साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी तळोदा उपविभागातील तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यातील कोतवाल संवर्गातील साजांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शासन धोरणानुसार महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय तळोदा कार्यालयातील सभागृहात सोडत करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष कोतवाल भरती समिती तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सांगितले. तळोदा तालुक्यातील ६ सजामध्ये नळगव्हाण, करडे, सोमावल बु. कडेल, मोड, बोरद तर अक्कलकुवा तालुक्यातील ७ सजामध्ये मोरंबा, ब्राम्हणगाव, रायसिंगपूर, काठी, सिंगपूर बु., मांडवा व डाब असे १३ राजांचे कोतवाल पदे रिक्त आहेत. यासाठी शासन धोरणानुसार रिक्त पदांच्या ८० टक्के पद संख्या भरण्यासाठी साजांची निवड करणे तसेच…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका अंतर्गत समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रतिवर्षी होणारी १० टक्के मानधन वाढ २०१६ पासून रखडली आहे. ती पूर्ववत करावी, यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले. यासाठी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री अनिल पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिले. निवेदनावर तुषार बाविस्कर, अमोल पाटील, देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील, किशोर पाटील यांच्यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शासनाने त्यांच्या मागणीवर लवकर तोडगा काढावा, हे अपेक्षित आहे. राज्यातील ६ हजार २५१ कर्मचारी समग्र योजना अंतर्गत करार पद्धतीने जिल्हा परिषद अंतर्गत सेवा बजावत आहेत. त्यात विषय साधन व्यक्ती, समावेशित तज्ज्ञ, विशेष…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथे केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार “मेरी माटी मेरा देश” जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर यशस्वीपणे राबविण्याचे नियोजन प्रशासनाच्यावतीने केले आहे. त्या अनुषंगाने पाळधी बुद्रुक आणि पाळधी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत स्वतंत्र शिलाफलक उभारण्यात आला आहे. ज्या व्यक्तींनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली आहे. त्यांनी बलिदान दिले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच देशाचा स्वाभिमान जपण्यासमवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिलाफलकावर माल्यार्पण करून दिवे लावण्यात आले. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी दिनकर पाठक यांनी उपस्थित ग्रामस्थांना पंचप्राणाची प्रतिज्ञा दिली. त्यानंतर गावातील माजी सैनिक विजय सपकाळे, सचिन महाले, विजय चव्हाण, रायभान…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरे कोळी (एसटी) यांना दाखले सुलभपणे मिळावेत, यासाठी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांनी शेकडो समाज बांधवांसह व शालेय विद्यार्थ्यांसह चोपडा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर क्रांतिदिनी ९ ऑगस्टपासून तीव्र अन्नत्याग सत्याग्रह व ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी तालुका व जिल्ह्यातील चारशे पेक्षाही जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अन्नत्याग सत्याग्रहाला भारतीय आदिवासी कोळी सेना, आदिवासी वाल्मिकलव्य सेना यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यात लखी चंद बाविस्कर, योगेश बाविस्कर, डी. पी. साळुंखे, ॲड. गणेश सोनवणे, माजी सैनिक नामदेवराव येळवे, डॉ. गोकुळ बिर्हाडे, आनंदराव रायसिंग, गुलाब बाविस्कर, भरत बाविस्कर, भाईदास बाविस्कर,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही उत्तर महाराष्ट्रात एक अग्रगण्य अशी नावाजलेली बाजार समिती आहे. तीन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली, खिल्लारी बैलांसाठी तसेच भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ म्हणून चाळीसगाव बाजार समिती प्रसिद्ध आहे. आज चाळीसगाव बाजार समितीमध्ये चालू हंगामातील मूग विक्रीसाठी आला होता. माळशेवगे येथील प्रगतीशील शेतकरी, बाजार समितीचे माजी संचालक प्रवीण महारू पाटील यांचा मूग हा शेतीमाल शांताराम दामोदर ॲन्ड कंपनीमध्ये सर्वात उच्चांकी ८ हजार ६५१ रूपये दराने विक्री झाला. यापाठोपाठ सुरेश ट्रेडिंग कंपनीमध्ये शेतकरी धनराज हरी चव्हाण, वलठाण यांचा मूग हा शेतीमाल ८ हजार १८१ रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. चाळीसगाव बाजार समितीमध्ये…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील वि.का.सो.च्या स्वस्त धान्य दुकानात मातीचे दिवे लावून गहू, तांदूळ, साखरचे वाटप करून “मेरी मिट्टी मेरा देश” अमृत महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी मिट्टी मेरा देश” ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यावेळी सेल्समन उज्ज्वल पालीवाल यांनी लाभार्थ्यांना अन्नदिनानिमित्त अन्नधान्याचे महत्व समजावून सांगितले. यावेळी पाचोराचे तहसीलदार संजय चव्हाण, पुरवठा निरीक्षक अभिजीत येवले, लोहारा सोसायटीचे चेअरमन सुनील क्षीरसागर, संचालक भडके, रामदास देशमुख, सेल्समन आबा चौधरी, कर्मचारी वृंद मनोज अंबिकार, जितेंद्र पालीवाल, पत्रकार दीपक पवार,…
साईमत, लोहारा, पाचोरा : वार्ताहर पाचोरा तालुक्यातल शहापूरा येथे मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे मंजूर केलेल्या स्थानिक आमदार निधी आणि मूलभूत सुविधाअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन भाजपाचे कैलास चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात गावातंर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे १० लाख, गावातंर्गत रस्त्यावर काँक्रीटीकरण करणे १० लाख, नवीन स्मशानभूमी बांधकाम करणे, कंपाऊंड, गेट व अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे १० लाख अशा विकास कामांचा समावेश आहे. यासह ९० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच या कामांचे लोकार्पण ना. गिरीश महाजन, जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधना महाजन, सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे. भूमिपूजन आणि लोकार्पणप्रसंगी शहापुराचे सरपंच योगेश परदेशी, रामेश्वरचे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी ‘तहजीब उर्दु शाळेतील विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास’ अशा ठळक मथळ्याखाली दैनिक ‘साईमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याबाबत प्रशासकासह माजी नगरसेवकांबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. त्याची नगरपालिकाने दखल घेत तहजीब नॅशनल उर्दु शाळेच्या रस्त्यावर मुरूम टाकला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवासापासून होणारा त्रास दूर केला आहे. तसेच वार्ड क्रमांक १४ व १५ मधील मदनी नगरसह अनेक भागाच्या रस्त्यावर नगरपालिकाने मुरूम टाकला. याकामी सामाजिक कार्यकर्ते सलमान खान, आदिल चाऊस, वसीम शेख यांनी पाठपुरावा केला. याबद्दल नागरिकांनी दैनिक ‘साईमत’सह सलमान खान, आदिल चाऊस आणि वसीम शेख, मित्र मंडळ यांचे आभार मानले आहे.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील वरखेडे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असलेल्या तामसवाडी गावाचा पुनर्वसन प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर याप्रश्नी आ.मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत तामसवाडी गावासाठी मालेगाव रस्त्यालगत पिलखोड गावाच्या अलीकडे जागा निश्चित करून दिल्याने मोठ्या प्रतिक्षेनंतर तामसवाडी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी तामसवाडी गावाचे मुख्य रस्त्यालगतच पुनर्वसन होणार असल्याने तामसवाडी ग्रामस्थांनी आ.मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत. अखेर तामसवाडी गावाच्या पुनर्वसनाचा तिढा सुटला आहे. सध्या पूर्णत्वास आलेल्या वरखेडे धरणाच्या बुडीत क्षेत्रात तामसवाडी गाव येत आहे. गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाच्यावतीने देण्यात येणारी शासकीय जमीन तामसवाडी ग्रामस्थांना मान्य नसल्याने त्यांनी गावासाठी पिलखोड व टाकळी…
साईमत, शिरपूर : प्रतिनिधी तालुक्यातील उपरपिंड शिवारात तापी नदीपात्रात मंगळवारी, ८ ऑगस्ट रोजी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पट्टीच्या पोहणाऱ्यामार्फत मृतदेह दुपारी पाण्याबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी उपरपिंडचे पोलीस पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना माहिती देत हद्दीत कोणी बेपत्ता असल्याची माहिती जाणून घेतली. तसेच पोलिसांनी नागरिकांना मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील उपरपिंड शिवारात तापी नदी काठावर मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाण्यावर तरंगताना एक ३५ वर्षीय अनोळखी पुरुष व्यक्तीचा मृतदेह…