साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी नगरपरिषदेच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत स्वच्छ भारत अभियान कक्ष, आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष व तक्रार निवारण केंद्राचे शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी चाळीसगाव नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी श्वरीमती मोना कुंदन पवार, मुकादम राजेश चंदेले, सफाई मित्र शैलेद्र खैरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, सर्व नगरपरिषद कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.
Author: Sharad Bhalerao
साईमत, चोपडा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना एकत्रीतरित्या काम करावे लागते. एकमेकात विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमात पालकांनी सहभागी व्हावे. स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांनी सराव करावा, यासाठी शाळाबाह्य परीक्षेत विद्यार्थ्यांना बसवावे. विद्यार्थी केंद्र बिंदू असला तरी पालक महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एच.बी.मोरे यांनी केले. कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाची पालक-शिक्षक सहविचार सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष कल्पना बोरसे, संगीता सोनवणे, पर्यवेक्षक एस. एल. पाटील यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते. प्रास्ताविकात पर्यवेक्षक एस. एल. पाटील यांनी सांगितले की, विद्यालयात मागील अनेक वर्षांपासून १० साठी उन्हाळी वर्ग घेत…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत चाळीसगाव महाविद्यालयात शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी अमृत कलश संकलन उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर यांनी अमृत कलश म्हणजे आपल्या मातीला, आपल्या देशाला आणि संस्कृतीला वंदन करणे आहे, असे प्रतिपादन केले. हा कलश आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. यावेळी प्राचार्यांनी एक मुठ माती कलशमध्ये टाकून सेल्फी घेतली आणि कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे, उप प्राचार्य प्रा.डी.एल.वसईकर, उप प्राचार्य डॉ.खापर्डे, एन.एस.एस.प्रमुख प्रा. आर.आर.बोरसे, एन.एस.एस.सहा.अधिकारी प्रा.डी.बी.पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.दीपाली बंस्वाल, सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.पंकज वाघमारे, डॉ.संजय सोनवणे, डॉ.समाधान जगताप, प्रा.रविंद्र पाटील आदी उपस्थित होते. यावेळी एन.एस.एस.स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने…
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथे एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाल्याच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. कजगाव येथील जुनेगाव भागातील रहिवासी तथा दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी हर्षल विलास चौधरी ह्या विद्यार्थ्यांला गेल्या दोन तीन दिवसांपासून ताप, थंडी व अन्य डेंग्यूची लक्षण आढळून आले होते. त्यामुळे त्याला कजगाव येथे दोन दिवस उपचारानंतर चाळीसगाव येथे दाखल केले आहे. शेतकरी कुटुंबातील मुलाला झालेल्या डेंग्यूच्या लागणने कजगाव गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने व ग्रामपंचायतीने सतर्क होऊन डेंग्यूला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथे बैलपोळा सण आगळ्यावेगळ्या चालीरीतीने साजरा करण्यात येतो. बस स्थानक भागातील सावता माळी चौकात बोली बोलून ‘पोळा’ फोडण्यात येतो. यावेळी प्रवीण राजेंद्र महाजन यांनी पाच हजार पाचशे रुपये बोलीवर पोळा फोडण्याचा मान घेत पहिला मान मिळविला. याप्रसंगी बोली बोलुन पोळा फोडण्याचा मान मिळविणाऱ्याचा सत्कार करण्यात आला. सरपंच रघुनाथ महाजन यांनी नारळ वाढवत बोली बोलुन फोडल्या जाणाऱ्या बोलीचा शुभारंभ करत बोली लावण्यात आली. यावेळी उपसरपंच शफी मन्यार, माजी सरपंच मनोजकुमार धाडीवाल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. बोलीतून आलेल्या पैशातून सावता माळी चौकातील हनुमान मंदिराची देखभाल, सजावट केली जाते. या आगळ्यावेगळ्या पोळ्याची चर्चा परिसरात असल्याने बोली…
साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनिअर कॉलेजात प्राचार्य के.एन.जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे शालेय समितीचे सदस्य सागर चौधरी होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक मनोज चव्हाण, पर्यवेक्षक नवल महाजन, ज्येष्ठ शिक्षक एल.डी.पाटील, आर.बी.साळुंखे, श्रीमती उषा भील, प्रा. रेखा महाजन, पूनम पाटील, श्रीमती ई.टी. भांबरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सरस्वती प्रतिमा पूजन व माल्यार्पण सागर चौधरी, जगदीशकुमार पाटील, प्राचार्य के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक मोहन चव्हाण, पर्यवेक्षक नवल महाजन यांच्या…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘होवू द्या चर्चा’ हा कार्यक्रम जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात राबवायचा आहे. त्यासाठी दोन्ही मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय पदाधिकाऱ्यांसाठी नियोजन बैठका शनिवारी आणि रविवारी आयोजित केल्या आहेत. बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विजय परब तसेच विधानसभा संपर्कप्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा मतदारसंघानिहाय बैठका (उबाठा) अशा राहतील. त्यात एरंडोल, पाचोरा, चाळीसगावसाठी शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी दु.३वा., पाचोरा येथील शिवसेना कार्यालय, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, चोपडासाठी रविवारी, १७ सप्टेंबर रोजी दु.१ वा. भुसावळ शासकीय विश्रामगृह, तर जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेरसाठी रविवारी, १७ सप्टेंबर रोजी दु.३ वा. जळगाव…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी .आर्ट्स एस. एम.ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालय येथे शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा केला. याप्रसंगी प्रमुख वक्ता तथा मार्गदर्शक म्हणून एम .एम. महाविद्यालय पाचोरा येथील प्रा. डॉ. जिजाबराव व्ही. पाटील यांनी ‘हिंदी भाषेचे महत्त्व आणि उपयोगिता’ यावर विचार मांडले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर होते. त्यांनी हिंदी भाषा व्यापार, व्यवहार व दैनंदिन जीवनात कशी प्रचलित झाली, याविषयी माहिती दिली. याप्रसंगी उपप्राचार्य डी.एल.वसईकर, डॉ. के. एस. खापर्डे, डॉ.अजय व्ही.काटे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सृष्टी पाटील, तनुश्री पाटील, दिव्या पाटील, प्रेरणा माळी, रिजवाना पिंजारी, रीना वानखेडे या विद्यार्थिनींनी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून सर्जा-राजाचा अर्थात कृषीप्रधान संस्कृतीचे प्रतीक समजला जाणारा ‘बैलपोळा’ तालुक्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झाला असला तरीही बळीराजाच्या जीवनात त्याचे स्थान आजही कायम आहे. शेतकऱ्यांच्या जोडीने शेतात राबणाऱ्या अशा सच्चा मित्राचे गोड कौतुक करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात. बैल पोळ्याच्या दिवशी त्यांना न्हाऊ खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली गेली. पुरणपोळीसारखा गोडधोड जेवणाचा नेवैद्य देऊन वाजत-गाजत बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. अनेकांनी घरीच बैलपूजा केली. यावेळी अनेक चिमुकल्यांनी बैलराजास आपल्या शेतात पूजन करुन नैवेद्य अर्पण केला.
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथुन जवळील सार्वे, ता.पाचोरा येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजेंद्र पंडीत पाटील यांची ८० हजार रुपये किंमतीची गाय ठार झाली. यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी, शेतमजूरांमध्ये घबराट पसरली आहे. यासंदर्भात वन खात्यास तक्रार देताच वन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पाचोरा तालुक्यातील सार्वे येथे गुरुवारी, १४ रोजीच्या रात्री राजेंद्र पंडीत पाटील यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. गेल्या पंधरा दिवसांपासून सार्वे आणि पिंप्री शिवारात बिबट्या शेतकऱ्यांना नजरेस पडत आहे. यापूर्वीही बिबट्याने काही डुक्कर आणि कुत्र्यांची शिकार केली होती. १४ च्या रात्री राजेंद्र पाटील यांच्या गाईची शिकार केल्याने सार्वेसह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल हर्षल…