‘विनोबा ॲप’वर उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ओपन लिंक्स फाउंडेशन अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या विनोबा ॲप’वर उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हास्तरावरील शिक्षकांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमात ‘पोस्ट ऑफ द मंथ सन्मान’ नेहा तुरे (कापूसवाडी केंद्र, बेटावद, ता. जामनेर), ‘महावाचन उपक्रम सन्मान’ स्पोकन इंग्लिश वर्ग (१ ते ३) वैशाली कदम (रांजणी, बेटावद, ता. जामनेर) यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचे संपूर्ण बेटावद केंद्रातर्फे कौतुक होत आहे. तसेच इतर शिक्षकांनीही विनोबा ॲपचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाला जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, श्री.सरोदे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे…
Author: Sharad Bhalerao
गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारासह सन्मान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगराच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ६८ गणेश मंडळांना ‘गणराया पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. शहरातील टाॅवर चौकात भारतीय जनता पार्टीने अतिशय भव्य असे व्यासपीठ उभारले होते. याठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे रोषणाई केली होती. तसेच राष्ट्र महापुरुषांच्या प्रतिमांसह त्यांचे संदेश एलईडी स्क्रीनद्वारे दिसत होते. सोहळ्याला मंत्री ना.गिरीष महाजन, आ.मंगेश चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी ट्रॉफीसह प्रभू श्रीरामाचा गमछा देऊन कार्यकर्त्यांचा मंत्री ना.गिरीष महाजन, आ.सुरेश भोळे राजू मामा, आ.मंगेश चव्हाण, जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, भाजप प्रदेश सदस्य भगतभाई बालाणी, संतोष इंगळे तसेच भाजपचे जिल्हा महानगराचे…
एम.जे. महाविद्यालयातील बायोकॅमिस्ट्री विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या बायोकॅमिस्ट्री विभागात गुणवंत पदवीपूर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका प्रा. मृणालिनी फडणवीस होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते उपस्थित होते. कार्यक्रमाला बायोकॅमिस्ट्री विभागातील ६४ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची प्रेरणा आणि गुणवत्तेची जाणीव अधिक बळकट होण्यास मदत झाली. दरवर्षी बायोकॅमिस्ट्री विभाग हा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा आणि आगामी विद्यार्थ्यांसाठी एक दर्जात्मक पायंडा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच परंपरेनुसार यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि…
पत्नी घरी परतण्यासाठी तरुण करतोय जीवाचे ‘रान’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वैतागून माहेरी निघून गेलेली पत्नी पुन्हा परत यावी, यासाठी पोलिसांची मदत घेण्या साठी गेलेल्या तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेण्याची घटना जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशनसमोर घडली. मात्र, वेळीच हा प्रकार लक्षात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या अंगातील शर्टाने पेटत्या तरुणाचे प्राण वाचविले आहेत. मात्र, जळगावच्या शासकीय सामान्य रुग्णालयात जळीत जखमी तरुणावर उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. जळीत तरुणाचे सुनील ममराज वाघ तर तरुणाचा जीव वाचविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे योगेश माळी असे नाव आहे. सविस्तर असे की, रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील समता नगर भागातील सुनील वाघ या तरुणाची पत्नी घरगुती…
घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी साधली संधी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यातंर्गंत येणाऱ्या अयोध्या नगरात घरफोडीची घटना घडली आहे. स्वामी दर्शन अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमधून चोरट्यांनी तब्बल ३ लाख ५० हजार ७५० रुपयांचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आरती कृष्णा शिंपी (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आपल्या परिवारासह गेल्या २७ ऑगस्ट रोजी मुंबई आणि सुरत येथे गेल्या होत्या. त्या १० दिवसानंतर, म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी सकाळी परत आल्या. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील…
एमआयडीसी पोलिसात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील लोणवाडी गावात जुन्या भांडणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता लोणवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर घडली होती. त्यात मिलींद हिरालाल धाडी आणि त्यांचे वडील हिरालाल धाडी यांना गंभीर मारहाण केली आहे. याप्रकरणी सोमवारी, ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, फिर्यादी मिलींद हिरालाल धाडी (वय २२, रा. लोणवाडी, ता.जळगाव) हे ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आपल्या शेतात जात होते. तेव्हा त्यांना लोणवाडी ग्रामपंचायतीसमोर तिघांनी थांबविले. विक्रम साहेबराव चव्हाण, दशरथ साहेबराव चव्हाण आणि हेमराज साहेबराव…
नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील महाबळ परिसरासह काव्यरत्नावली चौक, हतनूर कॉलनी, छत्रपती संभाजी नगर रोड, समता नगर, त्र्यंबक नगर, शकुंतला राणे विद्यालय परिसर ते संत गाडगेबाबा चौकापर्यंत रस्त्यांवर प्रचंड कचरा साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात ‘अस्वच्छता’ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी नियमित साफसफाई होत नाही. कचरा, प्लास्टिक, कुजलेले अन्न व इतर वस्तूंचा ढीग साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईडसारख्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका वाढल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यासंदर्भात नागरिकांनी सोशल मीडियावर छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा…
केंद्रीय मंत्र्यांकडून कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन, अथांग जैन यांनी स्वीकारला पुरस्कार साईमत/नवी दिल्ली/न्यूज नेटवर्क : नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसित करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतकऱ्यांंच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशनचा शिरपेचात आणखी एक पुरस्कार वाढला आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला निर्यातीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ५६व्या ईईपीसी इंडिया नॅशनल एक्सपोर्ट अवॉर्ड्सने गौरविले गेले आहे. इंडस्ट्रीयल मशिनरी अँड इक्यूपमेंट लार्ज एन्टरप्राईजेस गटात उत्कृष्ट निर्यातबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा पुरस्कार देण्यात आला.सोहळ्याला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्य पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. जैन इरिगेशनचा पुरस्कार कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन आणि जैन फार्म फ्रेश फुड…
बेंडाळे महाविद्यालयातील कृतज्ञता सन्मान सोहळ्यात प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शिक्षकाची सामाजिक बांधिलकी, शिक्षक- विद्यार्थी नातेसंबंध, शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती, संशोधन क्षेत्रातील विकास, मूल्यसंस्कार अशा विषयांवर चर्चा करून शिक्षक हा देशाचा आधारस्तंभ आहे. आदर्श विद्यार्थी घडविणे शिक्षकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन लेवा एज्युकेशनल युनियनचे सचिव प्रा. व. पु. होले यांनी केले. डॉ. जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या (स्वायत्त) आय.क्यू.ए.सी.समितीतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसह शिक्षकेतर सहकाऱ्यांसाठी ‘कृतज्ञता सन्मान सोहळा’ आयोजित केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील होते. सोहळ्यासाठी सत्कारमूर्ती म्हणून प्रा. व. पु. होले, सहसचिव प्रा. एल. व्ही. बोरोले होते. प्रारंभी सरस्वती, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, लेवा एज्युकेशनल युनियनचे संस्थापक डॉ. अण्णासाहेब…
एम.जे.कॉलेजमधील आयोजित व्याख्यानात डॉ.नितीन विसपुते यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये वाढत जाणाऱ्या मानसिक ताणाचे कारण, परिणाम आणि प्रतिबंधावर सखोल आणि अनुभवसिद्ध मार्गदर्शन करुन श्वसन तंत्र, ध्यान धारणा, वेळेचे नियोजन, शारीरिक व्यायाम तसेच सकारात्मक विचारसरणी यासारख्या विविध ताणमुक्तीच्या उपाययोजना विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. तसेच भावनिक समज, आत्मपरीक्षण आणि दैनंदिन जीवनात समतोल राखणे यांचे महत्त्व अधोरेखित करुन आपला समज बदलल्यावर आपले जग बदलते, असे प्रतिपादन जळगावातील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.नितीन विसपुते यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयातील बायोकॅमिस्ट्री विभागातर्फे पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी “ताण तणाव व्यवस्थापन” विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संचालक…