Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील महिला महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला. यावेळी सर्व विद्यार्थिनींनी कार्यक्रम संपल्यावर महाविद्यालयातील ग्रंथालयाला भेट देऊन विविध प्रकारची पुस्तके चाळली. कार्यक्रमात बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवन, पुस्तक आणि आत्मचरित्राविषयी परिचय करून दिला. त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून का संबोधले जाते तर त्यांनी ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ ही स्वदेशी क्षेपणास्त्र तयार केली. एक शिक्षक भारताचे राष्ट्रपती आणि मुख्य म्हणजे ते एक व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध होते, अशी माहिती प्रा. इंद्रायणी सैंदाणे यांनी दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख यांनी विद्यार्थिनींना वाचन करण्यास…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा केला. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील होते. यावेळी वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन केले. यशस्वीतेसाठी सलीम तडवी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुभेदार मेजर श्रीराम पाटील तर नायक सुभेदार भटु पाटील यांनी आभार मानले.

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यात यंदा पावसाअभावी परिसरातील खरीप आणि रब्बीची नापेर स्थिती झाली आहे. त्यामुळे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. अशातच परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील पाटाला ३ पाणीसह पहिले पाणी नोव्हेंबर महिन्यात सोडण्यात यावे, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांसह शिवसेना उबाठाचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार श्री.सूर्यवंशी, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधिकारी विजय जाधव यांना मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी देण्यात आलेे. परिसरात कापूस, ज्वारी, मका लागवडीसाठी साधारण २० ते २२ हजार खर्च झालेला आहे. त्यामुळे अखेरीस पाऊस झाला तरच शेतकऱ्यांच्या…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सर्व कृषी मंडळातील (बहाळ, चाळीसगाव, हाताले, खडकी, मेहुणबारे, शिरसगाव, तळेगाव) प्रत्येक विमाधारक शेतकरी विमा मिळविण्यासाठी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांना पिकविम्यामधील २५ टक्के आगाऊ रक्कम तातडीने अदा करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विमा कंपन्यांना दिले आहे. त्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. चाळीसगाव तालुका यावर्षी अभूतपूर्व अशा दुष्काळाला सामोरे जात आहे. असे असताना केवळ विमा परतावासाठी केवळ तीन कृषी मंडळ पात्र धरण्यात आली होती. यावेळी चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला पाहिजे, याविषयी पाठपुरावा सुरू केला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तब्बल ३१ दिवस पावसाचा खंड हा निकष…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी संध्या गोपाल कोळी हिने विभागीय पातळीवर लांबउडी स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्यामुळे तिची राज्यस्तरीय पातळीवर निवड झाली आहे. तिला आर.जी. बैरागी, पी.एम.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतीशचंद्र काशीद, महिला संचालिका उज्ज्वला काशीद, सहसचिव दीपक गरुड, वसतिगृहाचे सचिव कैलास देशमुख, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक भीमराव शेळके, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे आदींनी कौतुक केले आहे.

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी नुकतेच त्यांच्या परिवारासह व त्यांचे मित्र मंडळी, समाज बांधव असे सर्व १७ जणांचा गु्रप चारधाम तिर्थयात्रेसाठी भुसावळ येथून गेले होते. अतिशय खडतर रस्ता व कठीण प्रवास पहाडी परिसर, त्यात अधुनमधून खराब हवामान यांचा सामना करुन हरीद्वार, ऋषीकेश, गंगोत्री, यमोनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ अशी सर्व तिर्थक्षेत्राची यात्रा त्यांनी सुखरुप पार करुन शनिवारी भुसावळला पोहोचले. त्यांच्या सोबत डॉ.संगिता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी आणि त्यांचा मित्र परिवार होता. यावेळी बियाणी यांचे भुसावळच्या रेल्वे स्थानकावर ढोल-ताश्यांच्या गजरात समाज बांधव व नातेवाईकांनी जंगी स्वागत केले. रेल्वे स्थानकावर कांताबाई बियाणी, विनोद बियाणी, स्मिता…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच सोयाबीनच्या पिकाला आधारभूत भाव देण्यात यावा, अशी मागणी मलकापुरचे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने केली आहे. बुलडाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करून पीक विम्याची हक्काची रक्कम व नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्यात यावी, अन्यथा काँग्रेसच्यावतीने आक्रमकपणे जिल्हाभर जेलभरो, रास्ता रोको तसेच सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा आक्रमक इशारा सरकारला दिला. अशा प्रकारचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमोद अवसरमोल, राजूभाऊ पाटील, बंडूभाऊ चौधरी, डॉ. अनिल खर्चे, ॲड.संजय वानखेडे, जाकीर मेमन, कैलास काळे, ज्ञानदेव हिवाळे, हमीद खान, युसूफ खान, वाजिद खान, शेख मेहबूब,…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्‌स असोसिएशन बुलढाणा अंतर्गत अमरावती विभागीय शालेय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा तालुका क्रीडा संकुल मलकापूर, जि.बुलढाणा येथे नुकत्याच उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन रामभाऊ झांबरे, लक्ष्मीशंकर यादव, तालुका क्रीडा अधिकारी विजय पळसकर, बुलढाणा सॉफ्ट टेनिस स्पोर्टस असोसिएशनचे सचिव राजेश्वर खंगार, चंद्रकांत साळुंके, दिनेश राठोड, राजदीप मनावर, ज्ञानेश ताले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेत अमरावती विभागातील तब्बल ११५ खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यात ७८ मुलांनी तर ३७ मुलींनी विजेते पदासाठी झुंज दिली. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वासीम, अमरावती मनपा, अकोला मनपा…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी ‘वाचनाने घडतो माणूस’ विषयांतर्गत वाचनातून निर्माण झालेली संस्कृती कुठेतरी लयास जात आहे. वाचन म्हणजे व्यवहारातून ज्ञानाचे उपयोजन करता आले पाहिजे. काव्याचा रसास्वाद घेता आला पाहिजे. कलात्मक मनोरंजक भाषेतून वाचनाकडे पाहिले पाहिजे. संस्कारांची नीती मूल्यांची वाढ वाचनातून झाली पाहिजे. वाचन गरज बनली पाहिजे. वाचन हे पदवीपुरते नसावे तर वाचनातून आनंद प्राप्ती झाली पाहिजे. एकविसाव्या शतकात माहितीचा भस्मासुर आहे. वाचन हे रसिकता आणि सृजनशीलता निर्माण करणारे असावे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर यांनी केले. वाचनाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि रुसोची उदाहरणे दिली. येथील कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करून करोडो सनातन हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टालिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांका खर्गे, ए.राजा यांच्यासह महाराष्ट्रातील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि साम्यवादी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारी तक्रार यावल येथे पोलीस स्थानकात धर्मप्रेमी नागरिकांनी केली. मागील सप्ताहात ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान अंतर्गत यावल येथे झालेल्या कार्यक्रमात याविषयी जागृती केली होती. सनातन धर्माच्या विरोधात सर्वांनी केलेली वक्तव्ये ही केवळ हिंदूंची धार्मिक भावना दुखावणारी आहेत, असे नसून २८ एप्रिल २०२३ ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘हेट स्पीच’ संदर्भात जी नियमावली घालून दिली आहे. त्यात…

Read More