साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील हॉटेल दयानंद ते हॉटेल सदानंदपर्यंत तितूर नदीवर असलेला पूल कमी उंचीचा असल्याने तितूर डोंगरी नदीला पावसाळ्यात पूर आल्यास नदीपलीकडील अर्ध्या गावाचा संपर्क तुटून जातो. शहराच्या घाट रोडवरील भागातील जनजीवन विस्कळीत होते. म्हणून तितूर नदीवर जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचा पूल बनविण्यात यावा. तसेच चामुंडामाता मंदिराजवळील डोंगरी नदीवरील जुना पूल जीर्ण झाला आहे. तेथे नवीन पूल बांधावा, अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याकडे रयत सेनेच्यावतीने गुरुवारी, १ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील हॉटेल दयानंद ते हॉटेल सदानंदपर्यंत तितूर नदीवर असलेला पूल हा कमी उंचीचा असल्याने तितूर डोंगरी नदीला पावसाळ्यात पूर आल्यास नदीपलीकडील अर्ध्या गावाचा…
Author: Sharad Bhalerao
साईमत, साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर भुसावळ महावितरण कंपनीतर्फे ग्रामीणमधील किन्ही कक्षामधील मोतीराम नगर भागातील १८ ग्राहकांना तात्काळ २४ तासाच्या आत वीज मीटर कनेक्शन करुन दिले आहेत. तसेच अजून ३२ ग्राहकांनी नवीन वीज पुरवठा घेण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यांनाही २४ तासाच्या आत तात्काळ वीज पुरवठा देण्यात येईल, असे कळविण्यात आले. सर्व ग्राहकांना २४ तासाच्या आत वीज कनेक्शन मिळाल्यामुळे ग्राहकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच उर्वरित ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे, सहाय्यक अभियंता कविता सोनवणे, महावितरण कर्मचारी प्रकाश तायडे, गोकुळ पाटील, कैलास सुरवाडे यांच्यासह सर्व वीज ग्राहक उपस्थित होते. तसेच गावातील…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी विमुक्त जाती मुक्ती दिवसानिमित जळगाव कंजरभाट समाज समाजमंदिर येथे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. बालाणी परिवाराच्या सौजन्याने वृक्षांसाठी ट्री गार्ड देण्यात आले. तसेच वृक्ष संगोपनाची जबाबदारी सदस्यांना देण्यात आली. याप्रसंगी कंजरभाट समाजाचे ज्येष्ठ नेते बिरजू नेतलेकर, विजय दहियेकर, शाम गारुंगे, कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय अभंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, उपाध्यक्ष सचिन बाटुंगे, सचिव राहुल नेतलेकर, सहसचिव संतोष रायचंदे, खजिनदार योगेश बागडे, गौतम बागडे, संदीप गारुंगे, क्रांती बाटुंगे, अनिल नेतले, वीर दहियेकर, संदीप बागडे(कालू), जयेश माछरे, संदीप बागडे, पंकज गागडे, गणेश बागडे, अंकुश माछरे, अर्जुन माछरे, विनय नेतले, अंकुश मलके, सुदाम बागडे, चिंटू बागडे, निहाल नेतले यांच्यासह…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील केकतनिंभोरा येथील दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल स्कूल (आयसीएसई पॅटर्न) येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओशन इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून व औक्षण करून आनंद द्विगुणित केला. शेवटी मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ओशन इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी पावसाळा सुरू होऊन तीन महिने पूर्ण झाले आहेत. पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तूरडाळ आदी पीक वाया गेले आहे. महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून लवकरात लवकर चाळीसगाव तालुक्याला कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशा आशयाचे निवेदन मनसेतर्फे तहसिलदारांना देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्यासह जिल्हा संघटक भाईदास बोरसे, तालुका संघटक श्याम पाटील, उत्तम काळे, पप्पु निकम, आदेश पवार, चिंचगव्हाण शाखाध्यक्ष राहुल राठोड , गणेश राठोड, हर्षल शेरे, दिलीप राठोड, ईश्वर राठोड, गोपाल राठोड, रतीलाल राठोड, राज राठोड, पवन राठोड, कल्पेश सुतार यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेच्या मास्टर परिपत्रकानुसार तातडीची व इतर मदत द्यावी. तसेच वीज मंडळाने तात्काळ निर्णय न घेतल्यास सोमवारनंतर केव्हाही तालुक्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकरी कृती समितीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाची प्रत पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना.गिरीश महाजन, ना.अनिल पाटील, जिल्हाधिकारी यांनाही दिल्या आहेत. डोक्यावर दुष्काळाचे ढग असतांना आणि ७५ टक्के हंगाम हातचा गेला असताना वेळीच कृत्रिम पाऊस पाडण्याची विनंती लक्षात न घेतल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कूपनलिकांद्वारे थोडेफार येणारे पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना वीज मंडळाने शेती वीजपंपासाठी झिरो लोडशेडींग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी हवालदिल…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी भारतीय जैन संघटना आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात सकाळपासूनच कांताई नेत्रालयात तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत होती. यावेळी नेत्रालयाचे व्यवस्थापक युवराज देसर्डा, नेत्र चिकित्सक डॉ. जैतील शेख, गांधी रीचर्स फाउंडेशनचे सदस्य प्रशांत पाटील, रजिक शेख यांचा शाल व मोतीमाळा देऊन सत्कार केला. कांताई नेत्रालयतर्फे युवराज देसर्डा यांनी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा यांचा सत्कार केला. शिबिरातून जवळपास दहा रुग्ण ऑपरेशन करण्यासाठी जळगाव रवाना झाले. कांताई नेत्रालयाने रुग्णांना जळगाव येण्या-जाण्याची सोय केली होती. यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटनेचे मयंक जैन, चेतन टाटिया, दिनेश लोढाया, विपुल छाजेड, राहुल राखेचा, दर्शन देसलोरा,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर शाखेची सहविचार सभा नुकतीच उत्साहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे होते. हिंदी दिनानिमित्त येत्या १४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्याबाबत सर्वानुमते ठरविण्यात आले. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी ग्रामीण व शहरी असे दोन गट ग्रामीण व शहरी केले आहेत. यावर्षी विविध कार्यक्रम घेण्याबाबत विचार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापक म्हणून हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एन.आर.चौधरी यांची वर्णी लागल्यामुळे मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्याचा लेखाजोखा मंडळाचे सचिव दिलीप पाटील यांनी मांडला. आगामी काळामध्ये राबवायचे उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा मंडळाचे…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथून जवळील शिवक्षेत्र खौशी येथून निमगव्हाण जय श्री दादाजी धुनिवाले मंदिराच्या पायथ्याशी तापीनदीवर जाऊन पूजाविधी करून मंदिरावर कावड यात्रेचे सर्वांनी मनोभावे पूजा करून महिलांसह बाळगोपाळांनी लाभ घेतला. शिवक्षेत्र खौशी येथील मंदिराचे बांधकाम २०१३ मध्ये पूर्ण झाले. त्या दिवसापासून सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यात रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी कावड पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. ३१ ऑगष्ट रोजी कावड पदयात्रा सकाळी ७ वाजता खौशी शिवमंदिरापासून निघून नांद्री पातोंडा, सावखेडा, निमगव्हाण तापी नदीवर येऊन सकाळी १० वाजता पोहोचली. स्नान, पूजा विधी करून धुनिवाले बाबा मंदिरात यात्रेतील सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन दुपारी १२ वाजता तापी नदीवरून…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील डॉ. हेडगेवार ग्रामपंचातीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. तीन प्रभागासाठी तीन सदस्य अशा ९ जागांसाठी ही निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भरत पारधी यांनी दिली. याप्रसंगी तलाठी विनोद पाटील, कोतवाल तरबेज खाटीक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतीसाठी ९ ग्रामपंचायत सदस्यांना निवडून द्यायचे आहे. त्यानंतर आरक्षणानंतर लोकनियुक्त सरपंचपदाची निवड करण्यात येणार आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांची संख्या २ हजार १४६ असून पुढील निवडणूक कशी असणार आहे याबाबत शुक्रवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ग्रामसभा घेवून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ही…