साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगावच्या माध्यमातून काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चाळीसगाव येथील अंतरंग मानसिक समुपदेशन केंद्राच्या संचालिका आणि इनरव्हीलच्या पास्ट डिस्ट्रिक्ट चेअरमन जुलेखा शुक्ल यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रभावी शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्यांना यशाचा मंत्र दिला. दहावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. काहीतरी करून दाखविण्याची उर्मी, अंगात सळसळता उत्साह, मनात संभ्रम आणि मानसिक तणाव अशा संमिश्र भावनांच्या हिंदोळ्यातून विद्यार्थी जात असतात. परीक्षेत चांगले गुण मिळविण्याचे दडपण, ते न मिळाल्यास येणारे नैराश्य, त्यातून होणाऱ्या आत्महत्या असे प्रकार आपण दरवर्षी बघतो. अशावेळी अपयशाने खचून जाऊ नका,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या २०२३ च्या कॅलेंडर अंतर्गत तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये रविवारी, १५ ऑक्टोबर रोजी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, चाळीसगाव येथे तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव न्यायालयातील कौटुंबिक प्रलंबित प्रकरणांकरीता विशेष लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. विशेष लोकन्यायालयात चाळीसगाव न्यायालयात ठेवलेल्या १३८ पैकी ७ कौटुंबिक प्रकरणे निकाली काढण्यात आले. विशेषतः कौटुंबिक प्रकरणातील तीन वैवाहिक जोडप्यांनी नव्याने नांदावयास सुरुवात केली. विशेष लोकन्यायालयाचे कामकाज तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्या.एन. के. वाळके, वकील संघाचे सहसचिव ॲड. बी.आर.पाटील, पॅनल मेंबर्स ॲड. संग्रामसिंग शिंदे, वकील…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तुषार खैरनार होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विनोद देसले, अश्विनी कच्छवा यांनी प्रतिमा पूजन करून दीपप्रज्ज्वलन केले. ज्ञानेश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपट मांडला. वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व रवींद्र तडवी यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद पाटील तर आभार संदीप पाटील यांनी मानले.
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यात यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे गिरणा धरणाच्या पाटाच्या पाण्याची शेतकऱ्यांना शेती पिकासाठी अत्यंत गरज आहे. त्या अनुषंगाने धरणगाव तहसील कार्यालय आणि पाटबंधारे कार्यालय येथे पाटाच्या पाण्याचे २/३ आवर्तन सोडण्याविषयी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी शिवसेनेचे नेते गुलाबराव वाघ यांच्या बालकवी रस्त्यावरील कार्यालयात शिवसेना उबाठाच्या अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते तसेच धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सकाळी १० वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख भागवत चौधरी यांनी केले आहे.
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथून जवळील पाचोरा तालुक्यातील सर्वे येथील माहेरवाशिण शुभांगी पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड केली आहे. शिवसेना राज्य कार्यकारिणीचा १५ ऑक्टोबर रोजी विस्तार करण्यात आला. विस्तारात नाशिक विभागातून शिवसेनेच्या धडाडीच्या महिला नेत्या तथा उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शुभांगी पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यांना उपनेतेपदी पदोन्नती दिली आहे. शिवसेनेत उपनेते पद हे मोठे व जबाबदारीचे पद आहे. शुभांगी पाटील यांच्या मागील कार्याचा लेखाजोखा पाहता त्यांनी गेल्यावर्षीच नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून ज्या प्रकारे निवडणूक लढवली आणि त्या दुसऱ्यास्थानी राहिल्या. तसेच त्यानंतरही त्यांचा पक्षातील कामाचा धडाका, जिद्द, चिकाटी व परिश्रम पाहता त्यांना पदावर नियुक्त केले…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी भडगाव रस्त्यालगत ‘माधव सर्व्हिस सेंटर’ नावाने खुशाल पाटील यांचे चारचाकी आणि दुचाकी गाड्या सर्व्हिसिंगचे दुकान अनेक दिवसांपासून सुरु आहे. दुकानाच्या समोर अतिक्रमण करून सोड्याची गाडी अनधिकृतपणे सुरू केली आहे. म्हणून सोमवारी, १६ ऑक्टोबरपासून खुशाल पाटील यांनी चाळीसगाव नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सोड्याच्या गाडीवर गिऱ्हाईकांची मोठी गर्दी होऊन मोटारसायकली दुकान समोर लावल्याने दुकानाकडे जाण्यास रस्ता राहत नाही. तसेच सोडा पिण्यास महिलाही तेथे येतात. वाहने धुत असतांना अनावधानाने महिलांच्या अंगावर पाणी उडते. त्याचे कारण करून सोड्याची गाडी चालक सचिन जाधव याने खुशाल पाटील यांच्याशी अनेकवेळा वाद घातले आहेत. वास्तविक ठेलागाडी रहदारीच्या मुख्य रस्त्यावर आहे. वाहतुकीला ठेला…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राचे ६ हजार रुपये प्रतिवर्ष देण्यात येतात. इथुन पुढे राज्य सरकारही वर्षाला ६ हजार रुपये हप्ता वितरित करणार आहे. हप्ता नियमित प्राप्त होण्यासाठी ईकेवायसी करणे व बँक खाते क्रमांक आधार सोबत लिंक करणे अनिवार्य असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी सांगितले. तालुक्यातील २ हजार ६७८ शेतकऱ्यांचे इकेवायसी करणे व २ हजार ५२२ लोकांचे आधार लिंक करणे सद्यस्थितीत प्रलंबित आहे. मागील हप्त्यावेळी ज्यांचे इकेवायसी झालेले नव्हते. अश्या लाभार्थ्यांना सुट म्हणून हप्ता वितरित केलेला होता. इथुन पुढील हप्ता हा इकेवायसी पूर्ण असेल तरच वितरित करण्यात येईल. इकेवायसी पूर्ण नसल्यास लाभार्थी हप्त्यापासून…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि बी.पी.आर्ट्स एस.एम.ए.सायन्स, अँड के.के.सी कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हास्तरीय आविष्कार २०२३-२४ स्पर्धेचे आयोजन बुधवारी, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए.सायन्स अँड के.के.सी कॉमर्स कॉलेजच्या परिसरात केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व कळावे, त्यांना संशोधनाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी तसेच संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापकांना आपल्या संशोधनाचे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धेत कला, साहित्य, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी, विज्ञान, कृषी, पशुवैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अशा विविध विषयांमधील संशोधनपर पोस्टर व…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मारवाड परिसर विकास मंच, ‘मिलके चलो’ आणि डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने भारतभर दुर्गम भागातील शाळेत ‘डॉ.कलाम फिरती प्रयोगशाळा’ प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी इस्त्रोचे चेअरमन डॉ.एस.सोमनाथ हे स्वतः माहिती घेऊन राष्ट्रीय पातळीवर प्रकल्पाचे तामिळनाडूतील रामेश्वरम येथे उद्घाटन करण्यात आले. ही एक फिरती प्रयोगशाळा असून विज्ञानासोबत ‘रोबोटिक्स आणि व्यक्तिमत्व विकासावर प्रयोगशाळा’ अतिशय महत्त्वाचे कार्य पार पाडत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कामगिरी पार पाडणार आहे. मारवड परिसर विकास मंचचे पदाधिकारी, आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे आणि ‘मिलके चलो’ अमळनेरचे संस्थापक-अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, त्यांची टीम आणि डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशनच्या अथक परिश्रमातून कलाम यांचे स्वप्न…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहुर बसस्थानक परिसरातील कृषी पंडीत मोहनलाल लोढा कॉम्पलेक्समधील पितांबर कलाल यांच्या ‘जय सप्तशृंगी माँ टी सेंटर’ नावाच्या चहाच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, त्यात दुकानातील सर्व फर्निचर, फ्रीज, चहाचे साहित्य, इतर किरकोळ किराण्याचा माल व रोख रक्कम पूर्णतः जळून खाक झाले आहे. त्यामुळे अंदाजे १० ते १२ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचे दुकान मालक अनिल कलाल यांनी सांगितले. रात्री अग्निशमन दलाच्या गाडीच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, माजी सरपंच प्रदीप लोढा, माजी उपसरपंच…