Author: Sharad Bhalerao

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल गोविंदा महाजन यांच्या सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील विविध योजनांच्या प्रभावीपणे उल्लेखनीय कार्याची दखल घेवून जळगाव येथील राजनंदिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना येत्या १७ सप्टेंबर रोजी अल्पबचत भवन, कलेक्टर ऑफिस जळगाव येथ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमोल महाजन यांनी सी.एस.सी. सेंटरच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पॉक्रा तसेच महाडीबिटीच्या ठिबक सिंचन, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, शेतकरी सन्मान योजना, एम.आर. इ.जी.पी.एस., एस.बी.एम योजना तसेच राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून तळागळातील सामान्य शेतकरी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा-भडगाव मतदारसंघात सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळfवण्यासाठी किंवा अर्जासाठी इतर कागदपत्रे आणि दाखले मिळfवण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागायचे. या सर्व गोष्टीतून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी सरकारतर्फे ‘ शासन आपल्या दारी ‘ उपक्रम राबविला जात आहे. पाचोरा येथील एम.एम.कॉलेज ग्राउंडवर ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात सुमारे १० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ‘ शासन आपल्या दारी ‘ उपक्रमासाठी पाचोरा येथे भडगाव रस्त्यावरील एम.एम.कॉलेजच्या ग्राऊंडवर मंडप उभारणीचे कामही सुरु केले आहे. उपक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री ना.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी आश्रमशाळा देवळी येथे शिक्षक दिन तसेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सतिष पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक विनोद देसले यांनी दीपप्रज्ज्वलन करून प्रतिमा पूजन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावत शाळेचा संपूर्ण कार्यभार सांभाळला. यासाठी त्यांना सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. शिक्षक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष कैलासबापू सूर्यवंशी यांनी तसेच संस्थेच्या संचालिका जयश्री सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन पाटील तर आभार भूषण बहिरम यांनी मानले.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिरात १०४ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजसेवेत योगदान दिले. शिबिराचे उद्घटन हिराशेठ बजाज, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, संत निरंकारी मंडळाच्यावतीने महेश वाघ, सेक्टर संयोजक, पाचोरा, आ. विजय परदेशी, ब्रांच मुखी, बहाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. रक्तदान शिबिराची प्रचार रॅली चाळीसगाव शहरात राबविण्यात आली होती. चाळीसगाव ब्रांचमधील कॅशियर बाबाजी कवडे, अकाऊंटट जयसिंग पाटील, आसपासच्या पाड्यातून प्रबंधक, साधसंगत व सेवादल युनिट नं. ११८८ चे सेवादल संचालक सतिष भालेराव, सेवादल शिक्षक ईश्वर कुमावत, सेवादल महिला इंचार्ज मनिषा मराठे तसेच सेवादल महिला व पुरुषांनी…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर जळगाव जिल्ह्यात सध्या काँग्रेसची ‘जनसंवाद’ यात्रा सुरू आहे. ही जनसंवाद यात्रा धरणगाव येथे सोमवारी आल्यावर यात्रेचे धरणगाव तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. यात्रेत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, माजी अध्यक्ष ॲड. संदीप भैया पाटील, प्रा.डी.डी.पाटील, नाजिम खान, विजू अण्णा महाजन, डॉ.फराज बोहरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धरणगाव शहरात मुख्य रस्त्यावरून रॅली काढल्यानंतर काँग्रेस कार्यालयात चांदसरचे माजी सरपंच, एरंडोल शेतकी संघाचे माजी अध्यक्ष, चांदसर पिक संरक्षण सोसायटीचे विद्यमान चेअरमन तसेच श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष अरुण बापू उर्फ वासुदेव पवार यांनी बाळासाहेब प्रदीप पवार व संदीप भैया पाटील यांच्या हस्ते…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे मंगळवारी, ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी भारतरत्न डॉ. सर्वप्पली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. सर्वप्पली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक एस.पी.निकम, ज्येष्ठ कला शिक्षक एस.डी.भिरूड उपस्थित होते. आज शाळेत शिक्षकांच्या जागी विद्यार्थी शिक्षक झाले होते. त्यामुळे ८० विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली. यावेळी भारतरत्न डॉ.सर्वप्पली राधाकृष्णन यांच्या कार्याबद्दल शाळेच्या शिक्षिका पल्लवी ठोके यांनी माहिती दिली. त्यात विद्यार्थीमधून मुख्याध्यापक रोहन पाटील, उपमुख्याध्यापिका नंदिनी अवचार, पर्यवेक्षिका म्हणून सिमरन बोरसे यांनी शाळेचा कार्यभाग सांभाळला. विद्यार्थानी आपले मनोगत व्यक्त करतांना शिक्षकांप्रती आदर व्यक्त…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील नागद रस्त्यावरील अँग्लो उर्दू हायस्कूलजवळील नगरपालिका अंतर्गत बनविण्यात आलेल्या भुयारी गटार बनविल्यापासून त्यात मोटार सायकल स्वार तर कधी चार चाकी वाहने फसत होत्या. या गटारीमुळे येथून रहदारी करणारे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला होता. या समस्या संदर्भात दैनिक ‘साईमत’ला मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी गटारीवर ढापे टाकण्यात आले आहे. याबद्दल नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते आदिल चाऊस यांनी ‘साईमत’सह प्रस्तुत प्रतिनिधीचे आभार मानले आहे.

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे संस्कृत दिनानिमित्त २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान संस्कृत सप्ताह राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी, संस्कृत भाषा अतिशय सोपी वाटावी, हाच उद्देश सप्ताहाचा आहे. या सप्ताहातंर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात समूह नृत्य स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आणि समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. फुलांचे रोप देऊन परीक्षकांचे स्वागत स्पर्धेचे परीक्षक म्हणून नंदिनीबाई मुलींचे विद्यालय येथील सीमा भारंबे, संस्कृत शिक्षिका व शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा परिसरातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर ७०० भाविकांना रुद्राक्षाचे वाटप करण्यात आले. रात्री ८ वाजता रमेश पेहलानी गु्रपच्या कलावतांनी विविध भक्तीगित सादर केल्याने परिसरातील भाविक मंत्रमुग्ध झाले होते. रुद्राक्ष घेण्यासाठी सोमवारी, ४ सप्टेंरबर रोजी सकाळी ९ वाजता दूध फेडरेशन, खोटे नगर, पिंप्राळा, मयूर कॉलनी, गणपती नगर, प्रल्हाद नगर, पांडुरंग साई नगर, हुडको, ओंकार पार्क, श्रीराम नगर, कुंभार वाडा, कोळी वाडा, चंद्रकला अपार्टमेंट, मुरली मनोहर अपार्टमेंट, सावखेडा, सोनी नगर आदी परिसरातील ७०० भाविकांना रूद्राक्षाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता रमेश पेहलानी, किशोर मोरे,…

Read More

साईमत, अक्कलकुवा : प्रतिनिधी अक्कलकुवा ग्रामपंचायतीमधील २०१९ ते २०२२ आणि १ मार्च २०२३ ते अखेर पर्यंतची माहिती विस्तृत स्वरुपाची आहे. आर्थिक व्यवहाराची असल्याने माहिती तयार करण्याकामी किमान २ महिन्याचा कालावधी लागेल. ही माहिती २ महिन्यात अवगत करण्यात येईल, असे लेखी निवेदन भाजपाचे विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांना अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन जावरे यांनी अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थित दिल्यावर तुर्त आयोजित रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे. याबाबत भाजपाचे विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन ४ सप्टेंबरपर्यंत २०१६-२०२३ पर्यंतच्या कालावधीत ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकुवा अंतर्गत झालेल्या विकास कामांचे मक्तेदारांकडून २ टक्क्याप्रमाणे जीएसटी व १ टक्के…

Read More