Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुका विधी सेवा समिती, वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, २१ सप्टेंबर रोजी ग्रामीण रूग्णालयात एच.आय.व्ही.आणि इतर शारीरिकरित्या संक्रमित रोगांच्या रूग्णांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. के. आर. बागुल, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. डी.पी. परार, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. ताडे, डॉ. संदीप जोशी उपस्थित होते. शिबिरात डॉ. संदीप जोशी यांनी एच.आय.व्ही. आणि एड्समधील फरक समजावून सांगितला. तसेच एच.आय.व्ही. आणि एड्स हा आजार कशाप्रकारे होतो. त्याची लक्षणे कोणती याबाबत माहिती दिली. एच.आय.व्ही. चाचणी ग्रामीण रूग्णालयात मोफत करण्यात येते. त्याचा अहवाल हा गोपनीय ठेवण्यात येतो. याकरीता ग्रामीण रूग्णालयात ए.आर.टी.…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी शहरात जनजागृतीचा वसा हाती घेतलेल्या गणेश मंडळांपैकी चोपडा नगरीचा राजा ‘जय भवानी मंडळा’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नुसती गणरायाची स्थापना हा उद्देश डोळ्यांसमोर न ठेवता जनजागृतीचा संदेश सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचवावा, असे प्रबोधनाचे मौखिक कार्य हे मंडळ करीत आहे. यंदा चंद्रयान ३ लॉन्चिंगचे दृश्य हुबेहूब सजावट करून भक्तांना सुखद धक्का दिला आहे. एकंदरीत मंडळाच्या दरवर्षाप्रमाणे अनोख्या सजावटीमुळे भाविक भक्त गणेश दर्शनासाठी तोबा गर्दी करतात. चोपडा शहराच्या इतिहासातील सर्वात पहिले गणेश मंडळ म्हणून मल्हारपुराचे ‘जय भवानी मंडळा’चे नाव घेतले जाते. या मंडळाने ८३ वर्षापासून गणेशोत्सवाची परंपरा अखंड सुरु ठेवलेली आहे. डेकोरेशनच्या माध्यमातून समाजाला काहीना काही नवीन संदेश…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील एका ठेकेदाराकडून केलेल्या कामाच्या बिलापोटी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ह्या अवाजवी रक्कमेची मागणी करत असल्याने संबंधित ठेकेदार सुरेश (पप्पु) पाटील यांनी गुरुवारी, २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आमरण उपोषणास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, मराठा सेवा संघ, क्षत्रिय गु्रप, वंचित बहुजन आघाडी, अखिल मराठा सेवा प्रतिष्ठान, समता सैनिक दल, मराठा क्रांती मोर्चा, पाचोरा तालुका पत्रकार संघ यासह विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँन्ड सर्व्हिसेस फर्मने पाचोरा नगरपरिषदेस जंतूनाशके पुरविणे व घंटगाड्या दुरुस्ती करणे अशी पुरवठा व सेवेची…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील १४ वर्ष वयोगटातील विभागीय कुस्ती स्पर्धेत मुलांमध्ये आनंद गोपाल सोनेत हा ४४ वजन गटातून प्रथम क्रमांक पटकावून विजयी झाला. या यशामुळे आनंद सोनेतची राज्यस्तरावर निवड केली आहे. येवला येथील भाऊलाल लोणारी क्रीडा संकुल येथे २० रोजी झालेल्या नाशिक विभागात जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यातून स्पर्धक आले होते. आनंद सोनेत याने तीन राऊंडमध्ये सहा स्पर्धकांना चित करत विजय मिळविला. या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह दि शेंदुर्णी एज्युकेशन को.ऑप सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संस्थेचे चेअरमन संजय गरूड, सचिव सतिश काशीद,…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकतेच घेतलेली क्रिकेट पंचची परीक्षा वरूण देशपांडे यशस्वीपणे उत्तीर्ण झाला. त्याने संपूर्ण महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे क्रिकेटच्या राज्य पंचांच्या पॅनेलमध्ये वरूणचा समावेश केला. वरूणच्या यशाबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ॲपेक्स सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस.टी.(बापू) खैरनार, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी यांच्यासह जैन स्पोर्टस्‌‍‍ ॲकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी कौतुक केले. वरुणचे वडील अरविंद देशपांडे हे जळगाव जिल्हातील क्रिकेटचे प्रथम अधिकृत पंच आहेत. त्यानंतर जळगावचे संदीप गांगुर्डे हे दुसरे तर वरुण देशपांडे हा जिल्ह्याचा तिसरा अधिकृत पंच म्हणून जबाबदारी स्वीकारेल.

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील रोटरी जळगाव परिवारातर्फे एमकेसीएल यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या शैक्षणिक प्रकल्पाच्या निमित्त ४७ मुख्याध्यापकांचा सन्मानपत्र प्रदान करून नुकताच गौरव करण्यात आला. मायादेवी नगरातील रोटरी भवनमध्ये रोटरी साक्षरता महिना व सप्टेंबर महिन्यातील शिक्षक दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमास रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल, डॉ.राजेश पाटील, रोटरी वेस्टच्या अध्यक्ष सरीता खाचणे, मानद सचिव मुनिरा तरवारी, एमकेसीएलचे बडगुजर, प्रवीण जाधव, अक्षय गादिया उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. राजेश पाटील, सूत्रसंचालन शिल्पा सफळे तर प्रा. राजेंद्र देशमुख यांनी आभार मानले.

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी अत्यंत कडक उन्हातील १४ वर्षीय मुलींचा अंतिम सामना बघत असताना पोद्दार व पाटील स्कूलच्या मुलींची जिद्द, सांघिक भावना व चिकाटी बघून अभिमान वाटतो. म्हणून महिलांनी आपल्या आयुष्यात खेळाला सुद्धा महत्त्व द्यावे, असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी केले. त्या जळगावातील क्रीडा संकुल येथे जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अमर जैन होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे सचिव फारुक शेख, सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक ॲड. आमिर शेख, पोद्दारच्या क्रीडा संचालिका छाया बोरसे आदी उपस्थित होते. पोद्दार स्कूलला दुहेरी मुकुट मनपा जिल्हास्तरीय १४ वर्षातील…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जागतिक रूग्ण सुरक्षा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णालयातील संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपायांवर परिसंवादांतर्गत मंथन करण्यात आले. त्यात निवासी डॉक्टर यांनी ‘संसर्गापासून रूग्णांची पर्यायाने रूग्णालयाची सुरक्षा’ विषयावर पॉवरपॉइंट सादरीकरण केले. परिसंवादाला १५० विद्यार्थी उपस्थित होते. जागतिक रूग्ण सुरक्षा सप्ताहानिमित्त मेडिसीन, सर्जरी पेडियाट्रीक, मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांच्या परिसंवादाचे आयोजन केले होते. परिसंवादाचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, मेडीसीन विभागप्रमुख डॉ. चंद्रय्या कांते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, प्रा.डॉ. दिलीप ढेकळे, डॉ. सी.डी. सारंग, डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. कैलास वाघ, डॉ. नेहा वझे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सर्व मान्यवरांचे…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील बीएससी नर्सिंगचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात नारायणी कदम हिने ७६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. वैष्णवी भुटे हिने ७४ टक्के मिळवून द्वितीय क्रमांक, प्रणाली घोडे हिने ७४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक, अजिंक्य वाघमारे याने ७३.२० टक्के गुण मिळवून चतुर्थ, आकांक्षा झिरे हिने ७२ टक्के गुण मिळवून पाचवी तर सहावी आकांशा डेबजे हिने ७१.८० प्राप्त करत यश प्राप्त केले आहे. महाविद्यालयाचा ९० टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, हृदयविकारतज्ज्ञ…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी सावखेडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभागमध्ये गणेशोत्सवानिमित्त १९ ते २७ सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यातीलच प्रथम दिवशी २० सप्टेंबर रोजी विद्यालयात गणपतीवरील गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ५वी ते ७ वीमधून १५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. स्पर्धेत स्पर्धकांनी एकापेक्षा एक अशी सरस आणि सुश्राव्य गाणी गायली. त्यात ‘देवा श्रीगणेशा’, ‘प्रथम तुला वंदितो’, ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’, ‘वक्रतुंडाय एकदंताय गौरीतनया धीमही’ अशा गीतांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेत सादर केलेल्या सर्व गीतांना विद्यालयातील शिक्षकांनी साथसंगत दिली. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांमध्ये ५ वीतील भार्गवी पाटील…

Read More