरणादायी शालेय वातावरण ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ‘गुरूकिल्ली’ आहे. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकांवर अवलंबून न राहता अध्ययन निष्पत्तीची साध्यता केली तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. यासाठी शिक्षकांनी कमकुवत विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. शिक्षक अध्यापनासोबत ‘समुपदेशकाची’ भूमिकाही बजावतात, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांनी केले. कंडारी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत त्यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष शिक्षक जिभाऊ गर्दे, पदवीधर शिक्षक ज्योती वाघ, डॉ. जगदीश पाटील, उपशिक्षक सुनंदा रोझदकर,…

Read More

बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाला मिळाली दाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  ‘निसर्गकन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांचे भावविश्व आणि ग्रामीण संस्कृती यांचे प्रतिबिंब ‘हिरिताचं देनं घेनं’ श्रावण काव्यसंध्येत उमटले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्यावतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त ‘हिरिताचं देनं घेनं’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही श्रावण काव्यसंध्या भाऊंचे उद्यान येथे पार पडली. अध्यक्षस्थानी बहिणाईंच्या पणत सून स्मिता चौधरी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कवी किरण डोंगरदिवे (बुलढाणा), कवयित्री रेणुका खटी पुरोहित (पुणे), माया धुप्पड, विमल वाणी, विश्वस्त दिनानाथ चौधरी आदी उपस्थित…

Read More

मुक्ताईनगरातील जे. ई. स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :  विद्यार्थ्यांनी जीवनात नेहमी सकारात्मक राहून योग्य मार्गाने सतत कष्ट करावे. तसेच स्वतःमधील गुणदोषांचे अवलोकन करून दोष दूर सारून प्रत्येकाने विवेकाची कास धरावी. आजच्या काळात प्रत्येकाने आत्मबळ वाढवणे अतिशय गरजेचे आहे. पुस्तके म्हणजे ज्ञानाचे दरवाजे आहेत. त्यांचा भरपूर वापर करा, असे प्रतिपादन माजी विद्यार्थिनी, कवयित्री तथा लेखिका शीतल शांताराम पाटील यांनी केले. मुक्ताईनगर येश्रील जे. ई. स्कूलमध्ये रविवारी, २४ ऑगस्ट रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्यांनी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जे.ई. स्कूल ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक व्ही.एम. चौधरी होते. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त…

Read More

आईच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवडीचा संकल्प साईमत/जामनेर/प्रतिनिधी :  तालुक्यातील टाकळी बु.येथील तथा हल्ली मुक्काम छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी ॲड. भाऊलाल हिरामण गणबास, सुकलाल गणबास, ब्रिजलाल गणबास यांच्या मातोश्री यशोदाबाई हिरामण गणबास यांचे गेल्या १० ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या उत्तरकार्याचा कार्यक्रम महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते शिवदास महाजन यांच्या हस्ते कुलदैवताच्या पूजनासह महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून नुकताच पार पडला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमास टाकळी खुर्द येथील माजी सरपंच बाळू चवरे यांनी सार्वजनिक सत्यधर्म विस्तृत मांडून, महापुरुषाचे कार्य व समाजात त्यांचे योगदान विषयावर प्रेरणात्मक प्रबोधन केले. अंधभक्त न…

Read More

जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशनची कामगिरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   शहरातील शनीपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली मोटार सायकल चोरीच्या प्रकरणाच्या तपासासह हद्दपारीतील गुन्हेगाराविरुद्ध कारवाई केली आहे. मोटार सायकल चोरीच्या तपासात चोरट्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या ताब्यातून चोरीची मोटार सायकल जप्त केली आहे. दुसऱ्या कारवाईत हद्दपारीच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या गुन्हेगारास हद्दीतून पकडून त्याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. शनीपेठ पोलीस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने भुसावळच्या इराणी मोहल्ल्यातून ताब्यात घेतले आहे. शनीपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकातील पो.हे.कॉ. प्रदीप नन्नवरे, पो.हे.कॉ. शशिकांत पाटील, अंमलदार निलेश घुगे, रवींद्र तायडे, पराग दुसाने, अमोल…

Read More