साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांच्या वाढीसाठी सरदार कंपनीचे रासायनिक खतांचा वापर केला होता. परंतु खतामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या घटनेला तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांनी जळगाव जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. सविस्तर असे की, जामनेर तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीला कपाशी पिकाला सरदार कंपनीचे खत दिल्यामुळे मोयखेड्यासह गावांमधील शेतकऱ्यांचे शेतातील पीक वाया गेले होते. त्या घटनेला तीन महिन्याचा कालावधी उलटला…
Author: Sharad Bhalerao
साईमत, धरणगाव: प्रतिनिधी शहरातील पारधीवाडा येथे ४४ वर्षीय प्रौढाचा रस्त्याने पायी जात असतांना चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना गेल्या २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली होती. याप्रकरणी मंगळवारी, १० ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र हिलाल पारधी (वय ४४, रा. पारधीवाडा, धरणगाव) असे मयताचे नाव आहे. सविस्तर असे की, धरणगाव शहरातील पारधीवाडा येथे जितेंद्र पारधी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कामावरून घरी पायी जात होते. तेव्हा मागून चारचाकी वाहन (क्रमांक एमएच १९…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोळगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत, गोपीचंद पुना पाटील, कनिष्ठ महाविद्यालयातील पूजा भक्तराज महाजन (४० किलो) आणि नंदिनी लक्ष्मण सूर्यवंशी (४८ किलो) यांनी क्रीडा व युवकसेवा संचलनालय, पुणे तथा जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे छ.शि.महाराज, क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित १७ वर्षाच्या आतील मुलींच्या जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत प्रथमस्थान पटकावले आहे. त्यामुळे त्यांची नाशिकला होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच याच क्रीडा प्रकारात १९ वर्षाच्या आतील मुलांमध्ये अजय वाल्मिक करंकाळ (४८ किलो) वजनी गटात उपविजेतेपद प्राप्त करीत यश संपादन केले आहे. यशस्वी खेळाडुंना कार्यवाहक रघुनाथ पाटील, आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती आणि रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश एन.के.वाळके होते. शिबिरात तालुका विधी सेवा समितीचे पी.एल.व्ही. रमेश पोतदार यांनी ‘मानसिक आरोग्य दिना’वर आधारीत कविता सादर केली. बापजी रुग्णालयाचे संचालक डॉ. संदीप देशमुख यांनी ‘मानसिक आरोग्य दिवस’ विषयावर मार्गदर्शन केले. तसेच न्या.एन.के. वाळके यांनी ‘कल्याणकारी योजना आणि दिव्यांग व्यक्ती यांच्यातील संपर्क तोडणे यावरील उपाययोजना’, ‘लाभार्थ्यांना योजनेशी जोडण्यासाठी पावले उचलणे, ‘इतर कोणत्याही समस्यांमध्ये…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ आणि चाळीसगाव राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. संचलित न्यु इंग्लिश स्कुल (ज्युनियर कॉलेज) शिरसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, ११ ऑक्टोबर रोजी विधी सेवा शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश एन.के.वाळके होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. शिबिरात तालुका विधी सेवा समितीचे पी.एल.व्ही. रमेश पोतदार यांनी ‘राष्ट्रीय बालिका दिवसा’ वर आधारीत कविता सादर केली.…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी मानसिक आजारी असणे ही आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात साधारण गोष्ट आहे. मानसिक आजाराबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. व्यक्ती जेवढ्या मोठ्या पदावर पोहोचतो तेव्हा त्याच्या संभाषणावर मर्यादा येतात. व्यक्त झाल्याने मानसिक तणाव कमी होतो. छंद जोपासूनही मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते, असे प्रतिपादन डॉ.केतकी पाटील यांनी केले. डॉक्टर केतकी पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित ‘जगावे आनंदे’ मानसिक आरोग्य (मेंटल स्ट्रेस) कार्यक्रमाचे डीवायएसपी कार्यालय भुसावळ येथे मंगळवारी, १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, डीवायएसपी पवार, डॉ. विलास चव्हाण, डॉ. बबन ठाकरे आदी उपस्थित होते . सण आणि उत्सव काळात पोलीस सतत…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी युवकांनी चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी संघर्षशील व्यक्तिमत्त्वांची जीवनचरित्रे अभ्यासावी. सोबतच आत्मसन्मानाने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. राष्ट्र घडविण्याचे सामर्थ्य केवळ युवकांमध्येच असल्याचे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक मॅनेजमेंट गुरू प्रशांत पुप्पल यांनी केले. चाळीसगाव येथील बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए सायन्स आणि के.के.सी कॉमर्स महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि रामकृष्ण मिशन आश्रम, छत्रपती संभाजीनगर, रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, उपप्राचार्य डॉ.अजय काटे, प्रा. धनंजय वसईकर, डॉ.श्रीमती के.एस.खापर्डे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे स्वामी परामृतानंद यांनी स्वामी विवेकानंद यांच्या…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कुत्रा आणि मांजर म्हटले तर लगेच आपल्याला आठवते ती त्यांची पारंपरिक वैरी. समाजात कुत्रा आणि मांजर यांना एकमेकांचे कट्टर वैरी मानले जाते. मात्र, मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे गावात सध्या याउलट चित्र पहायला मिळत आहे. येथील रहिवासी आकाश रवींद्रनाथ भालेराव यांच्या घरी १७ महिन्यांची ‘लाब्राडोर’ जातीची ‘डॉर्मी’ नावाची कुत्री आहे. ६ दिवसांपूर्वी भालेराव यांच्या घरासमोर डोळे न उघडलेल्या मांजराच्या पिल्लुचा खुप जोरात ओरडण्याचा आवाज आला. ते पिल्लू असे मरण पावले म्हणून त्याला भालेराव यांनी घरात आणले. मात्र, ते पिल्लू लहान असल्याने त्याला दूध प्यायला पण जमत नव्हते. भालेराव यांच्याकडील ‘लाब्राडोर’ जातीच्या ‘डॉर्मी’ या श्वानाने त्या मांजरावर आईप्रमाणे माया…
साईमत, रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील रसलपूर जवळील पाल येथील सुकी नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर तहसीलदार बंडू कापसे यांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई मंगळवारी, १० ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास केली. तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची ओरड असतांना केलेली कारवाई वाळू व्यवसायिकांसाठी मोठी चपराक मानली जात आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील रसलपूर जवळील पालकडून रसलपूर येथे वाळू घेऊन आलेल्या तीन ट्रॅक्टरांवर तहसीलदार बंडू कापसे, परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे यांच्या पथकाने धडक कारवाई केली. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत तहसीलदार पाच वेळा रात्रीच्या वेळी फिल्डवर उतरले. पाचही वेळा त्यांनी अवैध वाळूच्या ट्रॅक्टरांवर कारवाया केल्या आहेत. वाळूने…
साईमत, यावल : प्रतिनिधी शहरात गेल्या काही दिवसांपासून मच्छरांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील विविध भागात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. नागरिकांमध्ये आरोग्य विषयक चिंता निर्माण झाली आहे. शहरात डेंग्यू सदृश्य आजाराची साथ पसरण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. म्हणून नगरपालिका प्रशासनासह तालुका आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे उपाययोजना करण्यासाठी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रशासनाला पत्र देऊन मागणी केली आहे. सविस्तर असे की, संपूर्ण यावल शहरात काही दिवसांपासून मच्छरांचा उपद्रव वाढल्याने शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यू व मलेरिया आजारांचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहराच्या विविध भागांत मोकळ्या जागेवर पाण्याचे व गटारीचे…