साईमत, धुळे : प्रतिनिधी काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा आणि राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे विरोधक हादरले आहेत. त्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता देशासह राज्यात परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी जाहीर सभेत व्यक्त केला. जिल्ह्यात आमदार पाटील यांच्या नेतृत्वात सोमवारी काँग्रेस जनसंवाद पदयात्रेला साळवे- चिमठाणे येथील क्रांतीस्मारकापासून सुरुवात झाली. पदयात्रेत जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, ज्येष्ठ सुरेश देसले, प्रफुल्ल शिसोदे, सुनील चौधरी, माजी नगरसेवक दीपक अहिरे, दीपक देसले, बाजार समिती सभापती बाजीराव पाटील, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, शिंदखेडा तालुका महिलाध्यक्षा छाया पवार, शामकांत पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, सदस्या सुरेखा बडगुजर, जिल्हा बँकेचे…
Author: Sharad Bhalerao
साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ मंजूर केला आहे. एकाच पदावर प्रशिक्षित पदाच्या शैक्षणिक अर्हतेसह पदवी संपादन करून सलग २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणीसाठी विचार क्षेत्रात घेण्यात येते. प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूरी कामी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीकडे प्रस्तावित केलेल्या १ हजार ०११ प्रस्तावांपैकी शासन नियमानुसार विहित निकषांची पूर्तता असणारे कागदपत्र प्रस्तावात सादर करणाऱ्या ४०३ पैकी सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र ठरणारे ३६२ प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्यात आली. प्रस्ताव पूर्ण असणाऱ्या मात्र सेवा ज्येष्ठतेत बसत नसलेल्या व कागदपत्र अपूर्ण असणाऱ्या ६४९ प्रस्तावांना तुर्तास मान्यता देण्यात…
साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील २०० अंगणवाड्या इमारती विना आहेत. बहुतांश अंगणवाडी या झोपडीत भरविल्या जात असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने तातडीने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने ते रोखण्यासाठी महिला बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना आणि मातांना विविध सुविधा पुरविल्या जात असतात. मात्र, धडगाव तालुक्यात २०० अंगणवाडींना इमारती नसल्याने झोपडीत त्या भरत आहे तर दुसरीकडे गरोदर माता आणि बालकांच्या वजन करण्यासाठी काटाही नसल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यातील सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण धडगाव आणि अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये आहे. कुपोषण आणि माता मृत्यू सोबत दोन हात करण्यासाठी राज्याचा महिला बालकल्याण…
साईमत, धुळे : प्रतिनिधी शिरपूरच्या भूसंपादन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आ.अमरीश पटेल यांनी अचानकपणे कार्यालयाला भेट दिली. येथे जावून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तंबी दिली. शिरपूरचे आ.अमरीश पटेल यांच्याकडे भूसंपादन विभागाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. यात प्रामुख्याने भूसंपादन कार्यालयातील कर्मचारी नियमित कार्यालयात उपस्थित राहत नाही. तसेच चुकीच्या नोंदी करून नागरिकांना नाहक त्रास देणे व या कार्यालयात एजंटगिरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याच्या तक्रारी वारंवार आ.अमरीश पटेल यांना प्राप्त झालेल्या होत्या. आ.अमरीश पटेल यांनी कार्यालयास भेट दिली. आ.पटेल यांनी कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना तक्रारींसंदर्भात खडेबोल सुनावले. शिवाय यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी…
साईमत, धुळे : प्रतिनिधी शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात मंगळवारी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनांमध्ये गॅस टँकरचाही समावेश आहे. टँकरला गळती लागली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कंटेनर आणि मालमोटार या दोन वाहनांचा अपघात झाल्याने घाटात वाहतूक खोळंबली असताना उभ्या गॅस टँकरला मागून दुसरे वाहन येऊन धडकले. त्यात इतर काही वाहनांचेही नुकसान झाले. पोलीस प्रशासनातर्फे खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निशमन दलास तसेच आपत्कालीन विभागाला बोलविण्यात आले. अपघातात एक चालक जखमी झाला आहे. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
साईमत, साक्री : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ साक्री तालुका सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी तालुका बंदचे आयोजन केले होते. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. बाजारपेठेत शुकशुकाट होता. बंद शांततेत पार पडला. साक्री तालुका मराठा समाज बांधवांनी सकाळी दहा वाजता साक्री पोलीस स्टेशन समोरील छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या प्रांगणातील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून निषेध आंदोलनाला सुरूवात केली. साक्री शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठेतील सर्वच दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली हेती. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील वैद्यकीय सेवा, एस.टी. बसेस तसेच शाळा सुरू होत्या. या व्यतिरिक्त सर्व व्यवहार…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील प्रताप महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्यांबाबत लिखित आश्वासनांची अंमलबजावणी न करणे व इतर अनेक समस्या संदर्भात चर्चा करत नसल्याने मंगळवारी, ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनी शिक्षकांनी काळी फीत लावून शासनाचा निषेध करणारे आंदोलन शैक्षणिक कामकाज नियमित सुरू करून केले. याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन यांना निवेदन दिले. तसेच आंदोलनाबाबत शिक्षक महासंघाने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन पाठविलेले आहे. आंदोलनात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उल्हास जी.मोरे, पर्यवेक्षक प्रा.आर. एम.पारधी, प्रा.ए.के.अग्रवाल, प्रा.डी.व्ही.भलकार, प्रा. सी.बी. सूर्यवंशी, संघटनेचे अध्यक्ष प्रा.दिनेश बोरसे, सचिव प्रा.स्वप्निल पवार, जिल्हाकार्याध्यक्ष प्रा.सुनील पाटील, प्रा.किरण पाटील, प्रा. आर.एस.महाजन, प्रा. सी.आर.पाटील, प्रा.बी.गुलाले, प्रा.जितेश संदानशिव, प्रा.शालिनी पवार, प्रा.बापू संदानशिव, प्रा.व्ही.एस.…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे तथा शिक्षकांना विविध झाडांची रोपे भेट व शुभेच्छा देऊन शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, प्रा.जी.जी.अत्तरदे, प्रा.हर्षा दहीलेकर, प्रा.संजय क्षीरसागर, प्रा.दिनेश महाजन आदी ज्येष्ठ शिक्षकांची उपस्थिती होती. शिक्षक दिनी सर्व विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट, विज्ञान आकृतीचे रांगोळी, प्रोत्साहनपरक सुविचार संग्रह पोस्टर, विद्यार्थ्यांनीच वर्गात शिक्षकांची भूमिका बजावून वर्गात ज्ञानार्जन केले. तसेच प्रत्येक वर्गनिहाय कार्यक्रम घेण्यात आले. प्रत्येक वर्ग सजावट, उत्कृष्ट विद्यार्थी शिक्षक निरीक्षकाचे काम सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.सविता महाजन, प्रा.सुमित काबरे, प्रा.सचिन बावस्कर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. भेटवस्तू देऊन…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात घरफोडी व शनीमदिराची दानपेटी लांबविणारा संशयित आरोपी युवराज साळुंखे (रा. संजय गांधी नगर, चाळीसगाव) याला चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आतापर्यंत वेगवेगळे चार गुन्हे दाखल आहेत. त्याने मंदिराची दानपेटी आणि घरफोडीची कबुली दिली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयितावर हद्दपारीची कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली. सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील रिंकेश हरीनाम पवानी (रा. सिंधी कॉलनी,चाळीसगाव) यांचे बंद घर फोडून २० हजाराचा मोबाईल लांबविला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, दोन महिन्यापूर्वी जामिनावर सुटून आलेला सराईत चोरटा युवराज…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी लोकशाही मार्गाने संविधानिक आरक्षणाची मागणी करणारे, जालन्यातील मराठा बहुजनांवर दडपशाही शासनकर्त्यांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा जाहीर निषेधाकरीता पाचोरा तहसील कार्यालयासमोर समस्त मराठा बहुजन समाज व सामाजिक संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन केले. या ठिकाणी वैशाली सूर्यवंशी यांनी समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत उपस्थिती नोंदवून हल्ल्याचा निषेध जाहीर केला. यापूर्वी २ सप्टेंबर रोजी त्यांनी समस्त कार्यकर्त्यांसोबत तहसीलदार यांच्याकडे हल्ल्याचा निषेध म्हणून निवेदन देऊन निषेध व्यक्त केला होता. समस्त मराठा बांधवांसोबत उपस्थित राहून अमानुष हल्ल्याचा निषेध केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, शहर प्रमुख अनिल सावंत, पप्पू राजपूत, राजेंद्र राणा, दादाभाऊ चौधरी, उपजिल्हा संघटिका तिलात्तमा मौर्य, मंदाकिनी पारोचे,…