साईमत, धुळे । प्रतिनिधी महानगरपालिकेला विविध कामांसाठी कामगार पुरविणाऱ्या ‘आस्था’ संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी महापौर प्रतिभा चौधरी यांनी केलेल्या तक्रारीवर आता विभागीय आयुक्त कार्यालयाने याप्रकरणी आवश्यक कार्यवाही/चौकशी करावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे लक्ष लागून आहे. महापौरांची तक्रार अशी, धुळे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना आरोग्य, पाणीपुरवठा तसेच इतर कामासाठी मनुष्यबळ (कामगार) पुरविण्याचे काम ‘आस्था’ स्वयंरोजगार संस्थेला २०१९ मध्ये देण्यात आले. त्यानुसार एकूण २६३ कर्मचाऱ्यांचा मोबदला मनपातर्फे आस्था संस्थेला वेळोवेळी देण्यात आला. दरम्यान, नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शासनाकडून प्राप्त निधीचा योग्य वापर होत आहे अथवा कसे याबाबत महापौर श्रीमती चौधरी यांनी चौकशी केली. प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात…
Author: Sharad Bhalerao
साईमत, धुळे । प्रतिनिधी गोवर रुबेला आजाराच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. तीन फेऱ्यात होणाऱ्या मोहिमेचा सोमवारी, ७ ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला आहे. मोहिमेत लसीकरणापासून वंचित व अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. धुळे महानगरपालिका क्षेत्राचा विचार करता तब्बल एक हजार ४७१ लाभार्थी लसीकरणापासून वंचित अथवा त्यांचे अर्धवट लसीकरण असल्याचे समोर आले आहे. त्यातील बहुतांश लाभार्थी अल्पसंख्याक भागातील असल्याचे सांगितले जाते. या लाभार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याचे आव्हान महानगरपालिकेच्या यंत्रणेपुढे आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटाच्या बालकांसह गर्भवती मातांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना विविध लशी दिल्या जातात. खासगी तसेच शासकीय…
साईमत, नवापूर, प्रतिनिधी तालुक्यातील खांडबारा गावातील आठवडे बाजारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दहशत कायम आहे. त्यामुळे चोरटे आठवडे बाजारात पोलिसांना खुले आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे. खांडबारा येथे आठवडे बाजारात चोरीच्या घटनांना आळा घालण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरल्यामुळे चोरटे सक्रिय झाले आहेत. वारंवार आठवडे बाजारात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कधी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तर कधी चेन चोरट्यांकडून लंपास केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून मोबाईल चोरटे तसेच काही महिलाही चोरी करत असल्याचे समोर आले आहे. तसेच नवापूर शहरात मोटरसायकल चोरीचे सत्र सुरु आहे. शहरातील विविध भागात मोटरसायकल चोरीला गेल्या आहेत. खांडबारा येथील पटेल किराणा दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये एका चोरट्याने…
साईमत, धुळे, प्रतिनिधी पती-पत्नीच्या किरकोळ वादाचे रूपांतर होऊन पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मोहिदा येथे घडली. नंदा पावरा व बाळू पावरा हे दांपत्य याठिकाणी वास्तव्यास आहे. आपल्या शेतातील घरात हे दाम्पत्य रहायचे. या दोघांमध्ये रात्री वाद झाला. या वादावेळी पती बाळू याने दारुच्या नशेत पत्नी नंदा हिच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. यावेळी जबर मारहाण झाल्याने पत्नी नंदा (वय ३०) हिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोतवाल म्हणून काम करत असलेला मारेकरी पती…
साईमत, धुळे, प्रतिनिधी महानगरपालिकेचा प्रमुख आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर व पाणीपट्टीपोटी धुळे महानगरपालिकेला यावर्षी तब्बल १२८ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा हा आकडा सुखावणारा असला तरी चालू मागणी अर्थात दरवर्षी मिळू शकणारे उत्पन्न ३६.६९ कोटी रुपये आहे. अर्थात सध्या दिसत असलेल्या १२८ कोटी रुपयांच्या उत्पन्नात थकबाकीचे प्रमाण तब्बल ९१ कोटी रुपये आहे. वर्षाकाठी यातून काही कोटी रुपये वसुली होते. उर्वरित आकडा पुन्हा थकबाकीत जातो. त्यामुळे महानगरपालिकेपुढे खरी समस्या थकबाकी वसुलीचीच आहे. विशेषतः ‘ड’ वर्ग महानगरपालिकांचा प्रमुख आर्थिक स्त्रोत मालमत्ता कर, पाणीपट्टी यावरच अवलंबून आहे. इतर विविध कामे केंद्र, राज्य शासनाच्या योजनांमधून होतात. अर्थात यात महानगरपालिकेलाही थोडाफार हिस्सा…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी चोपडा आणि अमळनेर येथील कोळी लोकांना एसटीचे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी आदिवासी व क्रांती दिवस असल्याने त्याचदिवशी सकाळी ११ वाजेपासून चोपडा येथील प्रांत व तहसील कार्यालयासमोर आदिवासी कोळी जमातीतर्फे शांतता कायदा व सुव्यवस्था राखुन तीव्र अन्नत्याग सत्याग्रह, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन, रास्तारोको आंदोलन, लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांचा मोर्चाही काढण्यात येणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील शेकडों विद्यार्थी, महिला मंडळ, वयोवृद्ध मंडळी तसेच जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हा पोलीस अधिकारी तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, चोपडा पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे. अमळनेर आणि…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी दिवंगत कविवर्य ना.धों.महानोर यांना श्रद्धांजलीपर ‘आभाळाचं दान अर्थात पाऊसगान’ या पावसाच्या संकलित कवितांचा कार्यक्रम विवेकानंद विद्यालयात आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विलास पाटील, खेडीभोकरीकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जय श्री दादाजी हायस्कूल, तांदळवाडी) उपस्थित होते. सुरुवातीला कवी महानोरांच्या रेखाचित्राचे पूजन करण्यात येऊन त्यांचा जीवन परिचय उपशिक्षिका माधुरी हळपे यांनी केला. यावेळी रानकवी स्व.ना. धों.महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात पावसाच्या संकलित कविता आणि काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे अतिशय सुंदर गायन व अभिवाचन सादर केले. कविता सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रांजल सानप, नक्षत्रा सोनवणे, आर्यदीप पाटील, मनाली पाटील, जान्हवी चौधरी, प्रियंका भोई, आरोही पाटील,…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १४, १७, १९ मुले, मुली वयोगटासाठी लॉर्ड गणेशा स्कूल येथे सोमवारी, ७ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात १४, १७ वर्ष मुले व मुली गटात लॉर्ड गणेशा स्कूल अव्वल तर १९ वर्ष मुले व मुली गटात इंदिराबाई ललवाणी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय विजयी ठरले आहे. स्पर्धेत १२ संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, लॉर्ड गणेशा स्कूल संस्थेचे सचिव अभय बोहरा, प्रशासकीय अधिकारी सतीश मोरे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन व श्रीफळ वाढवून…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील राष्ट्रीय विद्यालय येथे सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य आयोजित महाराष्ट्रातील तिसरे सार्वजनिक सत्यधर्मीय प्रबोधन शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज संघाचे सचिव डॉ.सुरेश झाल्टे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संदीप पाटील, पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष आर. डी. चौधरी, ह.भ.प. सत्यशोधक भगवान माळी गुरुजी आदी उपस्थित होते. सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते साळूबा पांडव, भगवान रोकडे, भगवान बोरसे यांनी सार्वजनिक सत्यधर्म विधीकर्ते निर्माण करण्यासाठीचे प्रशिक्षण विस्तृतपणे दिले. यामध्ये सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह सोहळा, हळदी समारंभ, सत्य पूजा, गृहप्रवेश, दशक्रिया विधी आदी विधींचे कृतीयुक्त प्रशिक्षण दिले. शिबिराला नाशिक येथील राजेंद्र निकम, भालचंद्र महाजन, वाघळी येथील…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी स्वतःचा आत्मसन्मान, सुख, आरोग्य आणि स्वतःचे अस्तित्व असे सर्व आबाधित ठेवण्यासाठी निवृत्तीनंतर स्वतःला सक्षम ठेवणे गरजेचे आहे. म्हणून निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नाही. निवृत्ती म्हणजे नवीन आयुष्य, नवा आनंद होय. सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्याला प्राधान्य देऊन परिवाराला वेळ द्यावा, असे प्रतिपादन सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.ओ.माळी यांनी केले. ते पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या माध्यमातून सेवानिवृत्ती सत्कारप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त करतांना बोलत होते. व्यासपीठावर अहिराणी साहित्य गोकुळ बागुल, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार, साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे संचालक बी.एस.जाधव होते. ओबीसी शिक्षक असोसिएशनच्यावतीने…