साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका प्रशासनातर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवानिमित्त गणेश विसर्जन मार्गावरील रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. ते अंतिम टप्प्यात आलेले आहे. मनपा प्रशासनातर्फे श्री गणेश विसर्जन मार्गावरील हाती घेण्यात आलेले रस्ता दुरुस्तीची कामे व खड्डे बुजविण्याची कामे सुरु असलेल्या ठिकाणावरील रस्त्यांना प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी शहर अभियंत्यांसमवेत भेट देऊन रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. श्री गणेश विसर्जनानंतर जळगाव शहरातील प्रमुख मार्गावरील रस्ते दुरुस्तीचे कामे प्रशासनातर्फे घेण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तसेच ज्या रस्त्याचे कार्यादेश सार्वजनिक विभागाकडे आहेत. ते रस्ते त्यांनी तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांसह मनपामार्फत त्यांना देण्यात आल्या आहेत.
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी मानवी सभ्यतेचे भविष्य म्हणजे महात्मा गांधीजींचे नेतृत्व म्हणता येईल. त्यांच्या नेतृत्त्वात सर्वसामान्यांना प्रभावित करण्याची ताकद होती आणि आजही आहे. चांगल्या नेतृत्वाचा लोक नेहमी सन्मान करतात. त्यासाठी आपले नेतृत्व कसे आहे, त्याचा विचार केला पाहिजे. ज्यावेळी संपूर्ण जगात हिंसा सुरू होती. त्यावेळी महात्मा गांधीजींनी अहिंसेचा मार्ग सांगितला. हिंसा म्हणजे अंधकाराचा मार्ग असून अहिंसक मार्गाने निर्माण झालेले ‘नेतृत्व’ हे शाश्वत असते, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी केले. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ४ ऑक्टोबरपर्यंत नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे आयोजन केले आहे. कॅम्पच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मोबाईल सायन्स व्हॅनमधील प्रयोगांचा जळगाव येथील बालविश्व इंग्लिश मीडियम व बालविश्व प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. विद्यापीठातील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या माध्यमातून समन्वयक डॉ. एस. एस. घोष यांनी ही व्हॅन बालविश्व शाळेला उपलब्ध करून दिली. ७० विद्यार्थ्यांनी व्हॅनमधील प्रयोग पाहिले. डॉ. घोष यांच्या समवेत अनिरूध्द मांगदीकर, लेखमाला इंगळे, लौकिक पाटील, गौरव पाटील या विद्यार्थ्यांनी प्रयोगांची माहिती दिली. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ज्या शाळांना विद्यार्थ्यांना फिरती विज्ञान प्रयोगशाळा दाखवायची असेल त्यांनी विद्यापीठातील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे समन्वयक डॉ. घोष (८९९९५४५२९२) अथवा मोहिनीराज नेतकर (९४२२३३८१३२) यांच्याशी संपर्क…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात शासकीय होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या सहकार्याने शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मोफत होमिओपॅथीक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या पुढाकाराने आरोग्य केंद्राच्यावतीने विविध सुविधा विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी होमिओपॅथीक औषधोपचार शिबिर घेतले जाणार आहेत. जळगावच्या शासकीय होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या सहकार्याने मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. शिबिराचे उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या उपस्थितीत…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेतंर्गत कार्यरत असलेल्या महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त ‘मी सावित्री बोलतेय’ हा प्रा. मिनाक्षी वाघमारे यांचा एकपात्री प्रयोग शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेत आयोजित केला होता. याप्रसंगी जळगाव येथील एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयाच्या प्रा.मिनाक्षी वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली. त्यांनी प्रयोग सादर करतांना सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. सावित्रीबाई यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यास अनुसरून भूमिका सादर केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका प्रा.मधुलिका सोनवणे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पवित्रा पाटील, डॉ. आर.आर. चव्हाण, डॉ. अतुल बारेकर, प्रा. नेरकर…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…’ अशा गजरात डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीच्या ‘विघ्नहर्त्याला’ भावपूर्ण निरोप देऊन शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. यावेळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील, प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी परिसरात मिरवणूक काढली. ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…’, ‘एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार…’, अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सर्वप्रथम माजी खा.डॉ. उल्हास पाटील आणि प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. मिरवणुकीत सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापक सहभागी झाले होते.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपाने झालेली ही पाचवी औद्योगिक क्रांती निशब्द करणारी असल्याचे प्रतिपादन वक्ते तथा सिद्धेश इन्फोटेकचे संचालक संतोष बिरारी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या गणपती नगरातील रोटरी सभागृहात आयोजित ‘चॅट जीपीटीचा व्यवसायावर होणारा परिणाम’ विषयावरील जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर आयपीपी विपुल पारेख, मानद सचिव दिनेश थोरात उपस्थित होते. व्याख्यानात बोलताना प्रारंभी बिरारी यांनी १७६५, १८७०, १९६९, २००० आणि २०२० मध्ये झालेल्या पाच क्रांतीची माहिती देत यंत्र व तंत्र युगाचे महत्त्व समजावून सांगितले. २०२२ मध्ये एआयची निर्मिती झाल्यानंतर हजारो ॲप्लीकेशन अस्तित्वात आले आहे. त्यापैकी चॅट जीपीटी हे एक आहे. परिपूर्ण व…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी रोटरी युथ एक्सचेंज उपक्रमांतर्गत जळगावत आलेल्या फ्रान्स येथील पियर मारी व मेक्सिको येथील व्हिक्टर बाल्को हे दोन विद्यार्थी सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा आनंद घेत आहे. यावेळी रोटरी वेस्टच्या मानद सचिव मुनिरा तरवारी त्यांच्यासोबत होत्या. गणेश चतुर्थीला नवीपेठ गणेश मंडळाची त्यांनी स्थापना मिरवणूक बघून त्यात सहभागी होत आनंद लुटला तर आशिष उपासनी, रवींद्र धुमाळ यांच्या निवासस्थानी गौरी अर्थात महालक्ष्मी पूजन व दर्शनासोबत त्यांनी आरती आणि भोजनाचा आस्वादही घेतला. आशिष अजमेरा यांच्या शाळेत इतर विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी भंडाऱ्याचा अनुभव घेतला. दीपा कक्कड व राधिका शर्मा यांच्या संस्थेच्या गणेश विसर्जनप्रसंगी उपस्थित राहून व्हिक्टर व पियर या दोघांनी या पद्धतीविषयी माहिती…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी के.सी.ई. सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर, जळगाव येथे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे तसेच उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यात पालकांसाठी अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी अथर्वशीर्ष पठण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, एका मिनिटात मनोरंजनात्मक स्पर्धा तसेच काही क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले होते. विद्यार्थ्यांसाठी गणपती बाप्पांचा मुखवटा तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांची स्पर्धा घेण्यात आली. सर्व स्पर्धा तसेच उपक्रमांचे आयोजन मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनासाठी करण्यात आले. यशस्वीतेसाठी उपशिक्षक योगेश भालेराव, उपशिक्षिका कल्पना तायडे, स्वाती पाटील, कायनात सय्यद, गायत्री पवार, कल्पना पाटील, मंगल गोठवाल आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात बालमोहन, प्रताप चोपडा, शानबाग जळगाव, बुरहाणी पाचोरा विजेते ठरले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू मंजुषा भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष फारुख शेख, सचिव शिवछत्रपती प्राप्त पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, संघटनेचे इफ्तेखार शेख, भाऊसाहेब पाटील, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे, मार्गदर्शक राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रीय पंच मंजुषा भिडे, राज्य पंच इफ्तेखार शेख, दर्शन आटोळे, धनंजय आटोळे, भावेश शिंदे, हर्षल भोसले, कु. कृपा बाविस्कर, यश…