साईमत, अमळनेर : प्रतिनिधी ‘दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा’ या ओळींची आठवण करून देणारे अमळनेर येथील आर्मी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक शरद पाटील हे बालपणी शिकत असलेल्या नूतन माध्यमिक विद्यालय व आताच्या कै.शांताबाई भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय वाळकी, शेंदुणी, मालखेडा, ता.चोपडा शाळेच्या १९८९ ते १९९६ पर्यंत सोबत शिकलेल्या बालपणीच्या मित्र-मैत्रिणींचे एक अनोखे गेट-टुगेदर शिरपूर तालुक्यातील अनेर डॅम, गोरक्षनाथ मंदिर आणि नागेश्वर मंदिर येथे उत्साहात नुकतेच झाले. २७ वर्षानंतर सर्व मित्र-मैत्रिणी सहपरिवार एकत्र आले. व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र जमलेली सर्व मंडळी प्रत्यक्ष भेटली. भेटून प्रत्येकाला आनंद झाला. नागेश्वर मंदिरावर भोजनाचा आस्वाद घेऊन एकमेकांच्या परिवाराचा परिचय देत सर्व मित्र-मैत्रींणींनी बालपणीच्या खोड्या,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी पावसाच्या खंडाबाबत महसूल, कृषी एवढच काय हवामान विभागाकडे माहिती आहे. असे असताना केवळ तीन महसूल मंडळाचा समावेश कुठल्या आधारावर झाला? हा भेदभाव तालुक्यातील उर्वरित सहा मंडळातील शेतकऱ्यावर अन्याय करणारा आहे. तालुक्यातील सर्वच्या सर्व नऊ महसूल मंडळांचा पीक विमा नुकसान भरपाईमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी चाळीसगड विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी केली आहे. अशा आशयाचे निवेदन त्यांनी तालुका कृषी यांना दिले आहे. त्याच्या प्रती पालकमंत्री, आमदार, तहसीलदार यांनाही रवाना केल्या आहेत. तालुक्यात गेल्या महिनाभर पावसाने दडी मारली आहे. ही परिस्थिती तालुक्यातील नऊ महसूल मंडळात सारखी आहे. सलग २१ दिवसाचा पावसाने खंड दिला आहे. पावसाचा सलग २१ दिवसांचा…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी नदीकाठी वनभिंत तयार होवो आणि भविष्यातील पुरांपासून आपले संरक्षण व्हावे, हा नदीकाठचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि हिरवागार व्हावा म्हणून शहरातील दत्तवाडी पूल, तिरंगा पूल ते गुरुवर्य नगर या भागात मिशन वृक्षलागवड अंतर्गत बांबू आणि इतर अशी सुमारे ११२ वृक्षांची लागवड करण्यात आली. ही वृक्षलागवड मिशन पाच पाटील टीम, नगरपालिका प्रशासन, सामाजिक संस्था, दानशूर उद्योगपती, नदीकाठावरील सजग नागरिक, कॉलनी, महिला संघटना आणि लोकसहभागातून करण्यात आली. यावेळी मिशन पाचशे कोटीचे डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण, उद्योजक नारायणदास अग्रवाल, प्रदीप देशमुख, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, चाळीसगाव निरीक्षक सचिन निकम, सेवानिवृत्त सैनिक, किमयाग्रुपचे अप्पासाहेब (जितेंद्र), नागरिक तसेच मिशन ५०० भालेराव,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील तहजीब नॅशनल उर्दु हायस्कूलमध्ये चेअरमन, सचिव यांच्यासह संचालकांनी दैनिक ‘साईमत’मध्ये प्रकाशित झालेल्या सर्व वृत्तांची दखल घेत शाळेत शिस्त लावली आहे. त्यामुळे पालकांनी ‘साईमत’सह प्रस्तुत प्रतिनिधीचे आभार मानले आहेत. शाळेत सकाळी असलेले जास्त शिक्षक दुपारी शिकवित होते. त्यांना पुन्हा सकाळची वेळ देणार आणि तुकड्यात झालेल्या बदल पुन्हा नियमाने केल्या जातील, अशी ग्वाही सचिवांनी प्रतिनिधीजवळ दिली. शाळेत सीसीटीव्ही पुन्हा सुरु करून योग्य दिशेवर कॅमेरे लावले गेले. शिक्षक कर्तव्यावर असतांना आपली खासगी काम करायची त्या विषयावर संचालकांनी शाळेच्यावेळी बाहेर न जाण्याचे आदेश दिले. गुटखा, तंबाखूसारखी व्यसने शाळेच्या आवारात करण्यास बंदी घातली. खासगी क्लासेस शिक्षकांना आता घरी घेण्यासाठी बंदी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी जळगाव संचालित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय हरित सेनेमार्फत सर्पमित्र विवेक देसाई यांनी विषारी, बिनविषारी साप, त्यांच्या प्रजाती, सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार यांची विस्तृत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक निकम, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संजय बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला आशिष पाटील, सुनील तायडे यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम ज्येष्ठ शिक्षक एस.डी भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सापांविषयी असणारे समज, गैरसमज दूर केले. तसेच त्यांच्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तरे देऊन शंकेचे निरसन करण्यात आले.
साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर येथुन जवळील अडावद येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचा पूर्वीपासून पश्चिमेस वापराचा रस्ता आहे. तेथे प्रवेशद्वार (गेट) अस्तित्वात असतांना शाळेच्या मागील बाजूस बस स्टँडकडील पूर्वेस ग्रामपंचायत किंवा शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे अचानक लोखंडी प्रवेशद्वार बसविले आहे. तेथील रहिवाश्यांच्या वापराची खासगी बोळ ताब्यात घेण्याच्या इराद्याने आणि अतिक्रमित गेटच्या पुढील जागा ब्रिटिश काळापासून गुरांच्या कोंडवाड्याची आहे. तिची न्यायालयीन प्रक्रिया अद्यापही सुरू असतांना तेथे नवीन प्रवेशद्वार बसवून वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाश्यांसह ग्रामस्थांनी प्रशासनास निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संबंधित विभागांना चौकशीचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दगडु पाटील यांची सोशल मीडियामधील कामगिरीचा आढावा घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडिया विभागात राज्य सहसमन्वयक म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या प्रभारी झीनत शबरीन, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली “वॉर रूम” महिन्याभरात सुरू करण्यात येणार आहेत. युवक काँग्रेस सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या चुकीच्या जूलमी धोरणांविरोधात लढा देणार आहे. तसेच सामान्यांपर्यंत सत्य परिस्थिती मांडण्याचे कार्य करणार आहे. यांनी केले कौतुक महेश पाटील यांच्या नियुक्तीबद्दल जळगाव…
साईमत, जळगाव/पारोळा : प्रतिनिधी जिल्ह्यातील पारोळा शहरात भाजीपाला विक्रेता त्याच्याच लावलेल्या हात गाडीवर पैशांचा हिशेब करत होता. त्याचवेळी अचानक त्या ठिकाणच्या खांबावरील विजेची तार कोसळली आणि त्यात भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू झाला. पारोळा शहरातील बूधनाथ मठा जवळील महाराष्ट्र रेस्टॉरंटजवळ शनिवारी, सायंकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास घडली. परमेश्वर संतोष महाजन (वय ४२, रा. पेंढारपूर, पारोळा) असे मयत भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे. दरम्यान, भाजीपाला विक्रेत्यावर संकट कोसळून त्यांच्या जीवावर बेतल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. भाजीपाला विक्रेत्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, परमेश्वर महाजन हे शनिवारी नेहमीप्रमाणे पारोळा शहरातील बाजारपेठेतील हाकेच्या अंतरावरील हातगाडीवर भाजीपाल्याचे दुकान लावतात. शनिवारी रिमझिम पाऊस…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहराच्या उत्तरेस धार रस्त्यावरील मारुती मंदिर जवळील टेकडीचे शिवटेकडी ट्रेकिंग स्पॉट असे नामकरण पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. लोकसहभागातून टेकडीचा विकास करा, नागरिकांना निसर्गरम्य वातावरणात ट्रेकींगचे आवाहन करा. मात्र, याठिकाणी व्यसनाधीन लोकांना आणि गैरप्रकार करणाऱ्या लोकांना येऊ देऊ नका, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देऊन ट्रेकिंग करणाऱ्यांनीच काळजी घेऊन पोलिसांना कळविण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अनिल शिंदे, डॉ.संदीप जोशी, दिगंबर महाले, कुणाल पाटील, माजी नगरसेवक प्रताप शिंपी उपस्थित होते. शहराबाहेरील टेकडी ओसाड पडलेली होती. त्यामुळे प्रताप शिंपी, जीवन पवार आणि त्यांच्या मित्र परिवाराने…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जीवेठार मारण्याची धमकी देत एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गेल्या २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बोदवड शहरात राहणारा इरफान इस्माईल सैय्यद (वय २५) याने ओळखीचा फायदा घेवून तिला वेळोवेळी सोबत नेवून तिच्यावर जबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितली तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी इरफान सैय्यद याच्यावर…