बेंडाळे महिला महाविद्यालयात प्रा. डॉ. नीता जाधव यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : स्त्रीया शिक्षित होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर त्या स्वतःच्या न्याय व हक्कांसाठी बंडाचा मार्ग अवलंबण्याऐवजी समन्वयातून समाजात लिंगभाव समानता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. त्यासाठी स्त्रियांनी स्वतः आपल्या स्वतःच्या तसेच कौटुंबिक आणि सामाजिक पर्यायाने राष्ट्राच्या चारित्र्याचा सांभाळ केला पाहिजे.स्त्री-पुरुष समता जोपासून सामाजिक आरोग्य आनंददायी होईल आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी समर्थपणे हातभार लागेल, असे प्रतिपादन डॉ. नीता जाधव यांनी केले. जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात (स्वायत्त) इंग्रजी विभागाच्यावतीने ‘लिंग समभाव व संवेदनशीलता’ विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सत्यजित…
Author: Sharad Bhalerao
एमआयडीसी पोलिसात ४ व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : एमआयडीसी परिसरातील डाळींचे व्यापारी तथा ‘सक्षम उद्योग’चे मालक विनोदकुमार चंचलचंद जैन (वय ४१) यांची सुमारे ३६ लाख ३९ हजार ६५० रुपयांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बालाजी ट्रेण्डिंगचे दलाल सूरजकांत ऊर्फ राज संजय व्यास, किशोर ट्रेडर्सचे प्रोप्रायटर किशोर मिठालाल पुरोहित, आयुष ट्रेडर्सचे प्रोप्रायटर दीपक राजेश व्यास आणि विष्णुकांत लक्ष्मी नारायण पुरोहित ट्रेडर्सचे प्रोप्रायटर श्रीकांत पुरोहित यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्यातील दोघांना अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, विनोदकुमार जैन हे डाळींचे (दाल) व्यापारी आहेत. सूरजकांत व्यास हा त्यांच्यामार्फत…
शहर पोलीस गुन्हे शोध पथकाची यशस्वी कामगिरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी, ११ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास जळगाव शहरातील गेंदालाल मिल दूध फेडरेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यासमोर चार संशयित आरोपी गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, मॅगझिनसह गैरकायदा परवानाशिवाय आपल्या कब्जात बाळगतांना आढळून आले. याप्रकरणी त्यांच्याविरुध्द जळगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्यादी पो.काँ.प्रणय सुरेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपींमध्ये युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३, रा. गेंदालाल मिल), निजामोद्दीन शेख हुसेनोद्दीन शेख (वय ३१, रा. आझाद नगर), शोएब अब्दुल सईद शेख (वय २९, रा.गेंदालाल मिल), सोहील शेख उर्फ दया…
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील स्थानिक गुन्हे शाखेने बकरीसह बोकड चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत ३ संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. सविस्तर असे की, शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात सैय्यद परवेज सैय्यद आसिफ यांनी ९ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली होती. २७ ऑगस्ट रोजी त्यांचा ७ हजार रुपये किमतीचा बोकड आणि आवेश शेख यांची ६ हजार रुपये किमतीची बकरी चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. अशा तक्रारीवरून शनिपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस…
सासरचा छळ : विवाहितेची वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आत्महत्या साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील सुंदरमोती नगरातील २३ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करुन ‘जीवन’ संपविले आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. आत्महत्या केलेल्या विवाहितेचे मयुरी गौरव ठोसर असे नाव आहे. याप्रकरणी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथील मूळ रहिवासी असणाऱ्या मयुरीचा १० मे २०२५ रोजी जळगावातील गौरव ठोसरसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच तिचा छळ सुरू झाला. सासरच्या मंडळींकडून छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिचा शारीरिक आणि…
त्रिपदी परिवारातर्फे नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील अखिल भारतीय त्रिपदी परिवार शाखेच्या परिवारातील सदस्य तथा दै. ‘साईमत’ चे ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांचे नुकतेच निधन झाले. प.पु.डॉ. बाबा महाराज यांच्या आज्ञा आणि सूचनेनुसार येत्या रविवारी, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बळीराम पेठेतील ब्राम्हण सभेसमोरील मार्तंड नागरी सहकारी पतपेढीच्यावरील चिदानंद स्वामी सभागृहात शोकसभा आणि सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने त्रिपदी परिवारात एका पोकळी निर्माण झाली आहे. ते प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून सहभागी होऊन प्रत्येक कार्यक्रमाची अचूक बातमी तयार करून ती प्रकाशित करीत होते. मात्र, ते आज आपल्यात नाहीत. त्यांच्या परिवाराच्या दुःखात अखिल भारतीय त्रिपदी परिवार…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा हा प्रामुख्याने केळी पिकासाठी ओळखला जातो. परंतु काही दिवसांपासून केळीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात संगोपनासाठी खर्च करावा लागतो. त्यानंतर पिकाला चांगल्या प्रकारे तयार करता येते. परंतु आज ज्या प्रकारे केळीला ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल दर दिला जात आहे. त्यात मजुरी वजाकरता शेतकऱ्याच्या हातात ३०० ते ४०० रुपये दरानेच पैसे मिळत असल्याचे निदर्शनात येत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्याने आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांचे शिक्षण कसे करायचे, मुला-मुलींचे लग्न कसे करावे, अशा अनेक संकटात सापडलेल्या…
बातमीचा व्यापक विचार करण्याचा दृष्टीकोन राहील सदैव स्मरणात…! ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांचे असे अचानक निधन होईल, असा विचारही कुणाच्या मनात कधी येणे शक्य नव्हते. देवाजीच्या आले मना । तेथे कुणाची चालेना ।। असेच मृत्यूचेही आहे. त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे…, सहकार्याचे…, आदराचे… संबंध होते. त्यांनी पत्रकारितेत आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटविला तर होताच वैयक्तिक पातळीवरही माणसे जोडून ठेवणाऱ्या अशा ‘अवलिया’ने जणू वेचून-वेचून माणसं कमावली होती, हे त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचे गमक होते. जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा दै. ‘साईमत’चे वरिष्ठ उपसंपादक (मानद), जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, शहरातील पत्रकार कॉलनीतील (खेडी परिसर) रहिवाशी हेमंत शंकरराव काळुंखे यांचे गेल्या बुधवारी, ३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री…
लाभक्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयावर शिवसेना उबाठाची धडक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : रब्बी हंगामात पहिले आवर्तन जानेवारीला सोडतात, ते डिसेंबरला सोडावे, अशी मागणी घेऊन शिवसेना उबाठा गटाच्या शिष्टमंडळाने माजी खासदार उन्मेश पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, १० सप्टेंबर रोजी येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडल्याने पाणी वाहून जात आहे. काही शेतकऱ्यांच्या पिकांची २१ दिवसाच्या खंडात वाढ खुंटली आहे. गेल्या १६ ऑगस्टला एका दिवसात ढगफुटीसारखा पाऊस पडून शेतकरी संकटात सापडला आहे. म्हणून नदीत पाणी न सोडता थेट जामदा व दहीगाव बंधाऱ्यातून कॅनालद्वारे चाऱ्यामध्ये…
दहा शाळेच्या ४ हजार विद्यार्थ्यांसह पालकांशी साधला थेट संवाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (योगी) आणि जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच क्लायमेट वीक इंडियाच्यानिमित्त आयोजित ‘अन्न साक्षरता यात्रा’ ही तीन दिवसांची मोहीम गेल्या ८ ते १० सप्टेंबरदरम्यान जळगावात उत्साहात पार पडली. यात्रेद्वारे दहा शाळांमधील सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांसह पालकांशी थेट संवाद साधण्यात आला. यात्रेचे उद्घाटन भैय्यासाहेब गंधे सभागृहात बालरोगतज्ज्ञ डॉ. इंद्राणी मिश्रा यांच्या हस्ते झाले. पहिल्या सत्रात शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवादात्मक उपक्रम घेण्यात आले. एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे ९ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी लेबल वाचनात…