Author: Sharad Bhalerao

साईमत,  जळगाव : प्रतिनिधी श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि श्रावण सरी बरसल्या. अशाच सरींना टिपण्यासाठी प्रगती विद्यामंदिर शाळेत ‘श्रावण सरी’ समूह गीत गायन स्पर्धा रंगली. विद्यार्थ्यांना श्रावणाचे महत्व आणि या श्रावण महिन्यात कोणकोणते विशेष सण येतात, त्याचे ज्ञान व्हावे, या उद्देशाने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली. त्यात “आला आला श्रावण”, “श्रावण मासी हर्ष मानसी” अशा गीतांचा समावेश होता. यामुळे श्रावण महिन्यावरील आधारित गाण्यांची पर्वणी उपस्थितांना मिळाली. विद्यार्थ्यांना शिक्षण देतांना नवनवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असते. या दृष्टिकोनातून प्रगती विद्यामंदिर शाळेत नवनवीन शैक्षणिक उपक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. अशा नावीन्यपूर्ण स्पर्धेचे कौतुक करताना विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद…

Read More

साईमत, अक्कलकुवा । प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या बिजरी गव्हाण येथील रेशन दुकानदार गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ग्रामस्थांना रेशनच देत नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी भर पावसात ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. रेशन मिळत नसल्याने थेट नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्यापर्यत पाठपुरावा करुनही न्याय मिळत नसल्याने गावकऱ्यांनी या मोर्चातून आपला रोष व्यक्त केला. गेल्या सहा महिन्यात गावात फक्त एकदाच रेशन वाटप झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रेशन दुकानदाराचे परवाना तात्काळ स्थगित करुन अन्य यंत्रणेमार्फत रेशन लागलीच उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. अपुरे रेशन देवून पूर्ण रेशनवर सही घेणे, महिनोन्‌‍महिने रेशनचा पुरवठा न करणे अशा अनेक तक्रारी निवेदनातून ग्रामस्थांनी…

Read More

साईमत,  शहादा । प्रतिनिधी तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखाना नागाई शुगर्स या कंपनीने चालवायला घेतला आहे. या साखर कारखान्यात दिलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या पैश्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखाना परिसरातील जवळपास १३०० शेतकऱ्यांनी या कारखान्याला आपला ऊस दिला असून गेल्या सात महिन्यापासून कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट दिलेले नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यासोबत कारखान्यावर ऊसतोड करणाऱ्या कामगारांचे ही पैसे मिळाले नसल्याने शहादा तहसील कार्यालयात नर्मदा बचाव आंदोलनाच्या ज्येष्ठ नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ऊसतोड कामगारांनी आंदोलन करत प्रशासन आणि कारखाना संचालकांची भेट…

Read More

साईमत, अक्कलकुवा । प्रतिनिधी योजनेचा लाभ देताना कोणीही कोणावर उपकार करत नाही. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम लोकप्रतिनिधींचे असते. जिल्ह्याच्या दुर्गम भागाचा विकास करायचा असेल तर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या झेंडा फडकवा, असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. रविवारी सकाळी धडगाव येथे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, नगराध्यक्ष धनसिंग पावरा, नंदुरबारचे माजी नगरसेवक कुणाल वसावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जामसिंग पराडके, उपसभापती भाईदास अगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सदस्य संदीप वळवी, शहरप्रमुख दिलवरसिंग पावरा, युवासेना…

Read More

साईमत, नंदुरबार । प्रतिनिधी येथे व परिसरात रिमझिम पाऊस वगळता अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यातच रिमझिम सरींवर उगवून आलेल्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतशिवारात कीटकनाशक फवारणीची लगबग दिसून येत आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटत आलेला आहे. मात्र, कळंबूसह परिसरात जोरदार पाऊस पडलेला नाही. रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मका, मूग, तूर, बाजरीच्या पेरणीची कामे आटोपली असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. रिमझिम पावसाच्या सरींवर पिके तगलेली आहेत. त्यातच पिकांमध्ये गवत, तण वाढत असल्याने खुरपणी, मशागतीची कामे करावी लागत आहेत.रोजंदारीचे दरही वाढलेले आहेत. जेमतेम पावसाने पिकांची वाढही खुंटत आहे. बदलत्या वातावरणामुळे कोवळ्या पिकांवर मावा,…

Read More

साईमत,  नवापूर । प्रतिनिधी येथील नगरपालिकेने शहरातील रंगेश्वर पार्क, लाखाणी पार्क, आदर्श नगरला वाळीत टाकले आहे का..? असा प्रश्न रहिवाश्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे. या भागात नागरी समस्यांबाबत त्यांनी अनेकावेळा निवेदन देऊनही त्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. साहेब, आता अती झालं हो…आता रस्ता तयार न झाल्यास नगरपालिकेसमोरच उपोषणाला बसू, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. रंगेश्वर पार्क ते लाखाणी पार्क रस्ता दुरुस्ती व पक्का रस्ता होण्याबाबतची मागणी तथा निवेदन रंगेश्वर पार्क व लाखाणी पार्क भागातील राहणाऱ्या नागरिकांनी तहसीलदार महेश पवार, मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर यांना दिले आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की, लाखाणी पार्क ते रंगेश्वर पार्क पुढे आदर्श नगर रस्ता अत्यंत खराब झालेला…

Read More

साईमत, नवापूर । प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यासाठी शासनाचे निर्देश होते. त्या अनुषंगाने १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय येथे तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सप्ताहातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये २ ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ या कार्यक्रमा अंतर्गत या दिवशी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय येथे १७ ते १८ वर्ष वयावरील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची मतदार नोंदणी कामी माहिती देण्यात आली. त्यांना मोठया संख्येने मतदार नोंदणी करावी, याबाबत तहसीलदार महेश पवार यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य मंदा गावित…

Read More

साईमत, धुळे । प्रतिनिधी राज्यातील बोगस रासायनिक खते, बी-बियाण्यांच्या प्रकरणाची ईडी, सीबीआय चौकशी करावी, नाडले गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक ईश्वर पाटील यांनी केली. दरम्यान, तेलंगणातील केसीआर सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीप्रमाणे भविष्यात महाराष्ट्रात पक्षाचे सरकार आल्यास राज्यातील शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी देऊ, अशी आश्वासक भूमिकाही त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. भारत राष्ट्र समितीतर्फे पत्रकार भवनात पत्रकार परिषद झाली. यावेळी समितीचे जिल्हा समन्वयक पाटील, अशोक कद्रे, नाना पाटील, संदीप पवार, सुनीता गोपाळ उपस्थित होते. ईश्वर पाटील म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर बोगस रासायनिक खते व बी-बियाण्यांची विक्री सुरू आहे. मात्र, शासकीय यंत्रणा सुप्तावस्थेत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी अशा कंपन्यांकडून…

Read More

साईमत, धुळे । प्रतिनिधी तालुक्यातील बोरकुंड परिसरातील बोरी नदीवर चार कोटींतून तीन साखळी बंधारे बांधण्यात आले. तिन्ही बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या प्रयत्नातून बंधारे आकारास आले आहेत. बंधाऱ्यांचे जलपूजन जिल्हा परिषद सदस्या शालिनी भदाणे यांच्या हस्ते झाले. महिला पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. बोरी बारमाही करणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दिशेने हे पुढचे पाऊल असल्याने समाधान व्यक्त झाले. बोरी बारमाही करण्यासाठी बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे व सदस्या शालिनी भदाणे यांचे अविरत प्रयत्न आहेत. यासाठी त्यांच्याजवळ महत्त्वाकांक्षी ॲक्शन प्लान आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या साठवण बंधाऱ्यांमुळे बोरीचे बारमाहीचे स्वप्न साकारताना दिसत आहे. मांडळपासून ते बोरकुंड-रतनपुरा- दोंदवाड गावादरम्यान…

Read More

साईमत, दोंडाईचा । प्रतिनिधी शहरातील सर्वच परिसरात नळांना सारख्याच दाबाचा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नवीन फिल्टर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. आता त्याद्वारे १३ हजार घरांना मोफत अत्याधुनिक नळ कनेक्शन मिळणार आहे. त्याची सुरवात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झाली. यावेळी दोंडाईचा-वरवाडे नगर पालिकेचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, माजी आरोग्य सभापती कल्पना नगराळे, भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, रवी उपाध्ये, नगरसेवक विजय मराठे, रवींद्र उपाध्ये, खलील बागवान, कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, निखिल जाधव, छोटू मराठे, जितू गिरासे, नरेंद्र गिरासे, नरेंद्र कोळी, भरत ठाकूर, चिरंजीवी चौधरी, ईश्वर धनगर, कांतिलाल मोहिते, रघुनाथ बैसाणे, देवा पाटील, राजू धनगर, संदीप धनगर,…

Read More