दोघे ताब्यात, चौघे फरार; जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही तरुणांनी रविवारी, ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता नाट्यगृहात मद्यासह मांसाहाराची पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची माहिती मिळताच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ छापा टाकला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित चार जण घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बालगंधर्व नाट्यगृहात मद्यासह मांसाहार शिजवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्याची तक्रार मिळताच महानगरपालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले आणि बांधकाम अभियंता आर.टी. पाटील घटनास्थळी…
Author: Sharad Bhalerao
शहरातील गिरणा पंपिंग परिसरातील घटना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील वाघ नगरातील ३४ वर्षीय तरुणाचा गणपती विसर्जनावेळी गिरणा नदीत बुडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. हा तरुण मित्रासोबत गणपती विसर्जनासाठी गेला होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून वाहून गेला. अद्याप त्याचा मृतदेह सापडला नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेत आहेत. मयत तरुणाचे नाव राहुल रतिलाल सोनार (वय ३४, रा. वाघ नगर, जळगाव) असे आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने तरुणाचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे राहुलच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरातील वाघ नगरात राहुल हा आई-वडील आणि मोठ्या भावासह वास्तव्यास होता.…
एलसीबीच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी, ८ सप्टेंबर पाळधी येथे एका अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. छाप्यात पोलिसांनी १६ ‘जुगारीं’ना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १२ लाख २४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात रोख रक्कम आणि विविध कंपन्यांचे मोबाईल फोनचा समावेश आहे. एलसीबीच्या कारवाईमुळे अवैध धंद्यांना मोठा चाप बसला आहे. दरम्यान, याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना पाळधी येथील एका अवैध जुगार अड्ड्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे त्यांनी तात्काळ एक पथक…
जामनेरात ओबीसी समाजासह समता परिषदेतर्फे तहसिलदारांना निवेदन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शासनाने आंदोलनाच्या झुंडशाहीला बळी पडून हैदराबाद गॅझेटिअरबाबत काढलेला शासन निर्णय (जीआर) हा पूर्णपणे असंवैधानिक आहे. तो तात्काळ रद्द करण्यात यावा, सरकारने यापूर्वीच सामाजिक आणि आर्थिक मागास वर्ग (एसबीसी) प्रवर्गातून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. शासनाच्या दबावाखाली न्या. शिंदे समितीच्या माध्यमातून ५३ लाखांहून अधिक बोगस कुणबी नोंदी करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसविण्याचा प्रकार सुरू आहे. हा प्रकार ओबीसी समाजाच्या हक्कांवर सरळ आघात आहे. न्या. शिंदे समिती पक्षपाती पद्धतीने काम करीत आहे. ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची बेकायदेशीर घुसखोरी थांबवा, अशी मागणी जामनेर शहरासह तालुक्यातील…
शिष्टमंडळातर्फे पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन साईमत/धरणगाव/प्रतिनिधी : सद्यस्थितीला गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. सध्या त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी नदीत वाया न घालवता ते शेतीसाठी पाटात सोडावे, अशी मागणी उबाठा शिवसेना शहर व तालुका शाखेने केली आहे. अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने धरणगाव पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दिले आहे. यावेळी शिवसेना उपनेते, रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले आहे. निवेदनात, गिरणा धरणातून वाहणारे पाणी दहीगाव बंधाऱ्यातून कॅनालद्वारे थेट अमळनेर तालुक्यातील शेवटच्या चारीपर्यंत सोडण्यात यावे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये पाणी पाझरून पातळी वाढण्यास फायदा होईल, अशी मागणी केली आहे.…
सोहळ्यात मनोज भालेराव, प्रवीण धनगर यांच्याही उपक्रमांची दखल घेत सत्कार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिक्षक सेलतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन यांच्या जयंती तसेच शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार करुन गौरव सोहळा रविवारी, ७ सप्टेंबर रोजी पार पडला. अध्यक्षस्थानी पक्ष निरीक्षक भास्कर काळे होते. सोहळ्यात ५० पुरस्कार्थी शिक्षकांचा सत्कार करुन गौरव करण्यात आला. त्यात मुख्याध्यापक, शिक्षक, कलाशिक्षक, क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी खेळाडूंचा समावेश होता. याप्रसंगी मनोज भालेराव आणि प्रवीण धनगर यांच्या महाराष्ट्रभर गाजलेल्या उपक्रमांची दखल घेत त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक संजय क्षीरसागर यांनी महाराष्ट्र गीत सादर करुन झाली. त्यांना…
गीतादास ह.भ.प. चंद्रकांत महाराज यांचे प्रतिपादन : दिंडी मिरवणुकीसह काल्याच्या किर्तनाने सप्ताहाचा समारोप साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : श्रीमद् भागवत कथा ही भारतीय संस्कृतीतील एक अतिशय पवित्र व ज्ञानप्रद ग्रंथकथा आहे. या कथेच्या श्रवणाने मनातील दुःख, चिंता व क्लेश नाहीसे होतात आणि भक्ती, शांती व आनंदाची अनुभूती मिळते. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनचरित्राबरोबरच धर्म, भक्ति, ज्ञान व वैराग्य यांचे सखोल विवेचन आहे. कथा ऐकणाऱ्याच्या मनात सद्गुणांची वाढ होते, वाईट प्रवृत्ती कमी होतात आणि अध्यात्मिक उन्नती साधता येते. भागवत कथा ही केवळ धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथकथा नसून ती जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी, आत्मशुद्धी करणारी व परमेश्वराशी जोडणारी साधना आहे, असे प्रतिपादन कथावाचक गीतादास ह.भ.प. चंद्रकांत…
निसर्ग जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे : प.पू. जनार्दन हरी महाराज साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील मोयगाव, पिंपळगाव गोलाईत येथील दोन्ही गावातील ग्रामस्थांसह वसुंधरा फाउंडेशन यांनी मिळून आई भवानी देवराईचे निर्माण कार्य हाती घेतले आहे. अशातच प.पू.महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, श्याम चैतन्य महाराज, आंतरराष्ट्रीय कृषी तज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील, सरपंच महेंद्रसिंग कच्छवाह, प्रदीप लोढा, प्रवीणसिंह पाटील, पत्रकार प्रवीण सपकाळे, पं.स.चे माजी सभापती नवलसिंग पाटील, विलाससिंह राजपूत, वनीकरण विभागाचे अधिकारी, जामनेर वनविभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच देवराईसाठी झटणारे डॉ.विश्वजीत भुजंगराव सिसोदिया यांच्या ‘देवराई एक सचित्र वनगाथा’ पुस्तकाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी वसुंधरा फाउंडेशनची वृक्षप्रेमी मंडळींसह मोयगाव येथील महिला…
पाळधी-तरसोद बाह्यवळण बायपासजवळ घडली घटना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या २७ वर्षीय ‘गणेश’ नावाचाच युवक गिरणा नदीवर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्याची घटना शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली होती. बेपत्ता झालेल्या युवकाचे गणेश गंगाराम कोळी (वय २७, रा. ममुराबाद, ता. जळगाव) असे नाव आहे. गणेश हा आई-वडील आणि बहिणीसह पाळधी-तरसोद बाह्यवळण महामार्गावरील नव्याने उभारलेल्या पुलाखाली घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेला होता. मूर्तीसह नदीत उतरल्यावर तो अचानक पाण्यात खोलवर गेल्यावर बुडू लागला. परिवाराने आरडाओरड केली मात्र, नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने कोणालाच त्याला वर काढता येणे शक्य झाले नव्हते. पाण्याच्या विसर्गामुळे शोध कार्यात अडथळे घटनेची माहिती…
विद्यार्थ्यांकडून शाळेत ज्ञार्नाजनाचा अनुभव घेत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ‘शिक्षकांची’ भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनी शाळेत शिकविण्याचा अनुभव घेऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच दिवसभर कामकाज सांभाळले. माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी विद्यार्थ्यांशी त्यांच्या अध्यापन अनुभवाबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांनी त्यांच्या विकासासाठी केलेल्या कठोर परिश्रमाबद्दल प्रेम, आदर, पावती आणि मान्यता दर्शविणारे विचार मांडले. सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचा आनंद घेऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.…