साईमत, भडगाव : प्रतिनिधी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत गोपीचंद पुना पाटील, विद्यालय, कोळगाव, ता.भडगाव येथील दहावीचा विद्यार्थी व किसान स्पोर्ट्स अकॅडमीचा पहेलवान स्वराज प्रल्हाद चौधरी याने क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूरतर्फे कुरुंदवाड, जि.कोल्हापूर येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय ग्रीकरोमन कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाआतील ५५ किलो वजनी गटात तृतीय स्थान मिळवत कांस्यपदक मिळविले आहे. स्वराजला सह्याद्री तालीम संकुल, पुणे येथील, वस्ताद विजय काका बऱ्हाटे, संजय कराळे, सयाजी मदने, कल्पेश कऱ्हाळे, प्रल्हाद चौधरी, प्रमोद थोरात, संदीप पठारे, निलेश पाटील, दिलीप पडवळ, संजय दाभाडे, म्हस्के आप्पा, पाटील सर, आकाश सोनवणे, साहिल…
Author: Sharad Bhalerao
साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव उर्वरित जिल्हास्तरीय जिल्हा असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय आट्यापाट्या १४, १७, १९ वर्ष आतील मुलींच्या स्पर्धा येथील छत्रपती क्रीडा संकुलात नुकत्याच उत्साहात पार पडल्या. याप्रसंगी १४ वर्षे आतील मुलींच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात धानोरा येथील झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालय व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनिअर कॉलेजच्या संघाने बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली संघाचा ९ गुणांनी पराभव करत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. तसेच १९ वर्षे आतील मुलींच्या संघाने अमळनेर संघाचा ८ गुणांनी पराभव करत विभागीय स्तरावर मजल गाठली आहे. १७ वर्षीय मुलींच्या संघाने तिसरा क्रमांक…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तांबोळा खुर्द येथील तितुर-डोंगरी नदीपात्रात समाज मंदिरासमोरच सुरेश साळुंखे यांच्या शेतालगत रोजच मुरूम व वाळूचे जेसीबीने उत्खनन व ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरूच आहे. येथे नियुक्त तलाठी व मंडळ अधिकारी हे दरमहा न चुकता शासनाकडून ५ ते ६ आकडी पगार मोजून घेतात. त्या मोबदल्यात त्या परतफेडीत तांबोळी खुर्द नदी पात्रात सुरू असलेल्या मुरूम वाळूच्या अवैध विना रॉयल्टी उत्खनन व वाहतूक याकडे मात्र अर्थ पूर्णपणे दुर्लक्ष करतात. मुरूम वाळूने भरलेले ट्रॅक्टर हे हवाई मार्गे तर जात नसणार ना? येथे नियुक्त तलाठी व मंडळाधिकारी यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू सदृश्य आजार जडलाय का? त्यांचे कर्तव्य व कर्तव्य प्रती असलेले उत्तरदायित्व निभावण्यासाठी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के.के.सी.कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव येथील प्रा. डॉ. मुकेश पाटील यांना प्राणीशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा ‘नाशिक विभागातील हिस्टोपॅथॉलॉजिकल आणि बायोकेमिकल बदलांच्या संदर्भात कॅप्रा हिकर्सच्या सेस्टोड परजीवींमध्ये जैव प्रणालीगत परिवर्तनशीलता’ हा विषय होता. त्यांना चाळीसगाव एन.वाय.एन.सी. कॉलेजचे प्रा. डॉ. ए.टी, कळसे यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल त्यांचे संस्थेचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन, अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.
साईमत, जामनेर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे येवला येथे घेण्यात आलेल्या १९ वर्ष आतील मुली विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत ७६ किलो वजन गटात इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची १२वी विज्ञान शाखेतील पहेलवान अनामिका सुरेश वनारसे हिने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे सचिव किशोर महाजन यांच्या हस्ते विद्यालयाच्यावतीने ट्रॅक-सूट (किट), रोख ५०१ रुपये भेट देऊन तिचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील, बी.पी.बेनाडे,…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरासह जामनेर तालुक्याला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण आजपर्यंत ९८ टक्के भरले आहे. मंगळवारी रात्री १०.३० वाजेपर्यंत धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ वाढलेला नव्हता. त्यामुळे संबंधित अधिकारी बुधवारी, २७ सप्टेंबर रोजी सकाळी पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करुन पुढचे निर्णय घेतील, अशी माहिती वाघूर धरणाचे उपअभियंता पी.एम.पाटील यांनी ‘साईमत’ला दिली. जिल्ह्यात मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांसह सगळ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. ऑगस्ट महिन्यात २० ते २५ दिवस खंड पडल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा पुनरागमन केले. यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा वाढला आहे. यंदा आतापर्यंत झालेल्या पावसाने वाघूर…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील नि.पं.पाटील विद्यालयतर्फे गणेशोत्सवनिमित्त विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच उत्साहात झाले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मेहनतीने तयार केलेल्या कल्पक कलाकृतींना नागरिकांकडून दाद मिळत आहे. हे प्रदर्शन ३० सप्टेंबरपर्यंत रिंग रस्त्यावरील गाडगीळ चित्रप्रदर्शनीत सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील विद्यालयातर्फे केले आहे. जळगाव अजिंठा आर्ट सोसायटी, व नि.पं.पाटील विद्यालय, पळासखेडे (मि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घााटन दि शेंदुर्णी संस्थेचे सचिव सतिष काशिद यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड होते. याप्रसंगी संदीप पोतदार, शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.निकम, पर्यवेक्षक व्ही.आर.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ३० सप्टेंबरपर्यंत…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात यंदा तब्बल १०० पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली आहे. अनंत चतुर्दशीला दोनच दिवस राहिल्याने भाविकांची आरास पाहण्यासाठी गर्दी वाढतच आहे. गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी गणपतीचे विसर्जन होणार आहे. शेवटच्या दोन दिवस अगोदर भक्तांची प्रचंड गर्दी वाढली आहे. रथगल्ली बालाजी मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा समाज प्रबोधनावरही देखावा दाखविण्यात येत आहे. यासोबतच खेळणीसह खाद्य पदार्थ विक्रेत्यांचाही व्यवसाय वाढला आहे. शहरातील अनेक गणेश मंडळांनी बोध देणारे देखावे आणि संदेश सादर केले आहे. काही मंडळांनी शिक्षणावर भर दिला आहे. याशिवाय स्वच्छतेचाही संदेश देण्यात आला. शहरात ग्रामीण भागातून नागरिक गणपती पाहण्यासाठी येत असतात. मात्र, त्यांना…
साईमत, पारोळा : प्रतिनिधी नगरपालिकेने शहरवासीयांचे आरोग्य, स्वच्छता, रस्ते व पाणीपुरवठा या विषयांवर सर्वोच्च प्राधान्य द्यावे. यासाठी मुख्याधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. पारोळा नगरपालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, प्रशासक तथा प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे, तहसीलदार डॉ.उल्हास देवरे आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नगरपरिषदेमध्ये प्रभागनिहाय बैठका लावण्यात याव्यात असे नमूद करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अमृत आवास २.० मध्ये झोकून देऊन काम करावे. दिवाळीच्या काळात जास्तीत जास्त वसूली करण्यात यावी. दिव्यांग व मागासवर्गीय खर्च वाढविण्यात…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या ना.गिरीश महाजन गट आणि पारसलाल ललवाणी व सुरेश धारिवाल यांच्या दोन गटाच्या दोन स्वतंत्र वेगवेगळ्या सर्वसाधारण सभा होऊन दोन्ही गटाचे दोन संचालक मंडळ बिनविरोध निवडण्यात आले. गेल्या सात ते आठ वर्षापासून जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीत राजकारण सुरू आहे. त्यामुळे दोन गट पडल्याने दोन्ही गटांचे वाद न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहेत. सुरेशदादा जैन फार्मसी कॉलेज येथे पारस ललवाणी, सुरेश धारीवाल यांच्या गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यात अध्यक्षपदी पारस झुंबरलाल ललवाणी, सचिवपदी सुरेश मनोहरलाल धारीवाल, सहसचिव राजेंद्र लक्ष्मण पाटील, संचालक म्हणून प्रदीप मोहनलाल लोढा, रमेश बन्सीलाल मंडलेचा, पवन मुलचंद राका, ललित जवाहरलाल भुरट,…