साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पष्टाणे येथील माहेरी आलेल्या विवाहितेला ५ लाखांची मागणी करत मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथील माहेर असलेल्या दामिनी मुकेश चव्हाण (वय २४) यांचा गुजरात राज्यातील उधना येथील मुकेश सुभाष चव्हाण यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह झाला आहे. लग्नाच्या सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती मुकेश याने विवाहितेला पाच लाखांची मागणी केली. विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्याच्या रागातून तिला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच सासरे, सासू आणि नणंद यांनीही पैशांसाठी शिवीगाळ…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी घरगुती वादातून घरातून निघून गेलेल्या विवाहितेचा मृतदेह पळासरे येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री उघडकीला आली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कविता गोकुळ जगताप (वय २१, रा. वरखेड बुद्रुक, ता.चाळीसगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथे कविता जगताप ही महिला आपल्या पती गोकुळ जगताप यांच्या सोबत वास्तव्याला होती. त्यांच्या घरात कौटुंबिक वाद झाला होता. शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी रात्री त्या शौचास जावून येते, असे सांगून घरातून निघून गेल्या. दरम्यान त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यावर रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव बाजार समिती ही तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असणारी बाजार समिती आहे. येथे गुरांच्या बाजाराबरोबरच कांदा लिलावाचे कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू असते. भुसार मालासाठीही चाळीसगाव बाजार समिती उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेतकरी हिताला प्राधान्य देऊन तसेच शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलावाचे कामकाज हे सुरूच राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कपिल शिवाजीराव पाटील यांनी दिली. शासनाने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्याने इतर जिल्ह्यांमधील बाजार समितीमधील कांदा लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेले आहेत. कोणत्याही प्रकारचे कामकाज त्या ठिकाणी होत नाहीत. परंतु चाळीसगाव बाजार समिती शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन तसेच व्यापाऱ्यांनी बाजार समितीमधील…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चाळीसगाव कन्नड घाटात सततचा पाऊस सुरु असल्याने रविवारी, २४ सप्टेंबर रोजी दुपारी घाटात दरड कोसळली. मात्र, त्यात काही जीवितहानी झाली नाही. काही तासात नॅशनल हायवे पोलिसांनी घाटातील कोसळलेले दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ही घटना म्हसोबा मंदिराजवळ घडली. घाटात सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही. प्रवास सावध राहून करा, पावसाचे दिवस आहे. सध्या अवजड वाहनास हायकोर्टाने बंदी घातल्याने लहान चारचाकी वाहन घाटातून जाण्यास परवानगी आहे. टू व्हीलर गाडी चालकांनी सतर्क राहून प्रवास करावा, असे हायवे पोलिसांनी आवाहन केले आहे.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील काही तरूण मुस्लिम युवकांनी एकत्र येऊन गरीब आणि गरजू लोकांना ‘दारुल कजा’ नावाने ‘अनाज बँक’ योजना सुरू केली आहे. अनाज बँकेमार्फत गरीब आणि गरजू परिवाराला ८ किलो गहू, ५ किलो तांदूळ, २ किलो गोडेतेल, २ किलो साखर, डाळी, कपडे धुण्याचे साबण, आंघोळीचे साबण हे सगळे झोपडपट्टी परिसरात जाऊन आपले कार्य करीत आहेत. जी मुले शाळेत जात नाहीत त्यांच्यासाठी शिक्षण घ्यावे. यासाठीही संस्था-कार्यरत आहे. संस्थेमार्फत हिंदु-मुस्लिम असा कुठलाही भेदभाव केला जात नाही. चाळीसगाव शहरातील तरूण विद्यार्थी तसेच काही व्यापारी, काझी परिवार तसेच समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ति संघटनेची टिम कार्य करीत आहे. शहरात गेल्या ७ वर्षापासून ‘दारुल…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील टिळक चौक येथील टिळकांच्या हस्ते स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वर्ष -१०३) हे शतक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. आज स्वच्छतेला आपण प्राथमिक स्थान देतो. तसेच प्रत्येक घरात सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले कचरागाडी आली का किंवा ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे रोज ऐकल्यावर आपल्या घरातील, दुकानातील किंबहुना परिसरातील कचरा टाकत असतो. त्यामुळे आपले परिसर स्वच्छ राहण्यासाठी खूप मदत होते. परंतु हे कार्य करत असताना एक घटक नेहमी कोणाच्या लक्षात नसतो तो म्हणजे “सफाई कर्मचारी” होय. त्याच सफाई कर्मचाऱ्यांना चाळीसगावातल्या सगळ्यात जुन्या मानाच्या गणपती मंडळात आरतीसाठी आमंत्रित करुन आरतीचा मान देण्यात आला.…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर संपूर्ण जिल्ह्याभरात शनिवारी, २३ रोजी रात्री मुसळधार पाऊस झाला. परिणामी घरांमध्ये व शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. ज्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे, अशा कुटुंबियांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिले आहे. मुसळधार पाऊस झाल्याने त्यांनी रविवारी, २४ रोजी सकाळी तालुक्यातील गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. त्यात फुलपाट, आव्हानी, टहाकळी, धार, शेरी, अंजनविहिरे, खामखेडे, पथराड बुद्रुक, खुर्द, दोनगाव बुद्रुक, दोनगाव खुर्द, मुसळी या गावांना भेटी दिल्या. पाळधी गावात पाणी साचलेले होते. नाल्यात अडकलेले कचरा, झाडेझुडपे काढण्यासाठी त्वरित जेसीबी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राज्य सरकारला गड किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करता येत नाही. पण ३ जिल्ह्याच्या १४ गड किल्ल्यांवर शासनाने शौचालय बांधायचा जी.आर. काढला आहे. त्यामुळे शिवभक्तामध्ये या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. राज्य सरकारने शिवभक्तांच्या भावना भडकविण्याचे काम केले आहे. १४ भुईकोट गट किल्ल्यांवर शौचालय बांधण्याचा शासनाने काढलेला जी.आर. तात्काळ मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे. चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर जी.आर.ची शिवभक्तांच्यावतीने शनिवारी, २३ रोजी होळी करण्यात आली. शासनाच्या सांस्कृतिक विभागाने काढलेला जी.आर. तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यातील शिवभक्त आक्रमक आंदोलन करतील, याची झळ शासनाला बसल्याशिवाय राहणार नाही. शासनाच्या सांस्कृतिक विभागाने काढलेला जी.आर. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यातील…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील खोटे नगरजवळील हॉटेल गिरणा समोरील राष्ट्रीय महामार्गावर पुढे जाणाऱ्या वाहनाचा वेग कमी झाला म्हणून ब्रेक दाबला आणि मागील वाहन येऊन मधल्या वाहनावर धडकल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. याप्रकरणी शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी मागून धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, पारोळा येथील कापड व्यावसायिक निखील जगदीश पाटील (वय २७) हे शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या वाहनाने (क्र. एमएच १९, ईए ३२८७) जळगाव येथून पारोळ्याकडे जात होते. महामार्गावर खोटे नगर थांब्याच्या पुढे एका हॉटेलसमोर पुढे जाणाऱ्या वाहनाचा वेग कमी झाल्याने पाटील…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येवला येथे विभागीय कुस्ती स्पर्धा शनिवारी, २३ सप्टेंबरला पार पडली. स्पर्धेत प्रगती विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी व शाहुनगरमधील हनुमान आखाडा व्यायामशाळेचा पहेलवान हर्षित मनिष झेंडे हा ७१ किलो वजनी गटात व ‘ग्रीको रोमन’ कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांकाने विजयी झाला. स्पर्धेच्या गटात प्रत्येकी दोन राऊंड झाले. दोन्ही राऊंडमध्ये हर्षित झेंडेने जिंकून अंतिम फेरीत विजय मिळविला. आता त्याची २४ ते २७ दरम्यान कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२३-२४ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो त्या स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे रवाना झाला आहे. हर्षित हा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या एक्सपोर्ट मार्केटिंग विभागाचे सहकारी मनिष झेंडे यांचा चिरंजीव…