Author: Sharad Bhalerao

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील साकरे गावातील एकाच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ४९ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आले. याप्रकरणी मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, शकील गुलाब खाटीक (वय४८, रा. साकरे, ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १५ ऑक्टोबर रोजी ९ वाजता त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत लोखंडी पेटीतून १२ हजारांचा रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण ४८…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आदी महाकाव्यांमध्ये वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी झाली, ही भारतीय संशोधन जगताविषयी अभिमानाची बाब आहे. भारताचे संशोधन, वेगवेगळे आविष्कार जगमान्य झालेले आहेत. भारताचे संशोधन क्षेत्रातील महत्त्व विशेष अधोरेखित करण्यासारखे आहे. त्यामुळे भारतीय संशोधनाची परंपरा अतिप्राचीन आणि संपन्न आहे, असे प्रतिपादन राजेंद्र नन्नवरे (राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य, क. ब. चौ. उ. म. वि. जळगाव) यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि बी.पी.आर्ट्‌स, एस.एम.ए.सायन्स अँड के.के.सी.कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हास्तरीय आविष्कार २०२३-२४ स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल येथे खान्देशचे लोकनेते तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.आप्पासाहेब ओ.ना.वाघ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. पाचवी ते सातवीच्या गटात स्लो सायकलिंग, १०० मीटर धावणे, संगीत खुर्ची यासारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच शुद्धलेखन स्पर्धांसह रंगभरण स्पर्धाही आयोजित केली होती. आठवी ते दहावीच्या गटात निबंध, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सहभाग नोंदविला. विविध स्पर्धात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ, संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील बी. पी. आर्ट्‌स, एस. एम. ए. सायन्स आणि के.के. सी. कॉमर्स महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रंथालय विभागाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. व्ही. बिल्दीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए. व्ही. काटे, ग्रंथपाल डॉ. अर्चना कुलकर्णी, सहायक ग्रंथपाल नितीन अहिरे, सचिन जाधव, कैलास बागूल, नरेंद्र देशमुख, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शनाचा लाभ प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी घेतला. यशस्वीतेसाठी ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी ‘खान्देशचा ढाण्या वाघ’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले पाचोरा तालुक्याचे सहकार, शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी माजी आमदार स्व.अप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांना बुधवारी, १८ ऑक्टोबर रोजी स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. शक्तीस्थळाला माजी आमदार दिलीप वाघ, पी.टी.सी.चे चेअरमन संजय वाघ, कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती दगाजी वाघ, मधुकर वाघ यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी खलील देशमुख यांनी स्व.ओंकार वाघ यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पी.टी.सी.चे व्हा. चेअरमन व्ही.टी. जोशी, पं.स.चे गटनेते ललित वाघ, नगरसेवक भूषण वाघ, नितीन तावडे, खलील देशमुख, विनायक जकातदार, श्याम भोसले, नाना देवरे, प्रकाश पाटील, सुनील पाटील, जगदीश सोनार, मधुकर पाटील, प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, प्राचार्य…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथे दुर्गा माता दौडला युवक, महिलांसह चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाविकांची गर्दी वाढत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून येथे नवरात्रीनिमित्त दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात येतेे. पहिल्या दिवशी येथील श्रीराम मंदिरापासून दौडचे आयोजन केले जाते. त्यानंतर गावातील चारही बाजूने दौडचे आयोजन करून हातात मशाल, डोक्यावर सफेद टोपी घालून तरुण दौडमध्ये सहभागी होतात. ही दौड गावातील टेकडीवरील भवानी माता मंदिर येथे जाऊन तेथे पूजा-अर्चा करून तिचा समारोप होतो. यावेळी विविध घोषणा दिल्या जातात. सकाळी सहा वाजता ही दौड निघत आहे. दौडमध्ये रोजच गर्दी वाढत आहे. यावेळी पाळधी पोलीस चौकीचे कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवतात.

Read More

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जळगाव जिल्ह्याच्यावतीने भडगावला गुरुवारी, १९ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावा’ आयोजित केला आहे. समाज बांधव ओबीसी समुदाय आपल्या हक्काच्या ओबीसी आरक्षणवर गदा येता कामा नये किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे तसेच जातीनिहाय जनगणना व्हावी या आणि इतर मागण्यांसाठी मेळाव्याचे आयोजन भडगावला लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय येथे दुपारी दोन वाजता अखिल भारतीय महात्मा फुले क्षमता परिषद आणि समस्त ओबीसी समाज बांधव यांच्यावतीने केले आहे. मेळाव्याच्या नियोजनासाठी कजगाव येथे नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला समता परिषद नाशिकचे उपाध्यक्ष हर्षल महाजन, नाशिकचे शहर संघटक उमेश…

Read More

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर महाराष्ट्रात वैभवशाली संपन्न सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडीचा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. सूर्यकन्या तापी नदीचा असा भूसंपन्न परिसर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावरील चिंचोली गावाच्या उत्तरेला १० कि.मी. अंतरावर श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर आहे. चिंचोलीपासून ८ कि.मी.वर हनुमान मंदिर आहे. पुढे अवघ्या २ कि.मी. अंतरावर मनुदेवीचे मंदीर आहे. सातपुड्याला गतवैभव प्राप्त करुन देणारी देवी म्हणून तिचा उल्लेख होतो. नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. मंदिराचा इतिहास असा श्री क्षेत्र मनुदेवीला गेल्यावर सुरुवातीला भाविकांच्या स्वागतासाठी उंच उंच वृक्ष टेकड्या पर्वत तसेच श्री रघुदेव (परशुराम) उभा आहे. मनुदेवीचे मंदिर…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी शहरापासून यावल-भुसावळ रस्त्याचे काँक्रिटीकरणासह रस्त्याच्या बाजूला गटारीचे बांधकाम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस यावलचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे सोमवारी, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी केली आहे. यावल येथील अत्यंत वर्दळीच्या रहदारीच्या मार्गावरील भुसावळ नाक्यापासून सुरू असलेल्या व गटारींच्या कामांमध्ये स्थानिक नद्या, नाल्यामधील माती मिश्रित वाळू वापरली जात आहे. तसेच बांधकामामध्ये मंजूर प्लॅन, इस्टिमेट, निविदामधील अटीशर्तीप्रमाणे उत्कृष्ट दर्जाचे, प्रमाणाचे बांधकाम साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. जळगाव जिल्ह्यासह विविध राज्यातील अवजड…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी भारत सरकारच्या जळगाव येथील आकाशवाणी केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या निवडक लोकांचा सन्मान आयोजित केला होता. त्यात यावल तालुक्यातील शिरसाडचे ग्रामपंचायत सदस्य, यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक तथा ग्रामसत्ता संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष तेजस धनंजय पाटील यांचा गौरव केला. गेल्या १० वर्षापासून तेजस पाटील हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे. विविध संघर्षातून ते कायम यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांच्या कामाची पोहोच पावती म्हणून हा सन्मान केल्याचे आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, आ.राजुमामा भोळे, निर्मल सिड्सच्या संचालिका वैशाली सूर्यवंशी,…

Read More