Author: Sharad Bhalerao

एमआयडीसी पोलिसांची कारवाई, दोन दिवसांची पोलीस कोठडी साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   शहरातील अजिंठा चौकात एका व्यक्तीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवून २२ हजार ५०० रुपयांची रोकडसह मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अजिंठा चौकातील बस थांब्यावर एक व्यक्ती २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धुळे येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत होता. त्याचवेळी एक…

Read More

जनहिताच्या शासकीय योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ.रवींद्र ठाकूर त्यांनी सोमवारी, १ सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला.यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी डॉ.ठाकूर यांनी सहायक संचालक म्हणून मंत्रालय, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक, छत्रपती संभाजी नगर तर अहिल्यानगर, पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर काम केले आहे. डॉ.ठाकूर हे मूळचे जळगाव येथील आहेत. त्यांनी शासकीय सेवेत येण्यापूर्वी दैनिक जनशक्ती, देशदूत अशा वृत्तपत्रांमध्ये तसेच मु. जे. महाविद्यालयात संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग प्राध्यापक म्हणून काम केले आहे. जिल्हा माहिती कार्यालय हे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाचा दुवा…

Read More

पदवीधर आमदारांकडे जुक्टो संघटनेतर्फे निवेदनाद्वारे मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मासिक वेतनातून कपात झालेल्या एन.पी.एस. वर्गणीच्या रकमा तब्बल १ वर्ष उलटून गेले तरी अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेल्या नाहीत. याबाबत वेतन पथक कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही थातूरमातूर उत्तर देऊन बोळवण केली जात आहे. जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच पदवीधर आमदार सत्यजित तांबे रविवारी जळगाव महानगरात कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी महानगर कार्यकारिणीच्यावतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन या व इतर प्रलंबित न्याय्य समस्यांबाबत निवेदन देत वस्तुस्थिती कथन केली. निवेदन देतेवेळी महानगर कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा प्रा.अनिता…

Read More

जगातले चांगले सत्कर्म : मेळाव्यात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे प्रतिपादन साईमत/यावल/प्रतिनिधी :  येथील बोरावल गेटजवळील पद्मावती हॉलमध्ये जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा जिल्हा मेळावा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला. स्वस्त धान्यापासून गरजू लाभार्थी वंचित राहिला नको, असे शासनाचे ध्येय उद्दिष्ट आहे. शासनातर्फे स्वस्त धान्य दुकानदार दर महिन्याला जे धान्य वाटप करतात, ते काम म्हणजे जगातले चांगले सत्कर्म असल्याचे यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले. उपस्थित धान्य दुकानदारांचे उत्कृष्ट कार्य असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांच्या विविध अडीअडचणीही समजून घेतल्या. तसेच पुरवठा विभागही स्वतंत्र वेगळी यंत्रणा असली तरी अनेक लाभार्थ्यांच्या काही तक्रारी…

Read More

तिघे आरोपी अटकेत, सात दिवसांची सुनावली पोलीस कोठडी साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : येथील माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर गेल्या २६ ऑगस्ट रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शहर पोलीस ठाण्यापासून आरोपींची न्यायालयापर्यंत पायी धिंड काढत रविवारी, ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आता शांतता प्रस्थापित झाली आहे. लोकांच्या मनात तयार झालेली भीतीही आता नष्ट झाली असल्याचे सद्यस्थितीला परिस्थिती आहे. याप्रकरणी शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी शहरात महिलांनी…

Read More

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  केसीई सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालय, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एकलव्य क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम एम. जे. कॉलेज कॅम्पसमधील नवीन सभागृहात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्य साधून पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी खेळाडूंना खेळ व फिटनेस उपक्रमाबाबत शपथ देण्यात आली. याप्रसंगी आ.राजूमामा भोळे, क्रीडा मार्गदर्शक तथा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त किशोर चौधरी, भारतीय शूटिंग संघाचे प्रशिक्षक दीक्षांत जाधव, जिल्हा…

Read More

जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमधील जलपातळी झपाट्याने वाढली, काही प्रकल्पही ओसंडून वाहू लागले साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जिल्ह्यात यंदा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात पाठ फिरविलेल्या पावसाने १५ ऑगस्टपासून जोरदार आगमन केले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी लावणे सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमधील जलपातळी झपाट्याने वाढली आहे तर काही प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत. गेल्या दोन दिवसातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या-नाल्यांना पूर आला असताना पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागातील कपाशीचे पीक पाण्याखाली आहे तर काही नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, पारोळा तालुक्यातील बोरी नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच ओसंडून वाहू लागली आहे. गिरणा २० तर मन्याड धरण १०० टक्के भरल्यानंतर जामदा डाव्या…

Read More

शहर पोलीस गुन्हे शोध पथकाकडून चोरीच्या गुन्ह्यांची उकल साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहर पोलीस गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. अशा कारवाईमुळे केवळ जळगाव शहरातीलच नव्हे तर धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. दरम्यान, आरोपींकडून दोन चोरीच्या दुचाकीही जप्त केल्या आहेत. सविस्तर असे की, जळगाव शहरातील शिवाजी नगरातील हमाल वाड्यातील रहिवासी उदयकुमार सुभाष कोचुरे यांची गेल्या २४ ऑगस्ट रोजी रात्री ३० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा मोपेड चोरीला गेली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी दोन पथके…

Read More

अधिकाऱ्यांसह तहसिलदारांनी संबंधितांना पाठवले आपदग्रस्तांच्या मदतीला  साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :  तालुक्यातील मारवड मंडळात शुक्रवारी, २९ रोजी १२० मिमी पाऊस झाल्याने वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८० घरातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याने ते कुटुंब उघड्यावर आले आहेत. अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी वस्त्यांमध्ये पाणी, गावांचा संपर्क तुटला. तसेच शेतांचे अतोनात नुकसान झाले. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी तातडीने ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना आपदग्रस्तांच्या मदतीला पाठवले होते. वासरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील गल्लीतील लोकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्यांना समाज मंदिरात तसेच गावातील उंच ठिकाणी असलेल्या घरांमध्ये राहण्याची सोय केली. सुमारे ८० कुटुंब…

Read More

खडसे फार्ममधील बैठकीत यु. डी.पाटील यांचे आवाहन साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :   माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस गावागावात लोकहितासह समाजहिताचे कामे करून साजरा करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष यु. डी.पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राची बैठक खडसे फार्म येथे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. बैठकीत लोकनेते माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांचा मंगळवारी, २ सप्टेंबर रोजी होणारा वाढदिवस तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत पक्षाची दिशा रणनीती भूमिका यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड.रवींद्र पाटील यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या बूथची बूथ रचना करून…

Read More