विवाहितेला शॉक देवून ठार केल्याचा आरोप, सहा महिन्यांपासून पोलिसांकडून कारवाईचा अभाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पारोळा तालुक्यातील टिटवी येथील विवाहिता कविता राजू सोनवणे हिचा सासरच्या लोकांनी सतत शारीरिक आणि मानसिक छळ करून अखेर शॉक देवून जीवे ठार मारल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीही कारवाई केलेली नसल्याने मृत विवाहितेच्या परिवाराने सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे परिवाराने स्पष्ट केले आहे. मृत कविता सोनवणेच्या आई आणि भावाने सांगितले की, कविताला तिचा पती आणि सासरचे लोक सतत त्रास देत होते. शारीरिक आणि मानसिक छळामुळे ती दीर्घकाळ तणावाखाली…
Author: Sharad Bhalerao
कार्याचा, आठवणींचा अन् व्यक्तिमत्त्वातील पैलूंचा मिळाला उजाळा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील बळीराम पेठेतील स्वामी चिदानंद सभागृहात ज्येष्ठ पत्रकार, करुणा त्रिपदी परिवारात निस्वार्थी सेवा देणारे हेमंत काळुंखे यांना त्रिपदी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम रविवारी, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडला. याप्रसंगी त्यांच्या कार्याचा, आठवणींचा आणि व्यक्तिमत्त्वातील पैलूंचा उजाळा उपस्थितांनी मनोगतातून देऊन आदराजंली वाहिली. राजेंद्र कुळकर्णी यांनी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीबद्दल भावना व्यक्त केल्या. अनिल तारे यांनी त्यांच्या निस्वार्थी सेवेला उजाळा देत, त्रिपदी परिवार कधीही त्यांना विसरू शकणार नसल्याचे सांगितले. बाबासाहेब यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. धर्मसाथी आणि गुरुदत्त भक्ती प्रसाद धाम, नवीपेठ परिवारातर्फे प्रसाद जोशी यांनी पत्रकारिता क्षेत्रातील सहवासातील आठवणी सांगत…
गुणवंत पाल्यांसह सेवानिवृत्त सदस्य अभियंत्यांचाही सत्कार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात यंदाही भारतीय अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीतर्फे सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी तथा विशेष सत्कारार्थी क.ब.चौ.विद्यापीठाचे चवथे कुलगुरु डॉ.के.बी.पाटील तर राज्याचे सेवानिवृत्त प्रधान सचिव महेश झगडे प्रमुख वक्ते होते. याप्रसंगी उत्कृष्ट अभियंत्यांना पुरस्काराने सन्मानित करुन गुणवंत पाल्यांसह सेवानिवृत्त सदस्य अभियंत्यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, जळगाव तापी पा.वि.म.चे कार्यकारी संचालक जयंत बोरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ज.पा.प्र.मंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक…
१३ वर्षाखालील गटात सुवर्णपदकाची ‘कमाई’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : चंद्रपूर येथे स्व. डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा गेल्या १० ते १४ सप्टेंबरदरम्यान पार पडली. राज्यस्तरीय स्पर्धेत चाळीसगाव (जळगाव) येथील ओवी पाटील आणि कराडची श्रद्धा इंगळे यांनी १३ वर्षाखालील मुलींच्या दुहेरी गटात राज्य विजेतेपद पटकावले आहे. सेमीफायनलमध्ये त्यांनी मुंबई उपनगरच्या हेजल जोशी, स्पृहा जोशी यांना २१-१५, २१-१४ अशा सरळ सेट्समध्ये हरवित अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात मुंबईच्या मायरा गोराडिया, कनक जलानी यांचा २१-१४, २१-१५ असा पराभव करून सुवर्णपदक, ट्रॉफी, रोख पारितोषिक व प्राविण्य प्रमाणपत्र मिळवले. ओवीचे वडील तथा प्रशिक्षक अमोल पाटील (चाळीसगाव येथील काकासाहेब पूर्णपात्रे शाळेचे क्रीडा…
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) आणि टेन एआय कन्सल्टिंग प्रा. लि. यांच्या सामंजस्य करारातंर्गंत प्रोग्रामर डे स्पेशल “टेन एआय हॅकेथॉन” एकदिवसीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालय, एम. जे. कॉलेज, केसीई आयएमआर कॉलेज, केसीई इंजिनिअरिंग कॉलेज, रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज, राष्ट्रीय कॉलेज, चाळीसगाव तसेच गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज व गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज, जळगाव येथील १७ संघांचे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक संघाला प्रोजेक्ट कल्पना तयार करण्यासह सादरीकरणासाठी ठराविक वेळ देण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद तायडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे, आर्य चांदोरकर, स्वरदा…
सुवर्णकार सेनेच्या बैठकीत नियोजनासह कार्यकारिणी जाहीर साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्यावतीने येत्या १८ जानेवारी २०२६ रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजीनगर हायवे रस्त्यालगतच्या आदित्य लॉनमध्ये दहावा ऋणानुबंध वधु-वर-पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. यासंदर्भात सुवर्णकार (सोनार) समाजाची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी राजेंद्र बिरारी होते. याप्रसंगी समाजबांधवांनी विविध सूचना मांडल्या. बैठकीत सर्व सूचनांचा विचार करून मेळाव्याचे नियोजन अधिक प्रभावी केले जाईल, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी दिले. बैठकीत मेळाव्याची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीत स्वागताध्यक्षपदी रमेश वाघ, मेळावा प्रमुख सुभाष सोनार, उपप्रमुख नितीन गंगापुरकर, नियोजन समिती प्रमुख शरद रणधीर, सचिवपदी प्रशांत विसपुते, सहसचिव दिलीप पिंगळे तर प्रसिद्धी…
शहरात उपक्रम ठरतोय एक प्रेरणादायी प्रकल्प साईमत/जळगाव/प्रतिनिधी : धार्मिक संस्कार, नीतिमूल्ये आणि भारतीय परंपरेचे बीज लहान मुलांच्या मनात रोवण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून श्री स्वामिनारायण मंदिरात बाल संस्कार केंद्र यशस्वीरित्या चालवले जात आहे. बालकांमध्ये सद्गुणांची जडणघडण करून त्यांना उत्तम नागरिक आणि संस्कारित व्यक्तिमत्त्व म्हणून घडवणे, असा केंद्राचा उद्देश आहे. केंद्रात ८ ते २५ वयोगटातील मुला–मुलींचा उत्स्फूर्त सहभाग आहे. प्रत्येक रविवारी सकाळी घेण्यात येणाऱ्या वर्गांत श्लोक पठण, भजन, स्तोत्र, नैतिक गोष्टी, नाटिका, प्रश्नोत्तरे, योग व प्रार्थना अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांना श्रद्धा, प्रामाणिकपणा, सेवा, अनुशासन आणि देशप्रेम यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी साधू–संत तसेच सेवाभावी कार्यकर्ते मार्गदर्शन करतात. सामाजिक जीवनातही मुलांना…
श्री मंदिर जीर्णोध्दारासह सभागृह बांधकामाचा आढावा सादर साईमत/धरणगाव/प्रतिनिधी : येथील बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाच्यावतीने रथोत्सव व वहनाला बैलजोडी लावण्यासंदर्भात आयोजित लिलावाचा कार्यक्रम बालाजी मंदिर चौकात मोठ्या चुरशित, चढाओढीने व खेळीमेळीच्या उत्साहात आणि पारदर्शक वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी प्रा. डी.आर.पाटील होते. ५ हजार भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेच्या प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तद्नंतर बालाजी वहनाचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. पाटील यांनी “श्री मंदिर जीर्णोध्दार व सभागृह बांधकामाचा आढावा” सादर केला. यावेळी धरणगावचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचा मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी.आर.पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, कार्याध्यक्ष जीवनसिंह बयस, सचिव प्रशांत वाणी, विश्वस्त ज्ञानेश्वर महाजन, भानुदास विसावे, ॲड. संजय महाजन आदींनी सत्कार…
अमळनेरात घडला प्रकार, ‘त्या’ महिलेवर जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : मुलाचे लग्न जमवून देईन, पैसे दुप्पट करून देईन आणि सोन्याचे दागिने काढून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेने १८ लाख रुपयांमध्ये गंडविल्याचा प्रकार शहरातील बंगाली फाईल भागात फेब्रुवारी ते जून महिन्यादरम्यान घडली होती. ‘त्या’ महिलेविरुद्ध जादूटोणा कायद्यानुसार अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी राजेंद्र नारायण माळी (रा. रामवाडी, बंगाली फाईल) यांनी फिर्याद दिली आहे. सविस्तर असे की, फिर्यादी राजेंद्र माळी यांची आई भटाबाई माळी ह्या १२ फेब्रुवारी २०२५ रोजी महादेव मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. त्यावेळी तेथे तिला मंगला पवार ही महिला भेटली. तिने मुलाचे लग्न जमवून…
भावनिक वातावरणात कार्यक्रमाची सांगता; मान्यवरांची लाभली उपस्थिती साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : वारकरी भूषण सहकार महर्षी संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगरचे माजी अध्यक्ष स्व. भाऊसाहेब प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांच्या २१व्या पुण्यतिथीनिमित्त संत मुक्ताई जुने मंदिर, श्री क्षेत्र कोथळी येथे आयोजित पंचदिनी निळोबाराय गाथा पारायण व नामसंकीर्तन सोहळा ७ ते ११ सप्टेंबर २०२५ दरम्यान भक्तिभावात पार पडला. गाथा पारायणाचे व्यासपीठ ह.भ.प. संदीपन महाराज खामणीकर यांनी सजवले होते. ११ सप्टेंबर रोजी पुण्यतिथी दिनी ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने पंचदिनी सोहळ्याची भक्तिरसात सांगता झाली. यावर्षीपासून स्व. भाऊसाहेबांच्या स्मरणार्थ संत मुक्ताबाई संस्थानच्यावतीने सुरु केलेल्या “आदिशक्ती नारी सन्मान पुरस्कार २०२५” पुरस्काराने दुर्गाताई संतोष मराठे यांना सन्मानित…