साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
येथे एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाल्याच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. कजगाव येथील जुनेगाव भागातील रहिवासी तथा दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी हर्षल विलास चौधरी ह्या विद्यार्थ्यांला गेल्या दोन तीन दिवसांपासून ताप, थंडी व अन्य डेंग्यूची लक्षण आढळून आले होते. त्यामुळे त्याला कजगाव येथे दोन दिवस उपचारानंतर चाळीसगाव येथे दाखल केले आहे. शेतकरी कुटुंबातील मुलाला झालेल्या डेंग्यूच्या लागणने कजगाव गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने व ग्रामपंचायतीने सतर्क होऊन डेंग्यूला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.